Skip to main content

दीपा

लेखक चुकलामाकला यांनी गुरुवार, 04/02/2016 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
२६ जानेवारीची परेड पाहिली की दीपाची हमखास आठवण येते. सैन्यात जाऊन परेडमध्ये भाग घेणारी गावातील एकमेव मुलगी, दीपा गुरखा. गावच्या गुरख्याची मुलगी. गावाला खरंतर गुरख्याची गरज कधी नव्हतीच. कुणी चोरून असं मोठ्ठसं काय चोरणार? पण एक दिवस अचानक गावात गुरखा हजर झाला, बाजारेपेठेत दोन तीन सोनार होते. त्यांच्या पाया बिया पडून गस्त घालायला सुरवात केली. रोज रात्री बाजारपेठेत शिट्टी फुंकत, काठी आपटत गुरखा फिरत असे. नाक्या नाक्यावर "होशियाsssssर" अशी लांबलचक हाळी देत असे. पहिले काही दिवस सगळ्यांना याचं अप्रूप वाटलं. गावातील इतर दुकानदार देखील गुरख्याला महिना अखेर काही बाही पैसे देऊ लागले.

स्त्री - काल आणि आज

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 04/02/2016 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी चार भिंतींमध्ये जखडलेली स्त्री होती. रांधा वाढा उष्टे काढा आयुष्य ती जगत होती. कावळा तिला शिवत होता चार दिवसाची हक्काची सुट्टी तिला मिळत होती. स्त्री आज स्वतंत्र आहे घरा बाहेर पडली आहे. ऑफिसात जात आहे धंधा हि पाहत आहे. मुलांना शिकवत आहे स्वैपाक हि करीत आहे. थकलेल्या शरीराने अहोरात्र खटत आहे. कावळा आज शिवत नाही हक्काची चार दिवसाची सुट्टी हि मिळत नाही.
काव्यरस

..

लेखक प्रमोद देर्देकर यांनी गुरुवार, 04/02/2016 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
..मोकलाया दिशा दाही मठाधीपती.... तांब्या s मठ्ठा .... sपकॉर्न...पकॉर्न ... पाsपकॉर्न...पापकॉर्न....पॉपकॉर्न झाडाची फांदी ....संस्कृती ...विडंबन अमेरीकन स्त्रीवाद.... ... जिलेबी... जिलेबी...जिलेबी... नेलपॉलीश..टिंगलटवाळी ....व्यव व्यव व्यवच्छेद लक्षण...आरक्षण .. स्त्री पुरुष.. लाळ... गळत्येय... 'आनंदाचा प्रसंग आहे, दोन थेंब घे.... किलर खंडया.... अं हं खंडया किलर... रोहिथ वेमुला.... जात.... लदाख सायकलने बापरे!

विरजनातली साय

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी गुरुवार, 04/02/2016 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
संध्यासमयी पक्षी डोंगरापार गेले पिसे ठेवुनी बोडकेच आले ! बोडके कोणी नदीकाठी रडती उष्ट्या पत्रावळी कुत्री हुंगती ! ओलेती कोणी नग्न प्रदक्षीणेत ओला गर्भ दर्भाच्या प्रतीक्षेत ! रांड बाजारात रात्रीस दिवाळी अंधाराचे झापड दिवसाच्या भाळी ! जन्मास आला झाला सोहळा मरुनी सा-याना करे मोकळा ! माती वा राख मेल्यास काय ? आयुष्य म्हणजे विरजनातली साय ! विजयकुमार कणसे......... २१ नोव्हेंबर २००९

रामा मेघ दे : नाटकाच्या अगोदरचे पूर्वांक

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 04/02/2016 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
नाटक वेड्या मंडळीचे नाटक वेड हा एक लेखनाचा वेगळा विषय ठरावा. नाटकासाठी हे मंडळी कायकाय करतील सांगणे कट्।ईण आहे. स्टेजवर येवून सादरीकरण करतानाची उण्यापुर्‍या अडीच तीन तासांची ती झिंग त्याना आयुष्यभर जिवंत ठेवते. एखाद्या नाटकाच्या संहीता लिहीण्या पासून ते ते नाटक स्टेजवर अवतरणापर्यन्त प्रवास हा काही वेगळाच असतो. दक्षीण अफ्रीकेत असताना मी एक नाटक लिहिले. अस्सल आपल्या मातीतले. इकडे आल्यानंतर मी ते काही निर्मात्याना दाखवले. नाटकाचा विषय अगदी आपल्या नेहमीच्या परिचयातला. निर्मात्याना नाटकाची थीम आवडायची पण नाटकात पंधरा सोळा कलाकार आहेत म्हंटल्यावर गाडी व्यावसायीक गणीताच्या रुळांवर अडकायची.

चाफा

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 04/02/2016 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
वाटेवरी कुणाच्या आहे अजून चाफा! मंद परी जीवघेणा, आहे तसा पसारा! ऊन उठून येते रात्री, घर गोळा होते नेत्री! कुणी दिसते, कुणी विरते! परी चाफ्यापाशी सारे, हताश होऊन बसते! मंद परी जीवघेणा आहे तसा पसारा वाटेवरी कुणाच्याही असू नये गं चाफा! -शिवकन्या

लदाख सायकल ने : जिंगजिंगबार ते सरचू (भाग ६)

लेखक राजकुमार१२३४५६ यांनी गुरुवार, 04/02/2016 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी नऊ वाजता मुलांचा आवाज ऐकून जाग आली. इथे अजून काही वाटसरू होते. मेरठ वरून आले होते. आमच्याच शेजारचे. आजू बाजूच्या तंबू मध्ये सचिन ला शोधले. पण नाही दिसला. बहुतेक त्याने बारालाचा पार केला असेल. माझ्या पेक्ष्या तो अनुभवी पण आहे आणि शरीराने मजबूत. मी आपला हळू हळू कसा तरी इथे आलो. तो नक्कीच माझ्या पुढे गेला असेल.....

दिवस सातवा

सकाळी साडे पांच वाजता उठलो. शेजारच्या तंबू मध्ये मेरठ वरून आलेले शेजारी आज जायच्या तयारीत होते. त्यामुळे खूप गोंधळ चालू होता. त्यांच्या गोंधळाने मला पण जाग आली.

विज्ञान लेखमाला समारोप

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 04/02/2016 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, शशक आणि श्री गणेश लेखमालेनंतर आलेली विज्ञान लेखमालादेखील मिपाच्या सिद्धहस्त लेखकांनी आणि उत्साही वाचकांनी यशस्वी केली. बघता बघता विज्ञान लेखमालेचा शेवटचा लेखदेखील काल प्रकाशित झाला. आलेले लेख निवडताना आणि प्रकाशित करताना लेखकांच्या आणि विषयाच्या निवडीवर आमचा विश्वास तुमच्या प्रतिसादांनी सार्थ ठरवला. तसं म्हटलं, तर विज्ञान हा एक किचकट, बोजड आणि अनेकदा सर्वसामान्यांच्या कक्षेपलीकडील विषय. राजकारण आणि खेळ-जगताइतक्या, या दुनियेतील घडामोडी, बातम्या नेहमीच लोकांपर्यंत पोहोचतातच असं नाही. या दुनियेत घडणारा प्रवास, लागणारे शोध यांची आपली एक गती असते.