Skip to main content

फेसबुकी सुंद्री आणि नवकवी

लेखक खटासि खट यांनी शनिवार, 30/01/2016 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
मधुरा सुंद्रीकर ला फेसबुकवर जबरदस्त फॅन फॉलोइंग होतं. ती काही रोजच आपले फोटो अपलोड करत होती असे नाही. एखादे दिवस गॅप देखील घ्यायची. तिच्या फोटोंमुळे घायाळ झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली होती. ती जेव्हां जेव्हां लॉगिन करीत असे तेव्हां ९०० + फ्रेण्ड रिक्वेस्टी पेंडींग असलेल्या दिसत. त्या वेळीच क्लिअर केल्या नाहीत तर मात्र हा आकडा फुगत जऊन एक दिवस प्रोफाईलचं काही बरं वाईट होईल असं वाटून ती आपल्या कोमल बोटांनी अनेकांच्या रिक्वेस्टींवर कात्री चालवत असे. स्त्री प्रोफाईल्सकडून तिला कमीच रिक्वेस्टी येत.

आकाशदर्शन - फोटोग्राफी

लेखक कंजूस यांनी शनिवार, 30/01/2016 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशदर्शनाची आवड निर्माण होऊन आमच्या घराजवळच असलेल्या खगोलमंडळाच्या शाखेत जाऊ लागलो.तिथे असलेल्या बय्राच पुस्तकांतून,नकाशांतून तसेच चर्चेतून माहिती मिळत गेली.आकाशदर्शनांच्या कार्यक्रमांनाही जाऊ लागलो.त्यांचे कार्यक्रम वांगणी येथे होतात.दुसय्रा काही संस्थांचीही माहिती मिळाली.चुनाभट्टी मु्ंबईची मराठी विज्ञान परिषद - यांचे कार्यक्रम मुरबाडजवळच्या हिंदू सेवासंघाच्या जागेत होतात.

संदर्भ मूल्याचा प्रश्न

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 29/01/2016 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
काही वेळा काही लोक अशी माहिती, मुद्दे आणि तर्क आणि अजब निष्कर्ष घेऊन येतात की त्या त्या क्षेत्रातील जाणकार मंडळीसुद्धा दोन क्षण स्तंभीत होऊन जावीत, मग संदर्भ मागीतले जातात संदर्भ दिले गेलेच तर कुठलेसे संदर्भ अचानक समोर ठेवले जाताना दिसतात पण त्यांची विश्वासार्हता आणि तर्कसुसंगतता प्रथम दर्शनी साशंकीत असण्याची शक्यता असू शकते. विज्ञान, समाजशास्त्रे आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातील माहिती आणि सांख्यिकी बाबत हे बरेच होताना दिसते.

मनात घर करुन राहिलेला सिनेमा - बनगरवाडी

लेखक नितीनचंद्र यांनी शुक्रवार, 29/01/2016 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
काल जरा काम नव्हते म्हणुन झी सिनेमा चॅनल लावल आणि पहातो तर काय मनात घर करुन राहिलेला सिनेमा बनगरवाडी ( १९९५ ) नुकताच सुरु झालेला होता. १९९५ साली मला या सिनेमात शाळामास्तरची प्रमुख भुमिका करणारा कलावंत नंतर दिग्दर्शक म्हणुन गाजलेला श्री चंद्रकांत कुलकर्णी आहे. त्याचा आवाज आज ऐकताना जाणवल की हा चंद्रकांत कुलकर्णी आहे. एक चंद्रकांत मांढरे सोडले तर चंद्रकांत कुलकर्णी, किशोर कदम, उपेंद्र लिमये, सुषमा देशपांडे ( मी सावित्रीबाई फुले फेम ) नंदु माधव, नागेश भोसले हे कलाकार फारसे फेमस नव्हते. आजच्या इतका मिडीया सुध्दा पॉवरफुल नव्हता.

राष्ट्रीय आयोगाचा दिलासादायक निर्णय...

लेखक पुणे मुंग्रापं यांनी शुक्रवार, 29/01/2016 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
चेन्नईच्या श्रीमती वसुधारिणी यांनी कॅनरा बँकेच्या स्थानिक शाखेत दि. १० ऑक्टोबर रोजी कामधेनु योजनेमध्ये रु. एक लाख गुंतवले. त्यासाठी त्यांनी रु. ५०,०००/- रोख व उरलेल्या रक्कमेचा धनादेश बँकेला दिला. एक वर्षानंतर ठेवीची मुदत संपल्याने त्यांना व्याजासह रु.१,०७,१८७/- मिळाले . मात्र सप्टेंबर २००९ मध्ये म्हणजे वरील व्यवहार झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी बँकेने त्यांना कोणतीही लेखी पूर्वसूचना न देता त्यांच्या खात्यांतून रु. ६१३८३/- वसूल केले. पासबुकातील ती नोंद पाहताच वासुधारिणी तडक बँकेत गेल्या. त्यांनी १० ऑक्टोबर २००६ रोजी कामधेनू योजनेसाठी जमा केलेल्या रु.

