वाल्मिकी रामायण - रामसेतुचे पूर्ण सत्य
[रामसेततु बाबत अनेक भ्रम पसरलेले आहे. लोकांमध्ये व्याप्त भ्रम दूर करण्यासाठी वाल्मिकी रामायणानुसार श्री रामांनी समुद्रावर सेतु कसा बांधला त्याचे वर्णन].
वाल्मिकी हे ऋषी होते. त्यांनी तटस्थ राहून रामायणाचे लेखन केले होते. त्यांना असत्य लिहिण्याचे काही कारण नव्हते. श्री रामांची जीवन कथेचे वर्णन करताना, सत्य काय तेच निष्पक्ष पणे मांडले होते.
आपल्या सर्वांनाच माहित आहे. सेतु हा नदी, नाले ओलांडण्यासाठी बांधला जातो. सपाट जमिनीवर सेतु बांधला जात नाही. रामसेतु बाबत अनेक भ्रम समाजात पसरले आहे. आपल्या इतिहासाला भाकड कथा मानणारे, डोळ्यांवर विशिष्ट चष्मा लावलेले तथाकथित विद्वान, ज्यांच्या मते धनुषकोडी ते तलाईमन्नार (श्रीलंका) यांच्या मध्ये असणार १८ मैल लांबीच्या समुद्रात लाखो वर्षांपूर्वी प्रकृती निर्मित एक भोगोलिक संरचना आहे. या संरचनेला अडम ब्रिज किंवा रामसेतु असे ही म्हणतात. या अतिविद्वानांच्या अनुसार श्रीरामाने कुठला हि पूल समुद्रावर बांधला नव्हता. दुसरी कडे धुर सनातनी लोक म्हणतात. हाच तो सेतु आहे जो श्रीरामानी समुद्रावर बांधला होता.
दोन्ही बाजूंचे म्हणणे सत्य आहे. पण ते पूर्ण सत्य नाही. मला तर वाटते अधिकांश लोकांनी वाल्मिकी रामायण वाचण्याचे कष्ट हि केले नसावे. रामसेतुचे चित्र पाहिल्यावर सामान्य माणसाला हि सहज कळते कि या सेतुचा किमान ३०% टक्के भाग आजहि समुद्र पातळीच्या वर आहे. ५०-६० हजार वर्षांपूर्वी समुद्राची पातळी आजच्यापेक्षा बरीच खाली होती, त्यावेळी हत्ती, बिबट्या सारखे जंगली जनावरेहि भारतातून या प्राकृतिक संरचने वरून चालत जाऊन श्रीलंकेत पोहचले असतील. काही भारतीय इतिहासकारांच्या मते रामायण हे ७५०० हजार वर्षांपूर्वी घडले होते. त्या वेळी समुद्र पातळी आज पेक्षा निदान २० फूट आणिक खाली असेल. त्या वेळी या प्राकृतिक संरचनेचा ७०-७५% भाग टक्के भाग समुद्राच्या वर असेल. उथळ समुद्र असला तरीही कित्येक ठिकाणी समुद्राची खोली १०-१५ मीटर खोल असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अश्या परिस्थितीत प्रकृती निर्मित पुलावरून श्रीरामांच्या वानरसेनेला शस्त्र-अस्त्र आणि शिदोरी घेऊन श्रीलंकेला जाणे अशक्यच होते.
आता विचार करू श्रीरामांची वानर सेना समुद्र तटावर पोहचली. २०-२५ हजारांचे सैन्य निश्चित असेल. एवढ्या मोठ्या सैन्याला समुद्र पार करायचा असेल तर शेकडोंच्या संख्येने नौका निर्मित करावी लागली असती. त्यात पुष्कळ वेळ ही लागला असता. पण समुद्र उथळ आणि खडकाळ असल्यामुळे नावेतून पार करणे एक अवघड कार्य होते. खालील चित्रावरून स्पष्ट आहे, आज ही समुद्र पार करताना नौका मार्ग (ferry) रामसेतु पासून पर्याप्त दूर आहे.
