Skip to main content

हादगा

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी गुरुवार, 08/10/2015 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
आमची सोसायटी तशी कास्मोपाँटियनच. हादग्याची तोंडओळख सुद्धा अनेकाना नव्हती पण कामत काकूनी ती करून दिली. नव्हे हादगा जोरात सुरु झाला. यंदाच हे चौथं वर्ष, पण त्याला थोडी कारुण्याची किनार लागली होती. यंदा हादगा बसवायचा की नाही इथून सुरवात होती, कारण काकूंची नात पल्लवी त्यात सहभागी असणार नव्हती. ती आता कराडला असते आपल्या नव्या घरी नव्या बाबा बरोबर, नवीन आजी बरोबर. जवळजवळ एक वर्षच झालं म्हणायचं की त्या घटनेला. काकूंचा धाकटा मुलगा चिंतन, सिव्हील इंजिनियर, दिवाळीच्या तोंडावरच डोकं दुखायची तक्रार करु लागला, पंधरा दिवस गेले असतील नसतील, डायरेक्ट मेंदुतज्ञनं गाठावा लागला. आणि पुढं आठ दिवसात सारा कारभारच आटपला. दुखाचा डोगंरच कोसळला कामत कुटूंबावर. कामत काकांनी मात्र धीर सोडला नाही. सुनेला सांगीतलं आता हे तुझं दुसरं माहेर समज. आणि दोन महिन्यातच तिचा पुनर्विवाह कराडच्या अशाच एका दुर्घटना ग्रस्त प्रभू कुटूबातल्या हेमंतशी करून दिला. काकूंची ४ वर्षाची नात पल्लवी आता कराडला असते. कामत काकानी कटाक्षानं कमीतकमी संबंध ठेवले सूनेशी, कोणतीही ढवळाढवळ नको या हेतुनं. काकूंनी पण काळजावर दगड ठेवला. मुलगाही गेला नातही द्रुष्टिआड झाली. हादग्याचं रहित करावं असं आम्ही जवळजवळ सर्वच मुलिनी असं ठरवलं होतं. पण कांकूकडूनच कोणाकडून तरी निरोप आला, दरवर्षी सारखा तो करा. जड अंत:करणानं आम्हीही तयारी केली. आदलेदिवशी देसाई काकांच्या घरी एक मिटींग घेतली. इकडं मुलीनि फेर धरलाय आणि तिकडं कामत काकूनी कोंडून घेतलंय स्वतःला आत घरात. एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू, काय ठसक्यात म्हणायची पल्लवी. तसंच वाटतंय, छे भासच तो दुसरं काय? पुन्हा तसाच ठसका. काकूंनी खिडकी किलकिली करून बाहेर डोकावलं. डिट्टो पल्लवी, तेच परकर पोलकं मुद्दाम या सोहळयासाठी, परंपरेसाठी हौसेनं त्यानी शिवून घेतलेलं. बाहेर येवूनच बघावं बरं म्हणून त्या बाहेर आल्या, ही तर पल्लवीच आपली पल्लूच, चिंतनची अखेरची निशाणी. त्यांचा डोळ्यवर विश्र्वासच बसेना. मग त्या स्वतःच्या राहिल्याच नाहीत, पळत येवून पल्लवीला घट्ट मिठीत घेतलं. तिचे मुक्यावर मुके घेत सुटल्या. "काकू तुमच्या पल्लवीशिवाय हादगा कसा होईल?" आम्ही मुलिंनी देसाईकाकांच्या गाडीतून सकाळीच तिला आणलं होतं , काकू तुमच्यासाठी, आमच्या कामत काकूसाठी, आम्ही काकुंना बोलत्या झालो. आणि त्यांनंतर आम्ही फक्त निरीक्षक उरलो.
लेखनविषय:

वाचने 5483
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

शेवट गोड झाला, त्यामुळे वाचताना आलेले दडपण हलके झाले. मस्तच.

:)

छान

छान

In reply to by तर्राट जोकर

तुमको पितृपक्ष नै मालूम, नवमी नै मालूम, हादगा नै मालूम... तुम है किधर का वो पैले बताओ आन्ना ?

In reply to by प्यारे१

असं नै कै... पितॄपक्ष मालूम पन काहीही करत नै आमच्याकडे. म्हनुन नवमीचा काय डीट्टेल म्हायत नाय. ये भोंडला-हादगा एकीच क्या बोले तो...? हमारे उदर ऐसा कुच नै होता... भुलाबायकी गाना बोलता बच्चीलोग इदर... ये भोंडला-हादगा म्याटर सब इदर मुंबैपुनामें होता क्या..?

In reply to by तर्राट जोकर

>>> हमारे उदर ऐसा कुच नै होता ये उदर बोले तो किधर वोईच पुछा था मियां. भोंडला हादगा बोले तो अबी जो दशहरा होयेगा ना उस वखत औरत लोगा दस दिन शाम को नै तो थोडा काम धाम निपटाकु एकत्र आके रिंगण कर्ते और बीच मे हत्ती का चित्र काढके उसके भोवती चक्कर लगाते गाने गाते. प्रशाद मे क्या बनाया वो भी ओळखने को बोल्ते. ऐसा कुछ कुछ होताय. ओ संस्कारभारती वाले लोगा महाभोंडला भी कर्ते किधर किधर. कुलकर्णी काका, अवांतराबद्दल क्षमस्व. छान आहे कथा.