सोबत

लेखक मराठी कथालेखक यांनी शुक्रवार, 29/01/2016 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
[शतशब्द कथांबद्दल एक धागा दिसला. आपणही प्रयत्न करावा असं वाटलं. अर्थात ते मला जमलं नाही पण त्या प्रयत्नात ही कथा जमेल तितकी छोटी ठेवली आहे. अधिक काट-छाट करणे ठीक वाटले नाही , तेव्हा ३३४ (मायक्रोसॉप्फ्ट वर्डनुसार) शब्दांची ही कथा खास मिपाकरांसाठी] रात्री बाराच्या सुमारास विमानतळावरुन नीता बाहेर आली. राजेश नक्की येणारच याची तिला खात्री होतीच त्यामुळे तिने पर्स मधून फोन बाहेर काढला नाही. नऊ वाजता "फ्लाईट उशिराने आहे" हे सांगायला तिने त्याला फोन केला होता तेव्हा त्याच्या आवाजात थकवा स्पष्ट जाणवत होता , शिवाय त्याचं डोकंही दुखत होतं. आपल्या प्रिय नवर्‍याला आपण त्रास देत आहोत असं तिला वाटून गेलं.

प्रतीक्षा

लेखक मयुरMK यांनी शुक्रवार, 29/01/2016 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
निळ्याभोर उंच नभी सावळे काळे विखुरलेले मेघ त्याखाली अथांगशा धरणीवर हिरवेगार एक छोटेसे शेत -जसे माझे स्वप्नातील सुंदर जग- शेताच्या मधूनच जाते लांबडी पायवाट एक हिरवट तांबडी एक रेषा जशी आडवी तिडवी छेदीत त्या शेताला वाकडीतिकडी -करीत जणू माझिया स्वप्नांचा भंग- वात जिथे संपते तिथेच जवळ खूण म्हणोन उभी एक बाभळ फांदीवरी तिच्या कृमींची दाटण विणुनी जाळी कोळ्यांन
काव्यरस

माझी दंतकथा (अर्थात My Experiments with Tooth)

लेखक केडी यांनी शुक्रवार, 29/01/2016 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या बायकोला , पत्रिका वाचन आणि त्यांचा अभ्यास करणे हा एक छंद जडलेला आहे. त्यामुळेच, मिळेल त्याची पत्रिका घेवून तिचं ती dissection करत असते.

डोंगरावरचा देव...१

लेखक विजय पुरोहित यांनी शुक्रवार, 29/01/2016 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
डोंगरावरचा देव… जूनचा महिना आता संपत आलेला होता. आकाशात काळे ढग भरुन आलेले दिसत सारखे. भर दिवसा देखील संध्याकाळ असल्याचं वाटत असे. पण ते बरसत काही नव्हते अजून. मे महिन्यात वादळवार्‍यासहित जोरदार हजेरी लावलेला पाऊस आता मात्र दडून बसलेला होता. पेरणीची कामे केलेले शेतकरी आभाळाकडे बघून हात जोडून जोडून देवाजीचा धावा करत होते. तो पण त्याच गर्दीतला एक सामान्य माणूस. गावाच्या पारावरुन संध्याकाळच्या गप्पा आटोपल्यावर घराकडे चालत निघालेला. शेती आणि पावसाच्या अखंड चिंतेत बुडालेला. गावच्या रस्त्यावर आडवे येणारे खाचखळगे, गटारे सरावाने चुकवत चुकवत घाईघाईत घराकडे निघालेला.

मराठी भाषा दिन २०१६

लेखक साहित्य संपादक यांनी शुक्रवार, 29/01/2016 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या आपल्या मायमराठीच्या गौरवदिनानिमित्त आपण मराठी बोलीभाषा सप्ताह २१-२७ फेब्रुवारी दरम्यान साजरा करत आहोत. दर दहा मैलावर भाषा बदलते म्हणतात. मराठी भाषा तर दर प्रांती वेगळ्या लहेजात बोलली जाते. ऐकायला गोड वाटणाऱ्या आणि शब्दकळेने समृद्ध असणाऱ्या या बोली मराठी साहित्याला नेहमीच आगळा साज चढवत आल्या आहेत. भरुभरुन साहित्याचं देणं देत आल्या आहेत.किंबहुना प्रत्येक विषयातील शब्दाला पर्यायी मराठी शब्द देणे हे बोलीभाषेच्या अभ्यासाने नक्कीच साध्य होऊ शकेल. आणि म्हणूनच बोलीभाषा बोलली गेली पाहिजे,लिहिली गेली पाहिजे आणि वाचलीही.