आपल्या देशात आज हि दुर्गम भागातले ग्रामीण, पावसाळ्यात नदी किंवा नाल्यावरचा पूल वाहून गेल्यास, नदी नाल्यांवर, लाकडाचे ओंडके टाकून कामचलाऊ पूल तैयार करतात. त्याच प्रकारे श्रीरामांनीहि जंगलातील वृक्ष, लता, गवत, दगड-धोंडे वापरून एक कामचलाऊ पूल बांधण्याचा निश्चय केला. जेणे करून सैन्य समुद्र पार करू शकेल. अश्या प्रकारचे पूल बनविण्याचे तंत्र अवगत असलेल्या नील नावाच्या वानराने हे कार्य पूर्ण करण्याचा बीडा उचलला.
वाल्मिकी रामायणात युद्धकाण्डातल्या २२व्या सर्गात ५४-७३ या वीस श्लोकांत समुद्रावर पूल बांधण्याचे वर्णन केले आहे. यात रामनाम लिहिले दगड पाण्यावर तरंगले असे काहीच लिहिलेले नाही. वाल्मिकी रामायणानुसार, सहस्त्रो वानर जंगलात गेले. अर्जुन, बेल, अशोक, साल, बांबू, नारळ, इत्यादी अनेक जातींचे वृक्ष मुळापासून किंवा कापून समुद्र किनार्यावर घेऊन आले. या शिवाय गवत, लता इत्यादी सुद्धा. बलिष्ठ वानर मोठ्या-मोठ्या शिळा आणि पर्वतांना उपटून यंत्राद्वारे समुद्र किनार्यावर घेऊन आले. किनार्यावर कोलाहल व्याप्त होता - कोणी वानर माप घेण्यासाठी दंड पकडत होते, तर कोणी सामग्रीची जुळवाजुळव करत होते. मोठ्या शिळ्या समुद्रात टाकताना भीषण आवाज होत होता. गवत आणि लाकडांच्या द्वारा भिन्न-भिन्न स्थानावर वानर पूल बांधत होते. अश्या रीतीने केवळ पाच दिवसात वानरांनी हा पूल पूर्ण केला. श्रीरामाच्या सैन्याने या सेतुवरून समुद्र पार केला म्हणून या सेतुला लोक रामसेतु म्हणून ओळखतात.
वृक्ष, लता आणि दगडांचा उपयोग करून वीस पंचवीस हजारच्या सैन्येला उथळ समुद्रावर रामसेतुचा निर्माण करणे सहज शक्य होते. हा पूल कामचलाऊ असल्यामुळे काही वर्षांतच नष्ट झाला असेल. आजच्या घटकेला अर्थात ७५०० वर्षानंतर रामसेतुचे अवशेष सापडणे अशक्यच. पण हे मात्र निश्चित श्रीरामांनी समुद्रावर सेतु बांधला होता. कालांतरानी श्रीरामांच्या भक्तीत तल्लीन कवींनी आपापल्या परीने सेतु बांधण्याचे प्रसंग रंगविले.
टीप: वाल्मिकी रामायणातील सेतु बांधण्याचे कार्य कसे संपन्न झाले, युद्ध कांडातील, २२व्या सर्गातील काही श्लोक:
ते नगान् नागसंकाशाः शाखामृगगणर्षभाः ।
बभञ्जुः पादपांस्तत्र प्रचकर्षुश्च सागरम् ॥ ५५ ॥
ते सालैश्चाश्वकर्णैश्च धवैर्वंशैश्च वानराः ।
कुटजैरर्जुनैस्तालैः तिलकैस्तिमिशैरपि ॥ ५६ ॥
बिल्वैश्च सप्तपर्णैश्च कर्णिकारैश्च पुष्पितैः ।
चूतैश्चाशोकवृक्षैश्च सागरं समपूरयन् ॥ ५७ ॥
हस्तिमात्रान् महाकायाः पाषाणांश्च महाबलाः ।
पर्वतांश्च समुत्पाट्य यंत्रैः परिवहन्ति च ॥ ६० ॥
संक्षिप्त अर्थ: विशाल वानर जंगलात केले. तेथे जाऊन त्यांनी साल, अर्जुन, साल, अशोक, बांबू, नारळ इत्यादी अनेक मोठ्या मोठ्या वृक्षाना मुळासकट किंवा तोडून समुद्र किनार्यावर आणले. हत्ती समान विशाल वानरांनी मोठे मोठे पाषाण तोडून यंत्राद्वारे समुद्र किनार्यावर आणले.
