Skip to main content

पुण्यात जरा ऊदासच वाटलं

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 07/02/2016 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात जरा ऊदासच वाटलं शुक्रवार पेठेत एक माकड मारलं रेल्वेने मग कोल्हापूरला गेलो महालक्ष्मी मंदिरात एक विंचू ठेचला मग बसस्टँडवर बिस्किटाचा पुडा खाल्ला चालत चालत मिरजेला गेलो वाटेत रुकडीला मुक्काम ठोकला सांगोल्याला मावशीच्या घरी तुऱ्याचा कोंबडा कापून खाल्ला पंढरपुरात जेव्हा पोहोचलो विठ्ठलाच्या नावानं टाळ कुटला चंद्रभागेत बुडी मारुन पुन्हा परतीचा रस्ता शोधला पुण्यात आल्यावर जरा ऊदासच वाटलं _________________ (आधारीत )
काव्यरस

घरच्या घरी कचरा व्यवस्थापन

लेखक रम्या यांनी रविवार, 07/02/2016 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
      बरेच दिवस मिपावर read only मोड मध्ये राहिल्यावर आज काही तरी टाइपायचा योग आला. तर आजचा विषय "घरच्या घरी कचरा व्यवस्थापन". या विषयावर ढीगभर माहीती जालावर उपलब्ध आहे. पण मराठीतून तशी कमीच. पुस्तकेही बरीच उपलब्ध असतील पण त्यामधे सर्वसाधारण पणे हे असं करा, तसं करू नका अशा स्वरुपाचे लिखाण पहायला मला मिळालं. पण काय करायचं? आम्ही पडलो संशयी! लोकांच्या कपाळावर जसं गंध असतो तसा आमच्या डोक्यावर कायमचं प्रश्नचिन्ह असतं! आम्हाला कायम "का?" हा प्रश्न पडलेला असतो. त्यामुळे सल्ल्यांनी भरलेलं पुस्तक सहसा माझ्या डोक्यात शिरतच नाही.

अ‍ॅडमिट किडा - कथा

लेखक सिरुसेरि यांनी शनिवार, 06/02/2016 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
--- अ‍ॅडमिट किडा ----- कथा --- काल्पनीक -------------- "अ‍ॅडमिट किडा !!!! " "किसका घर ???? " "मेरा घर ? मेरा घर ? तो झोपाळा !!!" वाड्याच्या आवारामध्ये मुलांचा खेळ अगदी रंगात आला होता . या खेळात ज्याच्यावर राज्य आहे त्याने एखादी जागा किंवा ठिकाण घर म्हणुन सांगायचे आणी मग इतरांनी त्याला चुकवत त्या जागेपाशी जायचे . यामध्ये जो पकडला जाईल त्याच्यावर पुढचे राज्य यायचे . मुले या खेळात अगदी गुंग झाली होती. दुपार झाली , उन वाढू लागले तरी मुलांना त्याचा पत्ता नव्हता . वाड्याच्या गेटपाशी उभे राहुन एक अनोळखी मुलगा खुप वेळ हा त्यांचा खेळ टक लावुन बघत होता .

शेअर ब्रोकर्सची सेवाही ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत

लेखक पुणे मुंग्रापं यांनी शनिवार, 06/02/2016 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. वर्गीस यांनी एका सार्वजनिक कंपनीच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर मिळणाऱ्या निवृत्तीवेतनाला जोड म्हणून शेअर्समध्ये पैसे गुंतवण्यास सुरवात केली. या व्यवहारात धोका गृहित असल्याने ते व त्यांची पत्नी मर्यादित रक्कम या व्यवहारात गुंतवण्याची काळजी घेत. परंतु "विनाश काले विपरीत बुद्धी " या न्यायाने मे. इंडिया बुल्स फ़िनान्शिअल सर्विसेसचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. चेरियन यांच्या सल्ल्याने भरीला पडून त्यानी म. टे .नि . लि. चे १०,००० शेअर्स प्रती शेअर रु. २१९/- या दराने विकत घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी इंडिया बुल्स कडून रु. २३/- लाखांचे कर्जही काढले.

मी आणि शाळेचे Reunion - (भाग १)

लेखक Anand More यांनी शनिवार, 06/02/2016 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
जिमला जायला सुरुवात करून एक महिना होऊन गेला होता. डोंबिवली उत्सव होऊन गेला होता. नूतन वर्षारंभ देखील झाला होता. वाढलेल्या थंडीने सकाळी लवकर उठून जिमला जायला कंटाळा येऊ नये म्हणून मी मुलांच्या आवाजातील "उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्यवरान, निबोधत… बाबा उठ… जिमला जायचंय ना तुला….उठा राष्ट्रवीर हो…. सुसज्ज व्हा उठा चला …" अशी वाक्ये फोनमध्ये रेकोर्ड करून त्यांचा अलार्म लावून ठेवला होता. रोज जिमला जात होतो. घाम गाळत होतो. आरशाकडे बघणे टाळत होतो. लिफ्ट सोडून जिने चढत उतरत होतो. बटन स्टार्ट असूनही बाईकला किक मारून चालू करीत होतो.

