Skip to main content

वॅली ऑफ फ्लॉवर्स : ६ : वॅलीमधला दुसरा दिवस

लेखक आकाश खोत यांनी बुधवार, 03/02/2016 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ वॅलीमध्ये जातानाच्या रस्त्याचे वर्णन, तिथे घालवलेला आमचा पहिला दिवस याचे वर्णन या मालिकेत आधीच्या लेखामध्ये आलेलेच आहे. वॅलीमध्ये पहिल्यांदा जाताना आम्हाला उशीर झाला होता. तिथे पोहोचल्यावर पाऊस पडल्याने आम्हाला खूप कमी वेळ वॅली मोकळेपणाने पाहता आली. दुसरा दिवस यासाठीच राखून ठेवला होता.

हायकु (कायकु)-२

लेखक नाखु यांनी बुधवार, 03/02/2016 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वीचा प्रयत्न बाप लेकीचा अल्लड प्रश्न साजुक उत्तर बालक कोण ? पालक कोण ? गुंता दुस्तर ===== कालचक्र हलले पान हसली कळी झुकुन पाही (सुकली) फुलरांगोळी ====== थोरांची ओळख (?) आधी पाहू धर्म मग शोधू जात ते उत्तुंग कर्तुत्व,सदगुण ई.

लदाख सायकल ने : गोंदला ते जिंगजिंगबार (भाग ५)

लेखक राजकुमार१२३४५६ यांनी बुधवार, 03/02/2016 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
तू तुझे बघ मी माझे बघतो. तू तुझा उद्याचा कार्यक्रम तयार कर, मी माझा बनवतो. जर दोघांचे कर्यक्रम एक सारखे निघाले तर मग आपण एकत्र राहू. नाहीतर मग तू तुझ्या रस्त्याला मी माझ्या. या गोष्टीवर दोघांची संमती झाली. तीन दिवस हाफ पैन्त घातल्या मुले गुड्घ्यापाशी पाय जळाले. खूप आग होत होती. आता उद्या पासून फुल पैन्त घालावी लागणार. आज दिवसभरात ६४ किलोमीटर सायकल चालवली.

दिवस पाचवा

साडे आठला डोळे उघडले. असे तसे नाही उघडले. सचिन न हलवून हलवून उठवलं. सचिन तर हेल्मेट घालून जाण्याच्या तयारीत होता.

अप-ग्रेड (२)

लेखक सायकलस्वार यांनी बुधवार, 03/02/2016 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
'पण हा फोन आहे कुठे? आणि तो वापरायचा कसा?' 'सांगत्ये ऐका' बंड्याला बसते करीत नर्स म्हणाली. ************************************************************* 'आयफोन-१२ म्हणजे एक एकसंध चौकोनी ठोकळा नाही. त्याचे वेगवेगळे पार्ट्स तुमच्या शरीराशी इंटिग्रेट करण्यात आले आहेत, जेणेकरून तुमचा फोन वापरणं हे तुमच्या शरीराचा एखादा अवयव वापरण्याइतकंच सोपं झालं आहे. उदाहरणार्थ, तुमच्या टाळूमध्ये त्याची जीपीएस चिप बसवली आहे. तुमच्या कानांमध्ये त्याचे स्पीकर्स बसवण्यात आले आहेत. तुमच्या हिरडीमध्ये मायक्रोफोन बसवला आहे. आणि हे पहा' असे म्हणून तिने त्याच्यासमोर आरसा धरला. बंड्याने आरशात पाहिले.

काटा वजनाचा --४

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 03/02/2016 01:08 या दिवशी प्रकाशित केले.
काटा वजनाचा -३ काटा वजनाचा --४ आतापर्यंत आपण वजन जास्त म्हणजे किती आणि ते का वाढते याची साधारण कारणे पाहिली काही लोक आपल्याला भरपूर खाताना दिसतात तरीही त्यांचे वजन वाढत नाही. याउलट बहुसंख्य स्थूल लोकांची एक तक्रार असते कि आम्ही एवढा डाएट करतो तरी आमचे वजन कमी होत नाही. या दोन्ही गोष्टीत थोडे फार तथ्य आहे याचे विवेचन. काही वैद्यकीय शास्त्रज्ञांनी एक सिद्धांत मांडला कि जसे आपल्या मेंदूत एक थर्मो स्टेट(THERMOSTAT) असतो जो शरीराचे तापमान स्थिर ठेवतो तसाच एक एडीपोस्टेट (ADIPOSTAT) असतो.

जिलबीचं प्रमाण किती असावं ?