समुद्रं श्रोक्षोयामासुः निपतंतः समंततः ।
सूत्राण्यन्ये प्रगृह्णन्ति व्यायतं शतयोजनम् ॥ ६२ ॥
दण्डानन्ये प्रगृह्णन्ति विचिन्वन्ति तथा परे ।
वानरैः शतशस्तत्र रामस्याज्ञापुरःसरैः ॥ ६४ ॥
मेघाभैः पर्वताभैश्च तृणैः काष्ठैर्बबंधिरे ।
पुष्पिताग्रैश्च तरुभिः सेतुं बध्नन्ति वानराः ॥ ६५ ॥
संक्षिप्त अर्थ:कोणी वानर माप घेण्यासाठी दंड पकडत होते, तर कोणी सामग्रीची जुळवाजुळव करत होते. मोठ्या शिळ्या समुद्रात टाकताना भीषण आवाज होत होता. सर्वत्र कोलाहल होता. गवत आणि लाकडांच्या द्वारा भिन्न-भिन्न स्थानावर वानर पूल बांधत होते. ॥इति॥
याद्या
33499
प्रतिक्रिया
119
मिसळपाव
अभ्यासपूर्ण लेख!!!
सहमत!!! आवडला!!!
In reply to अभ्यासपूर्ण लेख!!! by विद्यार्थी
बर्याचश्या भारतीय प्राचीन
उम्म्म. ते बरेच विवाद्य होईल.
In reply to बर्याचश्या भारतीय प्राचीन by डॉ सुहास म्हात्रे
प्रामाणिक प्रश्न
In reply to उम्म्म. ते बरेच विवाद्य होईल. by प्रचेतस
वेदांत ह्याचा उल्लेख नाही.
In reply to प्रामाणिक प्रश्न by दत्ता जोशी
टिळकांनी आर्क्टीक्ट होम वगैरे
In reply to वेदांत ह्याचा उल्लेख नाही. by प्रचेतस
नवीन पुरावा
In reply to उम्म्म. ते बरेच विवाद्य होईल. by प्रचेतस
एक प्रश्न आहे
In reply to नवीन पुरावा by रमेश आठवले
शास्वत माहिती
In reply to एक प्रश्न आहे by मालोजीराव
सारे अभ्यासक, संशोधक रामसेतु
काही भारतीय इतिहासकारांच्या
ह्याचाच अर्थ जरी मूळ कथा
In reply to काही भारतीय इतिहासकारांच्या by प्रचेतस
यात गोची आहे
In reply to ह्याचाच अर्थ जरी मूळ कथा by द-बाहुबली
मला ते 'लिहिले गेले आहे' ऐवजी
In reply to ह्याचाच अर्थ जरी मूळ कथा by द-बाहुबली
अश्मयुगापूर्वी अंधारयुग
In reply to मला ते 'लिहिले गेले आहे' ऐवजी by प्रचेतस
आन तेच्या आदी काय व्हतं?
In reply to अश्मयुगापूर्वी अंधारयुग by प्रचेतस
उत्क्रांती होत होती. ;)
In reply to आन तेच्या आदी काय व्हतं? by बिपिन कार्यकर्ते
ज्याला रूढार्थाने लिपी म्हणता
In reply to मला ते 'लिहिले गेले आहे' ऐवजी by प्रचेतस
ह्याशिवायही वाल्मिकिरामायणात
तसा काही विदा असल्यास द्यावा.
