Skip to main content

एक कविता_व्हॅलेंटाईन डे

लेखक चिमणराव वरवंटे ऊर्फ चिमू यांनी गुरुवार, 08/10/2015 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
प्रपोज केले तुला फालतू साॅरी म्हणाली मला काल तू झाले गेले विसरून जातो रूप तुझे ते चुलीत घाल तू तुझा ध्यास तो घडीभराचा मुंडासा बांधला वराचा वधू ठिकाणी तुला पाहिले डोळे केले उगा लाल तू होतो मी प्रेमवीर मानी प्रेमाची साधना तूफानी लाजवाब हा नकार देऊन मनात केलीस उलाढाल तू होती नव्हती सरली आशा उठल्या नाकावरच्या माशा खोट्या साय्रा शपथा घालून तरसविले मज सालोसाल तू खरी चूकी माझीच असावी फसलो तव जालात कसा मी फिरलो सदैव मागे मागे जनावरासम तुझ्या पालतू कवी:चिमू(निवृत्ती)
लेखनविषय:

वाचने 1320
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

येकदम नया जमान्याची फेश कविता! आवडली! (अवांतर: रॉ मटेरियल! ;) )