Skip to main content

७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - रोहतांग पास आणि केलाँग

लेखक मोदक यांनी गुरुवार, 11/08/2016 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
************************ भाग १ - तयारी भाग २ - पुणे ते रोहतक भाग ३ - पानिपत भाग ४ - चंदिगड आणि मनाली ************************ मनालीमध्ये सकाळी उठलो, आवरले. आजचे मुख्य काम होते ते म्हणजे रोहतांग आणि लेहचे परमिट मिळवणे. परमिट मिळवण्यासाठी - मनालीमध्ये माल रोडजवळ परमिटचे ऑफिस आहे.

और क्या एहेदे वफा होते है - एक अविस्मरणीय गीत

लेखक शान्तिप्रिय यांनी गुरुवार, 11/08/2016 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
और क्या एहेदे वफा होते हैं । लोग मिलते हैं जुदा होते है। और क्या......... एहेदे वफा होते हैं । पंचम (आर डी बर्मन), आनंद बक्षी ,आशाताई(सोलो) आणि सुरेश वाडकर(सोलो) यांच्या प्रतिभेनी सजलेली एक मास्टरपीस संगीतकृती ! चांगुलपणा , चांगुलपणा म्हणजे काय? लोक एकत्र येतात आणि विभक्त होतात , जणू एकत्र येण्यातच विभक्त होण्याची बीजे रोवलेली असतात. जीवनात भेटणारे साठी केव्हा तरी विभक्त होतातच. जवळच्या व्यक्तीला त्रास देऊन आणि रडवूनच सुख मिळते काय? प्रेम विसरण्याची जणू जगाला सवयच असते. प्रेमातील उद्विग्नता व्यक्त करण्याचा एक प्रयत्न !

हिमालय, रॉली आणि मी ....

लेखक किल्लेदार यांनी गुरुवार, 11/08/2016 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
फार पूर्वी ठरवलं होतं की बाकी कुठेही कितीही उंडारलो तरी हिमालयात मात्र पन्नाशी ओलांड्यावरच जायचं. हिमालय म्हणजे विरक्ती आल्यावर जायचे ठिकाण अशी माझी काहीशी समजूत होती. पण एक दिवस हा पूर्वग्रह बाजूला सारून ६ वर्षांपूर्वी एकटाच कुमाऊं ला गेलो आणि माझ्या डोक्यातली जळमटं धूवून निघाली. त्यानंतर दरवर्षी मला हिमालय बोलावत राहिला आणि मी पण न चुकता जात राहिलो. इतका.. की त्यानंतर माझी आजवर दक्षिणेत एकही मोहीम झाली नाही. सात वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जी मैत्री टिकते ती कायम राहते असे कुठेशी ऐकले होते.

फेसबुक फेसबुक...

लेखक फुंटी यांनी गुरुवार, 11/08/2016 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
फेसबुक फेसबुक नो पप्पा फेक आयडी नो पप्पा वाचींग पोर्न नो पप्पा व्हिडीओ चाटिंग नो पप्पा गिव्ह मी युअर आयडी हा हा हा

राजाराम सीताराम........भाग १९......धूंद येथ मी स्वैर झोकीतो मद्याचे प्याले

लेखक रणजित चितळे यांनी गुरुवार, 11/08/2016 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या आधीचे.......... राजाराम सीताराम एक राजाराम सीताराम दो।...... भाग १ प्रवेश. राजाराम सीताराम....... भाग २... पुढचे चार दिवस. राजाराम सीताराम....... भाग ३... सुरवातीचे दिवस – भाग १. राजाराम सीताराम....... भाग ४... सुरवातीचे दिवस – भाग २. राजाराम सीताराम....... भाग ५... आयएमएतले दिवस. राजाराम सीताराम....... भाग ६... मसुरी नाइट. राजाराम सीताराम....... भाग ७… ड्रिलस्क्वेअर. राजाराम सीताराम....... भाग ८....शिक्षा. राजाराम सीताराम....... भाग ९....एक गोली एक दुश्मन।.... भाग १. राजाराम सीताराम....... भाग १०. .एक गोली एक दुश्मन।.... भाग २. राजाराम सीताराम....... भाग ११.