अहो मानवी बाईजी, अहो मानवी रावजी

लेखक माहितगार यांनी शनिवार, 06/02/2016 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
कविता हवी तशी जमली नाही, इतरांनीही कविता करून कावळ्यांना न्याय द्यायला हरकत नाही, आम्ही आमच्या परीने पैजारबुवांच्या आवाहनाला खालील प्रमाणे दाद दिली आहे. अहो मानवी बाईजी, अहो मानवी रावजी खोट्या बदनामीचा दंड भरून जावाजी, आम्हा कावळ्यांचा अन मानवी बायकांचा संबंधच काय तुमच्या बायांनी आम्हाला फुकाचं बदनाम केलं हाय अहो मानवी बाईजी, अहो मानवी रावजी खोट्या बदनामीचा दंड भरून जावाजी, तुमच्याकडन हाय दंडाच येण आमच घर मेणाच का शेणाच तुम्हाला काय देण घेण अहो मानवी बाईजी, अहो मानवी रावजी खोट्या बदनामीचा दंड भरून जावाजी, तुम्ही कर
काव्यरस

खरेदी पाहावी करून !

लेखक चिनार यांनी शनिवार, 06/02/2016 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
अमेझॉन अनं फ़्लिपर्काटचा जमाना आहे. सगळं काही एका क्लिकवर मिळतं. मोबाइल काय अनं कपडे काय अनं दागिने काय जे म्हणाल ते मिळेल. खिशात पैसे नसतील तर सुलभ हप्त्यांची सोय सुद्धा उपलब्ध आहे. शक्य तेवढं ह्या मोह्मायेपासून लांब राहण्याचा मी प्रयत्न करतो. कारण एक तर आपल्याला खरेदीचा कंटाळा! त्यात ,"पैसे काय झाडाला लागतात का रे ?" हे मध्यमवर्गीय संस्कार ! त्यामुळे मी या विषयावर लिहिण्याच तसं काही कारण नाहीये. पण कालपरवा एक घटनाच अशी घडली की मला ह्याचा गांभीर्याने विचार करणे भाग पडले. झालं असं की, आमच्या कंपनीच्या क्लायण्टला प्रायोगिक तत्वावर एक प्रोजेक्ट करून द्यायचा होता.

"गैर"समज!

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 06/02/2016 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
गैरसमज हे परस्पर आणि दुतर्फा संवादाने दूर होतात. वादविवादाने गैरसमज वाढतात. संवादाने आणि एकमेकांचे ऐकून घेतल्याने गैरसमज संपतात. संवादच होवू दिला नाही तर गैरसमज कधीच दूर होणार नाहीत. गैरसमज हा रुसलेला असतो. हटून बसतो. जातच नाही! त्याचे रुसणे दूर करायला संवाद हवा असतो. गैरसमज हा शेवटी "गैर" असतो. परका असतो. आपला नसतो! त्याच्या नावातच परकेपणा आहे. "गैर"समज! म्हणजे तो कधी ना कधी गैर होतोच आणि उरतो फक्त समज! ही समज ज्याला जितक्या लवकर येते तितक्या लवकर तो संवादाला तयार होतो आणि गैरसमजाला कायमचे "गैर" करतो आणि समजाला समजून घेतो. समजलं का?

लदाख सायकल ने : व्हिस्की ओढा ते पांग (भाग ८)

लेखक राजकुमार१२३४५६ यांनी शनिवार, 06/02/2016 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
एकटा यात्री असलं कि, खूप मज्जा असते. आपण फक्त आदेश सोडायचे, बाकीच्यांनी त्याचे पालन करायचे. तुम्ही किचन ओट्यावरती पण मांडी खालून बसू शकता. स्वतः तव्यावर्ती रोट्या भाजू शकता. आपल्या हातानी कुकर मधला डाळ भात घेऊ शकता. मुख्य म्हणजे आपल्या शेजारी लद्दाखी बसला आहे, त्याच्याशी घर कुटुंबाची , लाख-दुनियाची गोष्टी करू शकता आणि शेवटी शुभरात्रि म्हणून गाड्यांच्या ढिगा वरती चादर घेऊन झोपू शकता. काल ३७ आणि आज फक्त ११ च किमी सायकल चालवली.

दिवस दहावा

व्हिस्की ओढा आणि ब्राण्डी ओढा.