Skip to main content

न्यू यॉर्क : ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 02/09/2016 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
=============================================================================== न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...               ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर...

त्या दोघी.

लेखक अंतरा आनंद यांनी शुक्रवार, 02/09/2016 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
त्या घरात दोघी बाया रहातात. एकीच्या पाठीवर पंख आहेत, तर दुसरीच्या पायात पैजण. दोघींना पहाटेची चिकार स्वप्न पडतात, ती स्वप्नं डोळ्यात घेऊनच त्या उठतात. पंखवालीला दिसते शुभ्र आकाश, निळे डोंगर, तर पैंजणवाली बघते सुंदर सजवलेलं नीटस घर. दोघी आपापल्या स्वप्नांना न्याहाळत रहातात, एकमेकींकडे पाठ करून स्वप्नांनाच जवळ करतात. घर बिचारं दमून जातं, पंखांच्या फडफडाटाला छेद देणारा, पैजणांचा छुमछुमाट ऐकत रहातं. दिवस मावळत येतो. पंख दमतात, पैंजण थकतात, दोघीजणी एकमेकींना सामोर्‍या येतात. पंखवालीला वाटतं, आपल्या पंखांचा छुमछुम आवाज व्हावा; तर पैंजणवालीला वाटतो तिच्या पंखांचा हेवा. दोघींच गळ्यात गळ

अमावास्या

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 02/09/2016 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
अमावास्या हा दिवस आपल्या कडे अशुभ मानतात .. वातावरणात अनेक अघोरी व अमानवी शक्ती वास करत असतात व त्या अमावास्येला कार्य रत होतात. या बाबतच्या दोन आठवणी .. १...भोसरीत तुफान पाऊस सुरू झाला होता... कारखान्यात अडकून बसण्याची वेळ आली..गाडी सर्विसिनंग ला टाकली होती तेवढात मित्राची गाडी दिसली व त्याला थांबवून रिक्षा स्ट्यांड पर्यंत सोडण्याची विनंती केली.. पुण्याचे भाडे म्हटल्यावर रिक्शावाला पण खूश.. पुल ओलांडला अन चौकात जाम होता. रिक्षावाल्याला म्हटले भाऊ..खडकीवरुन होळकर पुलावरून येरवडा मार्गे चल.. तो बोलेना..म्हटले ५-५० ज्यादा घे.. मागे वळून तो म्हणाला १००० दिले तरी आज नाही.. आज आमोशा..होळकर पुलावर आ

चांदोबा बाबत परत एकदा

लेखक गिड्डे यांनी शुक्रवार, 02/09/2016 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्ते मित्रांनो मी काही दिवसापुर्वी सर्व चांदोबा माझ्याकडे आहेत म्हणून एक पोस्ट टाकली होती . टाकताना असे वाटले की कोण वाचणार आणि कोण आजकाल वाचतो पण मित्रांनो सुरेख प्रतिसाद मिळाला भरपूर जणानी तर मला वैयक्तिक मेसेजेस केले.

<< हिशेब-ठिशेब>>

लेखक सस्नेह यांनी शुक्रवार, 02/09/2016 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : ओळखली ना ? ( डॉक खरेकाका ह घ्या..) मागच्या रविवारी संध्याकाळी नवऱ्या बरोबर फिरायला गेले होते.. (मुळात सकाळी संध्याकाळी आम्ही भरपूर भांडण करत असल्याने रविवारी संध्याकाळी आम्ही आवर्जून फिरायला जातो.) तेंव्हा आमचा एक पुतण्या रमेश तिथे फिरताना दिसला. नमस्कार चमत्कार झाल्यावर त्याला विचारले एकटाच इकडे कुठे फिरतो आहेस. त्यावर तो म्हणाला आम्ही इथे जवळच नवीन घर घेतले आहे. आणि आग्रहाने आम्हाला त्याच्या घरी घेऊन गेला. सगळे घर दाखवले कुठे काय कसे घर सजवले आहे हे बोलणे चालू होते. समीरा ( त्याची मुलगी) आता ५ वर्षांची झाली. ती कुठल्या शाळेत जाते.

“जेन्ट्स” टॉयलेट

लेखक हेमंत बेंडाळे यांनी शुक्रवार, 02/09/2016 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रास्ताविक हं एक ब्लॉग काय लिहिला फार मोठा लेखक झाला वाटतं “प्रास्ताविक” म्हणे. अहो अस काय म्हणता मागच्या ब्लॉगच्या घवघवीत यशानंतर ( काय विश्वास नाही बसत घवघवीत यश म्हणून बघा बर मोजुन ६ प्रतिक्रिया भेटल्या त्याला ( ठीक आहे, ठीक आहे २ माझ्या आहेत पण ... लोकांनी टाकल्या म्हणून टाकल्या ना मी , हो एकाने लिहिल आहे कि त्याला काही कळलं नाही म्हणून. काय नेहमीच आपला क्वालिटी क्वालिटी करतात लोकं, क्वांटीटी पण बघायची कधी कधी असो ..

ईच्छा

लेखक पथिक यांनी शुक्रवार, 02/09/2016 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
चांदण्यात एकदा न्हायचंय मला ताऱ्यांच्या गावाला जायचंय मला वेळूच्या बनात दूर किर्र रानात गातो जे गीत वारा, गायचंय मला रात्रीच्या काळोखात नदीच्या पात्रात सोडलेल्या दिव्यासंगे वाहायचंय मला अंधारात सुगंधाचा मागोवा घेत घेत स्वप्नांच्या गावाला जायचंय मला माझ्यात जो खोल खोल बसलाय दडून त्याचा रूप एकदा पहायचंय मला
काव्यरस

मला पडलेला प्रश्न

लेखक महेश शिपेकर यांनी शुक्रवार, 02/09/2016 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
रोजच्या जीवनात मला पडणारे प्रश्न शहर कोणतेही असो निवडणुका आल्यावर प्रत्येक रस्त्याच्या सुरूवातीला व शेवटी सदरचा रस्ता कोणत्या आमदार / खासदार वा नगरसेवकाच्या कुठल्या निधीतून झाला किती खर्च झाला ठेकेदार कोण होते असे भपकेदार पोस्टर / बँनर झळकत असतात पण जेव्हा त्याच रस्त्यावर खड्ड्याचां भुलभुल्लैया होतो नागरिकांच्या मनक्यांचा शाँक अबझाँरव्हर होतो वाहनांचा खुळखुळा आणि शरीराचा भुगा होतो तेव्हा हे आमदार खासदार ठेकेदार इतकेच काय त्या रस्त्याच्या कामाची जबाबदारी असणाऱ्या कर्मचारी/अधिकारी व ठेकेदाराचे पेमेंट करणारे आँडिटरची नावे कधीच कुणालाच कळत नाहीत टिप:- नागरिक ही ती शोधत नाहीत असं का??

गणपती उत्सव का इव्हेंट???...

लेखक निकुंज यांनी शुक्रवार, 02/09/2016 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
तीन दिवसां वर यिवुन ठेपलेल्या गणेश उत्सव हा महाराष्ट्र सह पुर्ण भारतत मोठया प्रमाणावर साजरा होतॊ. प्रदेशात राहणारे आपलेच भारतीय बांधव सुद्धा हा उत्सव आनंदाने साजरा करतात. गनपती म्हणजे महाराष्ट्रच आराध्य दैवत. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळची आणि घरगुती गणपती बसवंयरीची जय्य्त तयारी चालु सुद्ध झाली. पण गणपती आले की हमखास एक प्रश माझ्यामनामध्ये येतॊ. तो म्हणजे गणपती उत्सव का इव्हेंट???...