आशय - भाग २

लेखक किंबहुना यांनी गुरुवार, 11/08/2016 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना आणि भाग १ मी आशय, या कथेचा नायक. तुम्हाला कळले असेलच की आता मीच आत्मकथन करायला सुरुवात केलेली आहे. बाकी नमनाला घडाभर तेल घालून झालेले असल्यामुळे मी आता परत पूर्वपीठिका सांगत नाही, तर सरळ मुद्द्यावर येण्याआधी एक गंमतीशीर किस्सा सांगतो आणि मग मूळ मुद्द्यावर येऊ. मी साधारण सहावीत असेन. मला पहिल्यापासून पेपर वाचायची आवड, हातात कागद मिळाला की तो वाचलाच पाहिजे असा शिरस्ता. तेव्हा आमच्याकडे तरूण भारत यायचा. त्यात वेगवेगळे लेख असायचे. त्यातच एकदा एक लेख विवाहसंस्थेचा होता.

बादलीयुद्ध ६

लेखक जव्हेरगंज यांनी गुरुवार, 11/08/2016 02:17 या दिवशी प्रकाशित केले.
बादलीयुद्ध एक , दोन , तीन , चार , पाच ------------------------------------------------------------------------------- हार्ट अॅटॅकने कुदळे सर वारल्याची बातमी संध्याकाळी साडे सहाला आली आणि आम्ही हळहळ व्यक्त केली. त्यांच्या आठवणी वगैरे जाग्या करुन आम्हाला कोणी सांगतं की काय असं वाटलं.

हॉस्टेलः एक लढा!

लेखक संदीप डांगे यांनी बुधवार, 10/08/2016 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
"सुंदर भाषण" ह्या स्पाबंधोंच्या टिप्पणीने आम्हाला जरा अकरा-बारा वर्ष मागे नेले... जेजेत असतांना होस्टेलवर राहायला होतो. तिथेही असेच एक 'सुंदर भाषण' केले होते. त्या भाषणाची कारणे व परिणाम सांगायचा हा प्रपंच, ग्वाड मानून घ्या. जरी मी अकोल्यासारख्या शहरातून मुंबईत आलो असलो तरी मुंबईच्यासमोर अकोला म्हणजे सुमो रेसलरसमोर नुकतंच रांगायला लागलेलं पोर! मुंबैचा एक दबाव येतोच इथे येणार्‍या बाहेरगावच्या मुलांना - अपवाद पुण्याची मुले. आम्ही अकोला अमरावतीतून बारा जण आलो होतो. एकाच वर्गात होतो. होस्टेल अजुन मिळायचे होते.

सेक्स चॅट विथ पप्पु & पापा!

लेखक पिलीयन रायडर यांनी बुधवार, 10/08/2016 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षक वाचुन तुम्हाला जेवढा बसला तेवढाच धक्का मलाही बसला.नुकतीच ही वेब सिरिज पहाण्यात आली. एका ७-८ वर्षाच्या मुलाने आपल्या वडीलांना विचारु नयेत असे प्रश्न विचारल्यावर वडिल उत्तरं टाळण्या ऐवजी किंवा "देवबाप्पाने आकाशातुन आणुन दिलं" टाईप उत्तरं देण्या ऐवजी, जे खरं असेल ते सांगायचं ठरवतात. ह्याच विषयावर ही मालिका आहे. आमच्या लहानपणी हे असलं काही वडिलांशी तर सोडाच, आईशी सुद्धा बोलण्याची सोय नव्हती. आईने कधीतरी "पाळी" ह्या विषयावर थोडं सांगितलं होतं. जास्त चर्चा न करता जेव्हा पाळी येईल तेव्हा बघु असाच तिचा प्लान असावा. बाकी सर्व विषयांवर मिळणार्‍या माहितीचा मुख्य स्त्रोत मोठ्या बहिणी हा होता.

हरवलेलं विश्व (भाग ४)

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 10/08/2016 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
हरवलेलं विश्व (भाग १): http://www.misalpav.com/node/36836 हरवलेलं विश्व (भाग २): http://www.misalpav.com/node/36891 हरवलेलं विश्व (भाग ३):http://www.misalpav.com/node/36920 भाग ४ "तर.... नासराच्या आग्रहामुळे केरोहला देखील वाटू लागले की आपणही आपले पिरॅमिड बनवून घेतले पाहिजे. त्याने जेसाला बोलावणे पाठवले. आणि आपला विचार तिला बोलून दाखवला. जितका मोठा राजा तितके त्याचे पिरामिड मोठे आणि वैविध्यपूर्ण असायचे.