In reply to by प्यारे१

... आमच्या कडे ही गाणी भुलाबाईची म्हणून गातात.... भाद्रपद पौर्णिमेपासून आश्विनी (कोजागरी) पौर्णिमेपर्यंत भुलाबाई बसवायची.

In reply to by तर्राट जोकर

हादग्याला पुण्याकडं भोंड्ला म्हणतात. मागे एका धाग्यात भोंडल्याची गाणी वाचली होती. कुठे आहे तो धागा?

वा!

हादगा किंवा भोंडला (विदर्भ मराठवाड्यात भुलाभाई) हस्त नक्षत्रात मुली हत्तीच्या प्रतिमेभोवती फेर धरून गाणी म्हणतात. सर्व मराठी समाजाला ही गाणी नवीन नाहीत.कांही अशी * आक्कण माती चिक्कण माती अस्सा ओटा बांधावा-------- *नंणद भावजय खेळत होत्यय----- सासू गेली समजावयाला------- सासरा गेला समजावयाला----- नंतर दीर,जाऊ, नणंद समजावयाल जातात पण ती म्हणते मी नाही यायची तुमच्या घराला शेवटी पती लाल चाबूक घेऊन येतात मग तयारहोते *आड बाई आडवणी-------- *सखुबाई तुमच्या अंगणी संदर चाफा लावीला---- ऐसा चाफा फुलला---- * ऐलमा पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा *आंब जो मुरीला त्या बाई आंब्याचं लोणचं मी घातीलं----- *श्रीकांता कमलाकांता अस्सं कस्सं झालं अस्सं कसं वेडं माझ्या कपाळी आलं----- *पडं पडं पावसा थेबोंथेंबी---- * एक लिंबू झेलू बाई ------- *हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली------- *काळी चंद्रकळानेसू मी कशी दमडीचं तेल बाई आणिलं त्यात सासूबाईंचं न्हाणं वन्सबाईंची वेणी, मामंजीचि दाढी झाली ऊऱलेलं तेलं झाकून ठेवलं, त्याला लांडीराचा पाय लागला त्यात हत्ती वाहून गेला आणि ओघळ वेशीपर्यंत गेला मजेशीर कल्पना विस्तार, विनोद.ठसकातल्या चाली आणि शेवटी खिरापत मजाच मजा

डोळे पाणावले !!

रडवलंत... सुरेख गोष्ट! धन्यवाद!!

मंडळी या भुलाबाई, हादगा, भोंडला या परंपरा लोप पावत चालल्या आहेत. विकिपिडीया प्रकल्पांसाठी आपण स्वतः काढलेली भुलाबाई, हादगा, भोंडला प्रसंगांची छायाचित्रे विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पातून चढवल्यास विकिपीडियावरील लेखांमधून वापरता येतील. आपल्या छायाचित्रांमध्ये हयात व्यक्तींच्या चेहर्‍यांचे चित्रण असल्यास संबंधीत व्यक्ती किंवा पालकांना छायाचित्रे चढवण्यापुर्वी छायाचित्रे आंतरजालावर मुक्तपणे वापरली जाऊ शकतील याची कल्पना दिलेली उत्तम असेल.

आणखी एक सुखद झुळुक !!!!! अरे चिमण मिपा भोंडला अस्तो काय रे ????? माई विचारत होत्या म्हणून विचारले.

In reply to by नाखु

नाखूनकाका, किती गोळ्या माराल चिमन्याच्या खांद्यावर बन्दूक ठेवून दिसायला मोठा दिसत असला तरी मनाने कोमल श्याम आहे हो तो. त्याचे बालपण असे करपवू नका. ;)

In reply to by प्यारे१

तुम्ही श्याम च्या पुढे काही शब्द टंकायला विसरलात काय ते ? अति अवांतर : कट्ट्या नंतर भेटायलाच तयार नाही. काही फलश्रुती तर नाही ना !!!!!

In reply to by नाखु

आपल्याला कै कल्पना नै. आमी काय बोलणार एवढ्या लाम्बुन? कुणा ख़ास व्यक्तिनं काही ख़ास सन्देश दिला असेल तर असं होतं असं आपलं यांचं मत असं माई बोलत होत्या.

एका ब्लॉगमधील या कवितेत आकाशमोगरा (बूचाचं झाड़) फुलांच्या हाराचा ''भुलाबाई भोंडलाची पुजा ह्या हारांनीच करतात'' असा उल्लेख आला आहे. हा त्या कवियत्रीचा व्यक्तीगत अनुभव आहे का हा अधिक सार्वत्रिक प्रथेचा भाग होता या बद्दल माहिती/ दुजोरा हवा आहे

काय योगायोग आजच घरी हादग्याच्या फुलांची भाजी खाल्ली :)