Skip to main content

सेकंड लाईफ - भाग ५

लेखक अक्षरमित्र यांनी मंगळवार, 16/08/2016 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
या अगोदरचे भाग : सेकंड लाईफ सेकंड लाईफ - भाग २ सेकंड लाईफ - भाग ३ सेकंड लाईफ - भाग ४ ----------------------------------------------- आज लवकरच उठलो. उठलो म्हणावं तर झोप तरी नीट लागली होती का ? नाहीच म्हणायला पाहिजे. लवकर लवकर आवरुन घराबाहेर पडलो. आई बाबांना रात्रीच सांगीतलं होतं की सकाळी लवकर जाणार आहे आणि २-३ दिवस बाहेरच रहावे लागेल म्हणून. रिक्शा पकडून एसटी स्टँडवर पोहोचलो.

उंच उंच झोका

लेखक जागु यांनी मंगळवार, 16/08/2016 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
झुला, झोपाळा, पाळणा प्रत्येकानेच अनुभवलेला असतो. सुगंधी, रंगीबिरंगी हारा-फुलांनी सजून, फिरत्या भिंगरीच्या खेळण्याच्या गमतीत, ठरलेले नाव फुला-रांगोळ्यांसह गुपित सांभाळत, कुणी राम घ्या, कुणी लक्ष्मण घ्या च्या सुरेल लयीत, बाळाचे नाव पाळण्याच्या कुशीत, पाळण्याच्या साक्षीने बाळाच्या कानात ऐकवून प्रचलित केले जाते. पाळणा गीताच्या सुरांवर बाळाच्या उंच झोक्यांची सुरुवात इथूनच होते. अशा प्रकारे अगदी बालपणापासूनच पाळण्याची संगत प्रत्येकालाच लाभलेली असते. वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे पाहण्यात येतात.

एक ओपन व्यथा भाग ९ (अंतिम)

लेखक वटवट यांनी मंगळवार, 16/08/2016 08:15 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटच्या भागाच्या निमित्ताने..... १. खरं तर अश्या प्रकारची लेखमालिका लिहायचा हा माझा पहिलाच प्रयत्न. त्यामुळे ह्या मालिकेत नक्कीच काही उणिवा राहिल्या असतील. पुढच्या वेळेस त्या नक्की सुधारेन. २. हे संपूर्ण लिखाण अज्जिब्बात म्हणजे अज्जिब्बात काल्पनिक नाही. ह्यातील प्रत्येक घटना मी एक तर अनुभवलेली आहे किंवा पाहिलेली आहे किंवा वाचलेली तरी आहे. मुद्दामच मी कुठल्याही प्रकारचा नामोल्लेख टाळला आहे. ३. हे लिखाण कोणाही जातीच्या वा धर्माच्या विरोधात नाही. एक साधारण ओपन व्यक्तीही किती हतबल होऊ शकते ह्याचं उदात्तीकरण मी केलं असं म्हटलं गेलं तरी मला ते मान्य असेल.

गो गोवा... भाग २

लेखक एनिग्मा यांनी सोमवार, 15/08/2016 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
गो गोवा... भाग १ ११:३० ला येणारी मंडळी बरोबर १२:३० ला माझा दारात होती. तासभर माझा जीव टांगणीला लागला होता. घरच्या बॉस सोबत पुन्हा आश्वासनांची उजळणी करून मी घरचांचा निरोप घेतला. गाडी जवळ आलो तर माझे तिन्ही परम मित्र माझी गळाभेट घ्यायला आतूर होते आणि मी ही. गाडी पण सांगितल्याप्रमाणे नवीन होती. गाठीभेटी झाल्यावर गाडीत बसायला लागलो तर तिथे मागच्या सीट वर कोणीतरी पांघरुणात लपलेल होत. मी हळूच विन्याकडे पाहिल आणि खुणावलं, " कोण?". "अरे तो आपला ड्राइवर आहे", विन्या. "ड्राइवर?

स्टँबिलाईझ्ड

लेखक फुंटी यांनी सोमवार, 15/08/2016 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
निष्काम ,निष्फळ सर्फींग निरिच्छ,निरंतर श्वसन हवेतही स्तब्धता ना हसू न आसू ना खेद न मोद स्टँबिलाईझ्ड मनात कसलीच इच्छा नसण यासारख सुख नाही गोष्टी घडत राहतात लेट देम हँपन तिथे गणपतीचे डेकोरेशन सुरू आहे मला ते करावस वाटत नाही एखादा व्याख्याता बोलवावा का प्रबोधनासाठी? लोक स्मार्ट आहेत .त्यांना गरज नाहीये. कुणालाही कसलीही गरज नसावी. इच्छा म्हणजे स्वार्थ

बादलीयुद्ध ८

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 15/08/2016 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
खिंडारात तर आजकाल कुणीही सापडतं. गावभर चर्चा वगैरे होते तो भाग वेगळा. मुळात खिंडारात कुणीही गेलं प्रेमाचे नवेनवे अविष्कार साजरे होतात. बर, बघणारे त्यावेळी तिथेच कसे हजर असतात हा ही मला प्रश्न आहे. परवा रात्री म्हणे तिथे निलम सापडली. नक्की कशाला गेलती किंवा नक्की कोणत्या पोझिशनमध्ये सापडली याचे डिटेल्स अजूनतरी आलेले नाहीत. मी काय अमोलची गाठ घेतली नाही. त्याला काही विचारलंपण नाही. उगाचंच त्याला डिवचणे योग्य नव्हते. अमोल एकतर फारंच लुकडा. डोक्यालापण अर्धवट टक्कल पडायला सुरुवात झालेली.

रम्य त्या बालपणीच्या आठवणी

लेखक Sanjay Uwach यांनी सोमवार, 15/08/2016 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
रम्य त्या बालपणीच्या आठवणी. सर्व सामान्य माणसाच्या जीवनाचे, विशेष असे कांही भाग किंवा टप्पे असतात.