Skip to main content

विज्ञान लेखमाला : ०१ : डिजिटल फोरेन्सिक

लेखक Jack_Bauer यांनी मंगळवार, 26/01/2016 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वसाधारणपणे फोरेन्सिक म्हटले की गुन्हे, पोलीस, रंगीबेरंगी द्रव्य सतत उकळत असलेली प्रयोगशाळा आणि पांढरे कपडे घातलेली त्या प्रयोगशाळेत काम करणारी माणसे असे काहीसे डोळ्यासमोर येते. हे असे होण्यामागे आपली CID सिरियल, चित्रपट यांचा मोठा हात आहे. याच फोरेन्सिकची एक शाखा म्हणजे डिजिटल फोरेन्सिक. आज इंटरनेटमुळे माहितीचा विस्फोट झाला आहे असे म्हणता येईल. माहितीचे वर्गीकरण दोन ढोबळ गटात होते. १. Structured : ह्यामध्ये ERP system, SAP, database अशा माध्यमांत असणारी माहिती येते. ही माहिती मिळवणे तुलनेने सोपे असते, कारण अशा ठिकाणी माहिती टेबल्समध्ये असते आणि ही टेबल्स एकमेकांशी जोडलेली असतात. २.

वेटोळे (लघुकथा)

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 25/01/2016 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
तर मी एकदा असाच चालत होतो, भटकत होतो, दगडधोंडे तुडवत, पायवाट मळवत, तहानभुक भागवत, ऊन्हा-पावसाला भिजवत, अंधाराला कवटाळत, जगत होतो. माझ्या कपाळी अपयशाचा टिळा लावला होता. प्रश्न जगण्याचा होता. जगुन जगुन थकण्याचा होता. गुडघे घासून मरण्याचा होता. तो प्रश्न घेऊन मी आत जंगलात खोलवर गेलो. उंच टेकाडं चढून पाहीली. दलदलीत चिखल माखून घेतला. काटेरी गवतात झोपुन गेलो. झऱ्याच्या पाण्यात गारठून गेलो.

थोडंस मनातलं...

लेखक लाडू. यांनी सोमवार, 25/01/2016 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय ‘तू’ ला, आज म्हटलं चल एक पत्र लिहू तुला. कस वाटतंय पाहू. तशी मी फार obessed आहे प्रेमपत्र वैगरे बद्दल. पूर्वीच्या कथा, कादंबऱ्या, कोणाचे अनुभव, किंवा चित्रपटामधूनसुद्धा असे उल्लेख आले कि शहारून येत. कोणी कोणासाठी गुलाबी कागद वैगरे घेऊन, इतकं छान छान विशेषणे वापरून लिहित असेल तर ते आयुष्यभरासाठी कोणीही जपून ठेवेलच ना. (ते मग कोणाला सापडलं कि वाजलेच बारा.. अस काहीतरी सांगून माझा रोमांटिक मूड प्लीज खराब करू नकोस. मी प्रेमपत्र लिहायच्या सॉल्लीड मूड मध्ये आहे) तू मला हे असलं कधीही काहीही दिलेलं नाहीस याचा प्रचंड राग तर आहेच. पण आता मी लिहितेय ना, तर शांतपणे वाचायचं.

मोल्टन चॉकलेट केक

लेखक असंका यांनी सोमवार, 25/01/2016 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
. मी आणि माझ्या मुलीनं मिळून यू ट्युब वर बघून बघून हे केलं. अनेक प्रयोग करून जमलेलं असल्याने, साहित्य जरा अंदाजानेच घेतलंय. त्यामुळे "हे सोपं आहे" हे समजून देण्यापलिकडे किंवा मार्गदर्शक म्हणून या पाककृतीचा उपयोग जरा लिमिटेड आहे. आवश्यक उपकरणं: कंवेक्शन मायक्रोवेव्ह ओवन उपकरणं जी असतील तर उत्तम पण नसतील तर दुसरं काही वापरता येइल: १. काचेचे मिक्सिंग बोल- दोन. अ. एक बोल मिक्सिंग साठी.

आमचं एकत्र मालवणी भोजन.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 25/01/2016 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
“मालवणी जेवणाच्या पदार्थांची चव पुस्तकात वाचून केलेल्या जेवणात सापडायची नाही.ती हळदणकरांच्या चोखंदळ हातामधून तयार झालेल्या जेवणातूनच खरी कळायची.” बाबल्या हळदणकराच्या खानावळीत मी पूर्वी अनेक वेळा जेवलो आहे.हळदणकर दांपत्यांची मुलं मोठी झाल्यावर आणि कामा-धंद्याला लागल्यावर मुलांनीच त्यांची खानावळ बंद केली होती. ” आयुष्यभर आमच्यासाठी खस्ता खाल्लात.आता थकावट येण्याच्या वयात आरामात रहा” असं आम्ही आमच्या आईबाबांना विनंती करून सांगीतलं आणि त्यांनी ते मानलं.” गुरूनाथ-हळदणकरांचा मोठा मुलगा-मला सांगत होता. “तुमच्या खानावळीत मी अनेकदां जेवलो आहे.जेवणाची चव अजून माझ्या जीभेवर आहे.” मी गुरूनाथल म्हणालो. “तु

सोने की चिड़ियां

लेखक संदीप डांगे यांनी सोमवार, 25/01/2016 02:44 या दिवशी प्रकाशित केले.
हे गाणं माझं खूप म्हणजे खूप फेवरेट आहे. जेव्हा जेव्हा हे कानावर पडतं तेव्हा स्वर्गात विहरत असल्यासारखे वाटते. लहानपणी २६ जानेवारीला युनिफॉर्ममधे शाळेत ध्वजारोहणाला सकाळी सकाळी जायचो तेव्हा हे गाणं कुठे न कुठे चालू असायचं. तेव्हा मन देशाभिमानानी भरून यायचं. आपल्या मनात ही भावना येते याचंच अप्रूप वाटायचं. आपण अशा एका देशाचे नागरिक, वंशज, मालक आहोत ही भावना भारावून टाकायची. कालांतराने सँटाक्लॉसला सत्य मानणार्‍या लहान मुलाचे वय वाढल्यावर जेव्हा त्याला खरे समजते आणि त्याचे जे होते ते माझं झालंय बहुधा असं वाटतं. तरीही हे गाणं अजूनही गारूड करतंच.

एक स्कॉर्पियो आणि सहा जण... भाग ५

लेखक संदीप डांगे यांनी सोमवार, 25/01/2016 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला भाग | दुसरा भाग | तिसरा भाग | चौथा भाग पुढे.. पुढे... अजून पुढे.... पण कुठवर जायाचे? चांगला रस्ता लागल्यावर जनता झोपली. पहाटेचे पाच वाजत होते. रस्ते चांगले असले तरी धूळधाण उडत होती. ट्रक्सचा गराडा होताच. आता फार बाका प्रसंग येऊन ठाकला. मला चक्क झोप येत होती.