Skip to main content

हळूच बोल, राजसा

लेखक बहुगुणी यांनी सोमवार, 01/02/2016 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
आवडलेल्या इंग्लिश गीतांच्या मराठी रुपांतराचा सिलसिला पुढे सुरू ठेवतोय. आज सुटी सत्कारणी लावावी म्हणून फिनिक्स हा जर्मन चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहिला. आवडला. चित्रपटाच्या अखेरीस असलेलं निना हॉस या कथानायिकेने गायलेलं "Speak low when you speak, love" हे गाणं म्हणजे चित्रपटाचा परमोच्चबिंदू वाटावा इतकं आवडलं.

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १६: फूल

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 01/02/2016 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल पुन:श्च धन्यवाद. यंदाची स्पर्धेची विजेते निवडण्याची पद्धत नेहमीप्रमाणे मतदानाद्वारे नसून मिपाकर परिक्षकांद्वारे विजेत्यांची निवड होणार आहे. यापूर्वी काही वेळा ही पद्धत अवलंबिली गेली आहे, उदा. व्यक्तिचित्रण, कृष्णधवल छायाचित्रे. आपणास सांगण्यास आनंद होत आहे की यंदाच्या स्पर्धेसाठी परिक्षकाची भूमिका पार पाडण्याची विनंती आम्ही मिपाकर सर्वसाक्षी यांना केली व त्यांनी ती मान्य केली आहे.

स्वयंपाक चौथर्‍यावर नवर्‍यांना प्रवेश द्यावा काय ?

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 31/01/2016 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
पे रणा अबाबा!!!: नवर्‍यांना महिलाअंतःपुर अर्थात स्वयंपाकचौथर्‍यावर प्रवेश द्यावा का नाही? हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. अखिल अंतर्जालात(आणि जगात!) या विषयी काथ्याकूट न येणे ही काहिशी आश्चर्याची (आणि तितकीच खेदजन्य) बाब आहे. ( पुर्वीचं जग राहीलं नाही...!) सदरील प्रकरणावर चर्चा करण्यासाठी हा काथ्याकूट ! यासंदर्भात "कचकून लाथा ब्रिगेड" हे नाव चर्चेत येत आहे . या संघटनेविषयी कुठेच्च जास्त माहिती मिळाली नाही.

माध्यम: लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे का?

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 31/01/2016 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे वृत्तपत्रे, नियतकालिके, पत्रकार, पत्रकारीता़, न्यूज एजन्सीस, विविध टीव्ही न्यूज चॅनल्स या सर्वांमिळून माध्यम म्हणजेच मीडिया तयार होतो आणि या मीडियाला आपण आज आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ समजतो. मीडियाची ताकद खूप मोठी आहे. आतापर्यंत अनेकदा राजकीय नेत्यांची भ्रष्ट प्रकरणे मीडियाने बाहेर काढून लोकांना वेळोवेळी दिलासा दिला आहे. न्यायालय हा लोकशाहीचा तिसरा स्तंभ. पण न्यायालयाला ठोस पुराव्यांशिवाय कोणाला सहजासहजी दोषी ठरवता येत नसल्याने न्याय मिळायला उशीर होतो.

लदाख सायकल ने : मनाली ते गुलाबा (भाग २)

लेखक राजकुमार१२३४५६ यांनी रविवार, 31/01/2016 16:47 या दिवशी प्रकाशित केले.

लदाख सायकल ने : मनाली ते गुलाबा (भाग २)

रूपकुंड चे नाव ऐकताक्षणिक त्यांनी ओळखले कि मी कोणत्या मातीत बनलो आहे. बस मध्ये अजिबात बोर झाले नाही कि त्रास झाला नाही. त्याचे कारण होते ते शेजारील मोकळी बैठक आणि समोरील जागे मधले लांब अंतर. त्यामुळे पाय लांबून बसता आले. मात्र चंडीगडला पूर्ण बस भरून गेली. चंडीगड वरून रात्री ११ ला आम्ही निघालो.
सकाळी ५ वाजता मंडी मध्ये गाडी चे आगमन झाले. जास्त वेळ न थांबता गाडी पुढच्या प्रवासाला निघाली. औट पाशी जलोडी जोतला जाणारा सायकलस्वार उतरला. पुढे भून्तर ला सारपास ला जाणारे पण उतरले.

श्री गुरू एक कोडे भाग-२

लेखक शरद यांनी रविवार, 31/01/2016 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
आज दुसर्‍या भागाला सुरवात करण्याआधी श्री.गावडे आणि श्री. मारवा यांचे आभार मानतो. एका विषयाकडे निरनिराळ्या दृष्टीने पहातांना पूर्वासूरींनी काय सांगितले आहे हे पहाणे उपयुक्त असते. ( श्री.गावडे यांच्यासाठी " महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर " असे जनाबाई म्हणते व नामदेवांना " ज्ञानदेव मीच आहे " असे श्री. विठ्ठलच सांगतात. तेव्हा हरीदासांची कथा असे म्हणून ते सोडून देऊ नका) श्री. आनंदा यांच्या प्रश्नाला उत्तर देणे अवघड आहे कारण मी नास्तिक आहे असे म्हटले तर ते विचारणार की तुमचा देवावर विश्वास नाही की वेदांवर ?

रोहिथ वेमुला

लेखक अविनाश लोंढे. यांनी रविवार, 31/01/2016 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
रोहिथ,आपण आधी कधी एकमेकांना भेटलो आहे का ? पण काल तू स्वप्नात आलास ,अन आपण बोललो,हे कस काय ? काय बोललो हे तुलाही माहितेय अन मलाही पण तेच आज लिहावास वाटतंय - मी - तू जगलास काय किंवा मेलास काय इथं कुणाला काही 'घंटा' फरक पडणार नाही .काही दिवस तुझी चर्चा होईल TV आणी वर्तमानपत्रात वर अन पुन्हा 'जैसे थे' तू आत्महत्या करायला नको होतीस ! स्वत जीव देऊन युद्ध नाहीत जिंकता येत मित्रा ! रणांगणात दुसऱ्याकडून लढता लढता मेलं तर ते वेगळ पण असा जीव देण मनाला हुरहूर करून सोडणार आहे . तू - I would not be around when you read this letter. Don’t get angry on me.