Skip to main content

अप-grade

लेखक सायकलस्वार यांनी शुक्रवार, 29/01/2016 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
मॅनहॅटनमधल्या 'गॅजेट गॅलरी' च्या प्रशस्त दरवाजातून ढाकचिक बंड्या आत शिरला आणि आपल्याच घराच्या दिवाणखान्यात फिरत असल्यासारखा सराईतपणे त्या प्रचंड शोरूममध्ये फिरू लागला. त्याच्यासाठी ते दुकान नवे नव्हते. दर वीकेंडला तिथे जाऊन नवनवीन इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स पाहणे, हाताळणे आणि भरमसाठ पैसे देऊन विकत घेणे ही त्याच्यासाठी नेहमीचीच गोष्ट होती. बंड्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचा भलताच शौकीन. नुसता इलेक्ट्रॉनिक आयटेम्सचाच नव्हे. आपले कपडे, बूट, ॲक्सेसरीज अगदी लेटेस्ट फॅशनचे असले पाहिजेत असा त्याचा कटाक्ष होता. त्याच्या ह्या रुबाबामुळेच त्याला अख्ख्या जालन्यात 'ढाकचिक बंड्या' म्हणून ओळखले जात असे.

मोसाद - भाग ६

लेखक बोका-ए-आझम यांनी शुक्रवार, 29/01/2016 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
1 . मोसाद - भाग ५ मोसाद - भाग ६ माद्रिद, स्पेन. १९६३ च्या ऑगस्ट महिन्यात एका कंपनीच्या ऑफिसमध्ये तिच्या मालकाला भेटायला दोघेजण आले होते. हा मालक ऑस्ट्रियन होता. त्यांनी स्वतःची ओळख नाटो (North Atlantic Treaty Organization) देशांच्या गुप्तचर संस्थांचे अधिकारी अशी करून दिली. ते त्याच्या माजी पत्नीच्या शिफारशीवरून त्याला भेटायला आले होते.

मदत हवीय.... अँड्राईड डिव्हाईस मॅनेजरने लॉक केलेला मोबाईल....

लेखक सांश्रय यांनी शुक्रवार, 29/01/2016 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
अँड्राईड डिव्हाईस मॅनेजरने मोबाईल संगणकावरुन पासवर्ड देऊन लॉक केला, पण पासवर्ड टाकताना मागे मराठी युनिकोड लेआऊट सुरु असल्याने पासवर्ड युनिकोड मध्ये टाकला गेला. आता पासवर्ड मोबाईलवरुन टंकताना त्यातील एक अक्षर मोबाईलच्या किपॅडवरुन टाईपच होत नाही (ते अक्षर Shift + # असे आहे) त्यामुळे मोबाईल अनलॉक होत नाही. सदर पासवर्ड मोबाईलला एसएमएस ने पाठवून बफरमध्ये कॉपी करण्याचा प्रयत्न केला पण तसे होत नाहियं, मोबाईलच्या क्लिपबोर्डमध्येही टाकण्याचा प्रयत्न केला पण तरीही पासवर्ड अनलॉक स्क्रीनवर येत नाही. एक्स्टर्नल ओटीजी केबलने किबोर्ड जोडला तर तो फक्त इंग्लिश 26 कॅरॅक्टर किबोर्ड घेतो.

"बुवा....."

लेखक टवाळ कार्टा यांनी गुरुवार, 28/01/2016 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा - http://www.misalpav.com/node/34674 गुर्जींची माफी मागून...आणि (माझ्याच) कानाच्या पाळ्यांना हात लावून...सादर आहे "बुवा" :) गुर्जी अता मशीनगनी घेऊन मागे लागणार माझ्या :D ----------------------------------------------------------------------------------------------------------------------- बुवा अता तु(म्हा)ला क्षुधाशमनार्थ बायकोचा अधार मिळायला लागतोय भावविश्वासाठी तूझ्या अता गार्हाणा घालाव

राहील कुठे आता ही चिमणी?

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 28/01/2016 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
वारा वादळ हे जोराचे शाखा तुटल्या झंजावाते उडले घरटे फुटली अंडी सांगेल कुणाला व्यथा मनिची राहील कुठे आता ही चिमणी? उघडून जरी मी कपाट माझे बोलावत आहे तिजला नुसती चिव-चिव करते आहे नकळे मजला आणिक तिजला घरात परि ती कशी रहावी घरी वृक्ष तो आणू कैसा घरटे मग ती कोठे बांधिल आणेल कुठून ती पिले बिचारी सांगेल कुणाला व्यथा आपली राहील कुठे आता ही चिमणी? (महादेवी वर्मा यांच्या मूळ हिंदी कवितेवर आधारित) २८/०१/२०१६

देवा...