लेखक नीलमोहर यांनी मंगळवार, 02/02/2016 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
पे र णा: http://www.misalpav.com/node/34693 नमस्कार मंडळी, मंडळी, मिसळपाव मोठ्या लज्जतदार लेखांनी खच्चून भरलेलं असतं. वाचकासमोर कोणते लेखन कधी येईल काही सांगता येत नाही. मिपाकर हा वाचनवेडा प्राणी आहे. मिपावरील उत्कृष्ट लेखनात रमणे हा त्याचा जन्मजात हक्क आहे. रोचक, ज्ञानवर्धक, माहितीदायक, प्रेरणादायक, विडंबनात्मक अशा अनेक प्रकारच्या लेखांत त्याचा जीव अडकून असतो. पण कधी कधी मिपावर चांगल्या लेखांशिवायही वाचकाने रहायला शिकलं पाहिजे. कारण कोण कधी बोर्डावरचे उत्तमोत्तम लेख खाली ढकलून तुम्हाला उपाशी सोडून स्वतः जिलब्या टाकत बसेल याची काही गॅरंटी नाही. आणि मग भुकेलं वाटायला लागलं की वाचनभूक शमवण्यासाठी अनेक जिलब्यांचा प्रवास सुरु होतो. अशाच एका मिसळपावात घुसखोरी करणार्‍या एका गोष्टीची गोष्ट. कधी तरी एखादा मिपाकर म्हणतो, 'घे कै होत नै', 'एक तुकडा घे', 'बरं दोनच वेटोळे घे', 'धागा पडला राव तुझा जाऊ दे, चलता है', 'नाही म्हणू नको यार', 'धाग्याची शंभरी झाली लेका, बाकीच्यांचा कसा पापड मोडला असेल बघ' .. इ. इ. आनंद असो, दु:ख असो काही तरी निमित्ताने 'एकच जिलबीची' टाकण्यास सुरुवात होते आणि मग महिन्यातून एकदा, आठवड्यातून एकदा आणि दररोज असा जिलबी टाकण्याचा प्रवास सुरु होतो आणि मग आपल्याला त्याचं व्यसन लागलंय इतकं ते रुटीन होऊन जातं. 'भस्म्या' होऊन पुढे पुढे काय काय होतं हे बर्‍याच लोकांना माहिती आहे. माझा काथ्याकूटाचा विषय 'व्यसन आणि त्याचे दुष्परिणाम' हा नाही. माझा विषय आहे की कधी कधी टाळताच येत नाही अशा गोष्टी असतात, म्हणजे मिसळपाव, इथले मिपाकर, वेगवेगळे अतरंगी आयडी, यात एक जिलबी म्हणा किंवा ईम्रती म्हणा एखाद दुसरा तुकडा घेतला की सपक रूटीन लाईफ एंजॉय होते. माझा प्रश्न आहे की माणसाला किती प्रमाणात जिलबी आरोग्यासाठी चालू शकते ? किती प्रमाण त्याचं असलं पाहिजे? आपण म्हणाल माणसाला झेपेल तेवढी टाकावी पण हे काही माप होऊ शकत नाही. कोणी म्हणेल पण टाकूच नये ना? जागतिक ऑनलाईन आरोग्य संघटना काय म्हणते ? डॉक्टर लोकांचा काय सल्ला असतो ? व्यस्त बँडविडथ, हाथ धुवून मागे लागलेला बॉस, आणि विविध रिकामी कामे सोबत असतांना जिलबीचं प्रमाण किती असलं पाहिजे ? जिलबी खावी की न खावी? गोड / आंबट/ आंबट गोड / अतिगोड / मधुर अशा विविध चवी आणि त्याची माहिती आरोग्याच्या दृष्टीने यावी. आपलं म्हणणं तीन पाच र्‍हस्व प्रतिसादात विविध मुद्द्यांशिवाय आलं तर बरं राहील. उगाच प्रतिसादांच्या जिलब्यांचा रतीब पाडण्यापेक्षा भरकटलेला मुद्दा विदाऊट स्पष्टीकरण आलं, भरल्या ताटी कोणाचं काही प्रबोधन न करता रिकामा टीपी झाला तर त्याचा फायदा अनेक जिलब्यांचे अजीर्ण झालेल्या मित्र मैत्रिणींना होईल म्हणून हा काथ्याकूटाचा प्रपंच. ता.क: मी अशा गोष्टींपासून एक हात दूर(राहू शकत नाही). उगं माझ्याकडे संशयाने पाहिले तरी काही एक बिघडणार नाही. धन्यवाद. खुलासा संपला.

लदाख सायकल ने : मढी ते गोंदला (भाग ४)

लेखक राजकुमार१२३४५६ यांनी मंगळवार, 02/02/2016 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
मग मी सचिन ला सांगितले कि आपण कैरियर काढून तार सरळ करू. परत कैरियर बसू मग ब्रेक चालू होईल. तुला पुढच्या ब्रेक वर अवलंबून रहायची आवश्यकता भासणार नाही. मग काय पंधरा मिनिटात त्याला ब्रेक ठीक करून दिला. सचिन म्हणाला तू नक्कीच इंजिनीअर आहेस. पण कोणता? मी म्हणालो एवढा ब्रेक ठीक करून दिला. आता मला नाही वाटत कि मला काय सांगायची गरज आहे ते. तरी सांगतो रेल्वे मध्ये मैक्यनिकल इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे
पाच वाजता डोळे उघडले. काल दिवसभरात फक्त चौदाच किलोमीटर सायकल चालवली. आज कोणत्याही परिस्थितीमध्ये लवकर निघायचं होतं. कारण नंतर रोहतांगला जाणाऱ्या गाड्यांचा तांडा अडचणी आणू शकतो.