स्वराज्य
माझे विचार..
"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच " असे लोकमान्य टिळकांनी इंग्रज सरकारला ठणकावून सांगितले आणि 1949 साली आपल्याला स्वातंत्र मिळाले, पण आज खरचं आपल्याला स्वातंत्र मिळाले आहे का? खरचं आपल्याला स्वातंत्र्याचा अर्थ माहीत आहे का? या स्वातंत्र्याने काय दिले हे माहीत आहे का ?
संविधानाने आपल्याला काही अधिकार दिलेत ते तरी माहीत आहे का? हां FC च्या टीचर सांगतात म्हणून आपल्याला काहीही बोलण्याचा ,आपले मत मांडण्याचा अधिकार आहे हे माहित आहे.
पण बोलणं म्हणजे नक्की काय? मत कधी व कुठे मांडावे ? आपण आपले मत मांडतो पण कुठे तर चार चौघात गप्पा मारताना किंवा स्वयंपाक घरात भाजी कोणती करावी हा विचार करताना. पण याला मत मांडणे म्हणतात का? जे आपल्या सदसद्विवेक बुद्धीला पटत नाही त्या विरोधात कणखरपणे बोलणे म्हणजे मत मांडणे होय.
आज आपल्याला अनेक संकटांना तोंड द्यावे लागते आहे. भ्रष्टाचार वाढला आहे, लोडशेडिंग वाढले आहे, जिकडे तिकडे आतंकवाद दिसतोय. या विरुद्ध बोलण्याचा अधिकार आपल्याला आहे.पण आपण ही या विषयी बोलत नाही आणि जो बोलतोय त्याला काही काम नाही म्हणून बोलतोय असं समजून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.
मग प्रश्न उरतो की आपण जिवंत तरी आहोत का? आणि असलो तर फक्त जगतोय. .का , कसे , कशासाठी काही माहित नाही.
आपल्या समोर एखादा अपराध धडला तर पोलीस त्रास देतील, कोर्टात जावे लागेल, आपली बदनामी होईल आणि याहून ही आपला वेळ वाया जाईल म्हणून आपण काही बोलत नाही. एखादी गोष्ट आपल्याला माहीत असते की ती वाईट आहे, चुकीची आहे तरी आपण त्याविषयी काही बोलत नाही तर काय उपयोग त्या अधिकाराचा ?
तुम्ही म्हणाल इथे आमच्या घरात आमचे कोणीही ऐकत नाही, बाकीचे कसे ऐकतील? मग म्हणून आपण या चार भिंतीच्या बाहेर पडायचेच नाही का?
मग आता सांगा मला आपण खरचं स्वातंत्र्याचे जीवन जगतोय का ? सांगा ना हेच का आपले स्वातंत्र ??
माहीराज
आपले नक्की कळवा ....
याद्या
2392
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
1949 साली आपल्याला स्वातंत्र
टक्या
स्वराज्य हा माझा
1948 चे चुकून 1949 झाले ..
Sorry 1947 साली स्वतंत्र झाला
लोकमान्य टिळकांनी बोललं आणि
लोकमान्य टिळकांनी बोललं आणि
In reply to लोकमान्य टिळकांनी बोललं आणि by माहीराज
अभ्या भौ
In reply to लोकमान्य टिळकांनी बोललं आणि by अभ्या..
अहो काय राव!
महीराज
ष राहिला महीराज मध्ये. ;)
In reply to महीराज by दत्ता जोशी
हा...हा...हा