लेखक कविता१९७८ यांनी गुरुवार, 28/01/2016 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
देवा आता तुला स्वरक्षणार्थ माणसांचा आधार घ्यावा लागतोय दर्शनालाही तूझ्या आता घेराव घालावा लागतोय ऐकले होते आहेत सर्व प्राणी तुझ्यासाठी समसमान भावाचाच तु भुकेला फक्त बाकी सर्व कस्पटासमान पण आजकाल तुलाही सोन्याचा नैवेद्य लागतोय दर्शनालाही तुझ्या आता घेराव घालावा लागतोय रांगेत भक्त भोळा तुला तासनतास शोधतोय विचारतोय कोण या भोळ्या भाविकाला तुलाही आजकाल बुवाबाजीचा गोतावळा लागतोय असशील खरा देव तु तर स्वत: पटवुन दे तुलाही का रे आजकाल दांभिकतेचा मेळावा लागतोय
काव्यरस

थंड डोक्याने... समारोप

लेखक हुप्प्या यांनी गुरुवार, 28/01/2016 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग जेव्हा तपास करणार्या अधिकार्यांना फ्लॉइड वेल्सची जबानी समजली तेव्हा त्यांनी डिक हिकॉकच्या कुटुंबाचा पत्ता शोधला. खुनाबद्दल काही न बोलता डिकने खोटे चेक लिहिले आहेत आणि प्यारोलचे नियम तोडले आहेत म्हणुन चौकशी करत आहोत असे सांगितले. १४ व १५ नोव्हेंबरला तो काय करत होता हे विचारले. डिकने असे सांगितले होते की तो पेरीसोबत पेरीच्या बहिणीकडे गेला होता. पेरीच्या बापाने काही पैसे पेरीला देण्याकरता बहिणीकडे दिले होते ते आणायला. हे अर्थातच खोटे होते. पण पोलिसांना खात्री पटली की आपल्याला हवे असलेले गुन्हेगार हेच.

ऐसे कौन से तीर मार लिये यार तूने ?

लेखक मन यांनी गुरुवार, 28/01/2016 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
कुवत - मिडिओक्रिसिटी आपली कुवत मध्यम आहे ; हे पचवणं थोडं अवघडच आहे; विशेषतः प्रामाणिक असाल तर. कुवत मध्यम असणं म्हणजे काय -- आपण बुद्धीनं फार काही माठ नसलो तरी फार थोरही नाही, अगदिच सर्वसाधारण आहोत; प्रयत्न केल्यावरही एका मर्यादेपलिकडे काही आपली उडी पोचत नाही. फार काही तार्किकक्षमता आपल्या विकसित नाहित; कुठलंही विशेष कौशल्य नाही; कारकुनी कामं करतो झालं. कलाक्षेत्रातल्या जाणीवा विकसित झाल्या नाहित; उपजत नव्हत्याच. काहींच्या मुद्दाम नंतर प्रयत्न पूर्वक विकसित होतात; आपल्या त्याही नाहित.

ओ पी नय्यर शैली - एक सांगितिक स्मरण

लेखक चौकटराजा यांनी गुरुवार, 28/01/2016 07:46 या दिवशी प्रकाशित केले.
प्रास्तविक- १९६२ साल . राजकपूरचा "जिस देशमे .." थेटरात लागला आहे . मी इयत्ता दुसरीत . बाहेर लाउडस्पीकर्स वर "आ अब लौट चले, मेरा नाम राजु , ओ बसन्ती पवन पागल " ई गीतांची चलती ." हम राही, हरियाली और रास्ता" इइ सिनेमाची गीतेही कानावर. मी अन माझा भाउ शंकर जय च्या प्रेमात. एस जे माझं फिल्म संगीतातील पहिलं प्रेम. मग १९६५ चा सुमार "गोरी चल न हन्सकी चाल, बहारो फूल बरसाओ, ओ सनम तेरे हो गये" हम कानावर येत रहातात मी एस जे च्या प्रेमात काठोकाठ बुडालेला. मग मी १४ वर्षाचा होतो ,अन "मेरे सनम" येतो.

थंड डोक्याने... २

लेखक हुप्प्या यांनी बुधवार, 27/01/2016 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला भाग फ्लॉइड वेल्स हा क्लटरच्या शेतात काम करायचा. निदान वर्षे दोन वर्षे तो तिथे कामाला होता. त्याची क्लटरबद्दल काही तक्रार नव्हती. उलट तो नोकरांना चांगले वागवतो. गरज असली तर पगार व्हायच्या आधी तो पैसे उसनेही देतो. ख्रिसमसला भरपूर बोनस देतो अशा चांगल्या गोष्टीच त्याला आठवत होत्या. पण यथावकाश त्याने ती नोकरी सोडली. नंतर तो कुठल्याशा चोरीच्या गुन्ह्यात पकडला गेला. लान्सिंग नावाच्या गावात तो तुरुंगात शिक्षा भोगत असताना त्याला रिचर्ड (डिक) हिकॉक नावाचा जोडीदार त्याच्या कोठडीत भेटला. तुरुंगात गप्पा मारणे हा एक मोठा उद्योग असतो.