In reply to ह्याशिवायही वाल्मिकिरामायणात by मांत्रिक
पुराणांत काही गोष्टी
In reply to तसा काही विदा असल्यास द्यावा. by प्रचेतस
रामायण हे पुराण मानलं तर ते
In reply to पुराणांत काही गोष्टी by मांत्रिक
पुराण हा शब्द वापरणे माझी चूक
In reply to रामायण हे पुराण मानलं तर ते by प्रचेतस
मुळात रामायण हे आत्मरूपी
ताई
In reply to मुळात रामायण हे आत्मरूपी by मांत्रिक
ओ मी ताई नाहीये! दादा आहे.
In reply to ताई by कपिलमुनी
ओके
In reply to ओ मी ताई नाहीये! दादा आहे. by मांत्रिक
.
बिभिबिभिइषण बाकी हा कोण आता?
In reply to . by dadadarekar
कीबोर्ड आणि ब्राउजरचा अनौरस
In reply to बिभिबिभिइषण बाकी हा कोण आता? by मांत्रिक
बिभीषण
In reply to कीबोर्ड आणि ब्राउजरचा अनौरस by तर्राट जोकर
लैच तर्राट ब्वा =))
In reply to कीबोर्ड आणि ब्राउजरचा अनौरस by तर्राट जोकर
रामायण-महाभारताच्या
काल्पनिक! मग विषयच संपला की….
काव्य लिहिण्यासाठी काही आधार
In reply to काल्पनिक! मग विषयच संपला की…. by ट्रेड मार्क
इतिहास
In reply to काव्य लिहिण्यासाठी काही आधार by विवेकपटाईत
कोणी "पूर्ण सत्य" म्हणून काही
In reply to इतिहास by कपिलमुनी
ऋग्वेदाचा काळ १५००० वर्षे
In reply to काव्य लिहिण्यासाठी काही आधार by विवेकपटाईत
प्रचेतस भौंचे म्हणणे अगदी चुकीचे नाही.
In reply to काव्य लिहिण्यासाठी काही आधार by विवेकपटाईत
रामायण महाभारत काल (dating )
In reply to प्रचेतस भौंचे म्हणणे अगदी चुकीचे नाही. by दत्ता जोशी
अतिशय मोठा गैरसमज आहे असे
In reply to रामायण महाभारत काल (dating ) by मांत्रिक
https://www.google.co.in/url
In reply to अतिशय मोठा गैरसमज आहे असे by कैलासवासी सोन्याबापु
मला ही वैयक्तिक होण्यात रस
In reply to https://www.google.co.in/url by मांत्रिक
आपल्याला शिकवला जातो तो
महाराष्ट्रात तर इतिहास हा
In reply to आपल्याला शिकवला जातो तो by विजुभाऊ
.
In reply to महाराष्ट्रात तर इतिहास हा by बिहाग
रावण मेल्यावर त्याचे सोने बिभिषणाने घेतले.
In reply to आपल्याला शिकवला जातो तो by विजुभाऊ
सुंदर उपाय आहे.
In reply to रावण मेल्यावर त्याचे सोने बिभिषणाने घेतले. by dadadarekar
.
In reply to सुंदर उपाय आहे. by गामा पैलवान
दादा(काडी)कर तुम्ही वैतागत
In reply to . by dadadarekar
काका लेख आवडला
आधी प्रमाण रामायण ठरवा...
मी एक पुस्तक वाचले होते,
In reply to आधी प्रमाण रामायण ठरवा... by विक्रान्त कुलकर्णी
इथे सीरियसली वाटेल ते चालले
शास्त्रीय आधार
यात मुख्य गोम हीच आहे की
In reply to शास्त्रीय आधार by रमेश आठवले
सरस्वती नदी आणि काही कालखंड
In reply to यात मुख्य गोम हीच आहे की by प्रचेतस
याचे उत्तर
In reply to यात मुख्य गोम हीच आहे की by प्रचेतस
कालौघात झालेले बदल
बेस्टच!!!
