Skip to main content

चटपटीत आणि पौष्टीक अप्पे चाट

लेखक टक्कू यांनी शुक्रवार, 05/02/2016 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांना नमस्कार अनेक दिवसांनी मिपावर लिहिते आहे. लहान बाळाच्या मागे 'बिझी' असल्याने वाचायला, लिहायला विशेष वेळ मिळत नाही. पण हरकत नाही आता आले आहे. एक नवी कोरी संशोधित रेसिपी तुम्हाला खिलवायला. आपल्यापैकी अनेकांच्या घरी आप्पे हा प्रकार होत असेल. आप्पे हे मुख्यत्वे रव्याचे किंवा मिश्र डाळींचे बनवले जातात. काहीजण हे आप्पे गूळ घालून गोड बनवतात तर काहीजण तिखट. मी या आप्प्याचं रूप थोडं पालटायचा प्रयत्न केला; आणि बनवलं, आप्पे चाट. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

साहित्यः
आप्प्यांसाठी

बेधुंद - भाग १

लेखक अविनाश लोंढे. यांनी शुक्रवार, 05/02/2016 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
(ह्या कथेतील सर्व पात्र नाव बदल्यामुळे काल्पनिक आहेत ! २००६ मध्ये कधीतरी … ह्याचे किती भाग होतील हे आत्ता मलाही माहित नाही ! ) आयुष्य हे कधीकधी 'वेड' करणार असतं . दुपारी खूप झोपायचा प्रयत्न करूनही त्याला झोप आली नाही . डोळे फक्त झाकलेले पण मनात लाखो विचारांचं वादळ ! 'चक्रीवादळात' अडकल्या प्रमाणे त्याचे मन कितीतरी वेळा अगणित विचारांमध्ये भिरभिरत होतं अन एखाद्या विवश 'पाचोटाला' जस वाऱ फिरवून कुठेही फेकून देत अगदी तसं त्याच मन कुठल्यातरी विचारात अडकल अन घड्याळाच्या गजराच्या आवाजाबरोबर जाग झालं . डोळे उघडताच 'हर्षला' चे बोलके काळेभोर डोळे त्याला सतावू लागले .

चारोळी: गैरसमजांशी वैर!

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 05/02/2016 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
गैरसमजांशी जर करायचे असेल वैर, तर संवाद होवू द्या स्वैर! सुसंवाद फैलवा चौफेर, आणि वादाला दाखवा घरचा आहेर!!
काव्यरस

तहान

लेखक अज्ञात यांनी शुक्रवार, 05/02/2016 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
त तहा तहान तहान तहान कधी आईच्या प्रेमाची कधी बापाच्या शाब्बाशीची कधी आजी-आजोबांच्या लाडाची कधी मित्र-मौत्रिणींच्या भेटीची कधी प्रेयसीच्या झलकेची कधी बायकोच्या मिठीची कधी मुलांच्या ओढीची कधी मिटते कधी वाढते कधी लहान कधी महान तहान तहान तहान तहान म्हणजे तडफड तहान म्हणजे वणवण तहान म्हणजे कोरड तहान अगदी कहर तहान नाही संपत तहान ठेवते जिवंत तहान मिळवे पाणी तहान चाळवे भूक तहान करवे तमाशा तहान एक आशा तहान हीच भक्ती तहान हाच परमेश्वर तहान कधी पुण्य तहान कधी पाप तहान शिकवी तहान घडवी तहान तहान तहान तहा त #सशुश्रीके
काव्यरस

कर्दळी वनात जात आहात का ?

लेखक नितीनचंद्र यांनी शुक्रवार, 05/02/2016 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
कर्दळी वन ही जागा अध्यात्मिक दृष्ट्या अतिशय जागृत अशी सांगीतली जाते, यु ट्युब वर तर प्रा क्षितीज पाटकुले एक करोड व्यक्तीतली एक व्यक्ती कर्दळीवनाची यात्रा करते असा प्रचार करतात. कारणही तितकच प्रभावी आहे. इथे स्वामी समर्थ प्रकटले. ही यात्रा आंध्र प्रदेश सरकारने त्यांच्या टुरिझम पॉलीसीत बसते का यावर कोणी काही बोलत नाही. ही जागा आंध्र सरकारच्या वनखात्यात येते. या प्रदेशात वन्य पशुंचा संचार आहे. जिथे जेवणाची व्यवस्था नाही. जिथे संपर्काचे साधन नाही. कोणला साप चावला तर औषध नाही.

प्रतिशोध......

लेखक एक एकटा एकटाच यांनी शुक्रवार, 05/02/2016 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार .......... माझी ही नवीन कथा तुमच्या समोर सादर करतोय....... कथा थोडी मोठी आहे. खरतर कथेची लांबी पहाता ही दोन तीन भागात पोस्ट करायला हवी होती. पण अश्या कथा तुकड्या तुकड्यात विभागणे एक लेखक म्हणुन व्यक्तिगतरित्या मला योग्य वाटत नाही..... तरी ह्या कथेच्या सुरुवातीलाच नमुद करतोय की कथा थोडी मोठी आहे. सवडीने वाचा. आवडली तर नक्की सांगा.... *********************************************************************************************** प्रतिशोध............ तुंगारेश्वरच्या टेकडीवर आज बरीच गर्दी जमली होती. वातावरण तणावाचं होत. पोलीसांची तुकडी एव्हाना घटनास्थळावर पोहचली होती.

लदाख सायकल ने : सरचू ते व्हिस्की ओढा (भाग ७)

लेखक राजकुमार१२३४५६ यांनी शुक्रवार, 05/02/2016 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
अंगावर चादर घेऊन झोपलो. पण झोप काही लागेना बाहेर तोंड काढले कि नाकाला गार हवा लागायची. उंची वरती नाक कोरडे पडते. आणि चादर च्या आत डोके घेतले तर कमी हवे मुळे श्वास कोंडायाचा. रात्री ११ वाजता एक बस आली. रस्त्यामध्ये ती खराब झाली होती. म्हणून तिला उशीर झाला. हॉटेल वाल्याने डाळ भात द्यायला मनाई केली. मग म्हस्का पाणी लावल्यावर तो तयार झाला. वीस लोकांचे जेवण बनवलं. नंतर काही दुसरी कडे झोपायला गेले. काही इथेच तंबू च्या बाहेर पडले. ज्याला जिथे जागा मिळेल तो तिथे झोपला. त्यांच्यात एक जपानी पण होता. त्याने तिथेच बाहेरच्या बाहेर जागा बनवली आणि चादर घेऊन झोपला.

भिगवण

लेखक के.के. यांनी शुक्रवार, 05/02/2016 11:16 या दिवशी प्रकाशित केले.