In reply to कालौघात झालेले बदल by ट्रेड मार्क
चला, थोडा वेळ आपला मुद्दा
In reply to कालौघात झालेले बदल by ट्रेड मार्क
महाशय
In reply to चला, थोडा वेळ आपला मुद्दा by तर्राट जोकर
राम होता की नाही हा प्रश्न
In reply to महाशय by ट्रेड मार्क
राम ही वस्तू नसून मानव असावा असा माझा संशय आहे!
In reply to राम होता की नाही हा प्रश्न by तर्राट जोकर
चमत्कार सोडून राम नावाचा राजा
In reply to राम ही वस्तू नसून मानव असावा असा माझा संशय आहे! by ट्रेड मार्क
बापूसाहेब
In reply to चमत्कार सोडून राम नावाचा राजा by कैलासवासी सोन्याबापु
हा हा हा.. इथे तुमचा तार्किक
In reply to बापूसाहेब by ट्रेड मार्क
फारच घोळ घातलात…
In reply to हा हा हा.. इथे तुमचा तार्किक by सच्चिदानंद
प्रथमतः(इतर मुद्द्यांवर भाष्य
In reply to फारच घोळ घातलात… by ट्रेड मार्क
अच्च झालं का?
In reply to प्रथमतः(इतर मुद्द्यांवर भाष्य by सच्चिदानंद
जौ दे त्यांना काय कळंना काय
In reply to अच्च झालं का? by ट्रेड मार्क
अच्च झालं का?
In reply to अच्च झालं का? by ट्रेड मार्क
स्वामीजी…
In reply to अच्च झालं का? by सच्चिदानंद
पिरामिड हे आता कोडं आहे, उद्या सुटेलही.
In reply to राम होता की नाही हा प्रश्न by तर्राट जोकर
तुम्हाला कसा इतिहास पाहिजे हे
In reply to चला, थोडा वेळ आपला मुद्दा by तर्राट जोकर
लिहाच एक मालिका
In reply to तुम्हाला कसा इतिहास पाहिजे हे by कैलासवासी सोन्याबापु
सुबह सुबह हमरे चाचा की याद दिलायी.
In reply to तुम्हाला कसा इतिहास पाहिजे हे by कैलासवासी सोन्याबापु
सोयीनुसार सांगताय
In reply to तुम्हाला कसा इतिहास पाहिजे हे by कैलासवासी सोन्याबापु
तो हरामखोर औरंग्या कसा का
In reply to सोयीनुसार सांगताय by ट्रेड मार्क
असं म्हणू नका हो
In reply to तो हरामखोर औरंग्या कसा का by काळा पहाड
आजवर वैयक्तिक किती बगलबच्चे
In reply to तो हरामखोर औरंग्या कसा का by काळा पहाड
दगलबाजी घरच्यानी केली. औरंगजेबाने त्याचा राजधर्म पाळला.
In reply to तो हरामखोर औरंग्या कसा का by काळा पहाड
ह्या लॉजिकनी एक हजार वर्षांनी
In reply to कालौघात झालेले बदल by ट्रेड मार्क
:)
In reply to ह्या लॉजिकनी एक हजार वर्षांनी by सायकलस्वार
रामायणाचा काळ टिळकांनी
उगीचच राम भक्तांना नावे ठेवून
उगीचच राम भक्तांना नावे ठेवून
In reply to उगीचच राम भक्तांना नावे ठेवून by दत्ता जोशी
इथे रामभक्तांना कुणी नावे
In reply to उगीचच राम भक्तांना नावे ठेवून by प्रचेतस
धन्यवाद काका.
In reply to इथे रामभक्तांना कुणी नावे by दत्ता जोशी