Skip to main content

१७ अगेन..

लेखक नीलमोहर यांनी गुरुवार, 01/09/2016 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी '१७ अगेन' हा झॅक अ‍ॅफ्रॉन, मॅथ्यू पेरीचा चित्रपट बघण्यात आला.

संस्कार म्हणजे काय (भाग- दोन)

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 01/09/2016 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे एखाद्या घटनेला कसे सामोरे जायचे हे अनुभवी व्यक्‍तीने नवशिक्याला समजावून सांगणे म्हणजे संस्कार, अशी संस्काराची ताप्तुरती व सुटसुटीत व्याख्या करता येईल.

लाहौल आणि स्पिती - एक अविस्मरणीय अनुभव (भाग 1)

लेखक पाटीलभाऊ यांनी गुरुवार, 01/09/2016 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार..._/\_ मिपावर लेख लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न. तरी लेखात काही चूक/त्रुटी आढळल्यास क्षमा असावी. गेले कित्येक महिन्यांपासून हा लेख लिहिण्याचा प्रयत्न करीत होतो…1-2 वेळा सुरुवातदेखील केली होती...पण या ना त्या कारणाने राहून गेले...आता अखेर हा लेख पूर्ण केला :) नोकरीला लागून तीनेक वर्ष झाली होती, आणि या मधल्या काळात छोटे-मोठे ट्रेक, कोकण आणि गोवा सोडून कोणतीही भटकंती झाली नव्हती. तेव्हा मित्र-मंडळीनी भटकंतीसाठी थोडे दूरचे आणि अलिप्त असे ठिकाण शोधण्यास सुरुवात केली. बरीच शोधाशोध केल्यानंतर शेवटी सर्वानुमते ठिकाण नक्की झालंच 'लाहौल आणि स्पिती'. आणि कधी तर ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा.

मी .....

लेखक ज्योति अळवणी यांनी गुरुवार, 01/09/2016 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
मी सूर्य.. मी रवि... मी दाह... मी अग्नि... विश्वाचा आधार मी जीवनाचा आकार मी प्रकाशाचा उगम मी श्वासातिल हुंकार मी सर्वस्वाचा पूर्णाकार मी तप्त जरी ... निराकार मी व्यापलेला अवकाश मी.... अन्... दाहाचा साक्षीदार मी चंद्राचा शीतल प्रकाश इंद्रधनूचा कोमलाकार तप्ततेचा स्वाहाकार मी एकटा... मी पूर्णाकार!
काव्यरस

अमेरिकेतले अनुभव - मेडिकल ट्रीटमेंट आणि इन्शुरन्स

लेखक ट्रेड मार्क यांनी गुरुवार, 01/09/2016 02:22 या दिवशी प्रकाशित केले.
पिराताईंच्या धाग्यावर म्हणल्याप्रमाणे अमेरिकेतील मेडिकल ट्रीटमेंट आणि मेडिकल इन्शुरन्स हा किती गंडलेला प्रकार आहे हा प्रत्यक्ष घेतलेला अनुभव. ही घटना घडली त्यावेळेला मी न्यू यॉर्क मध्ये कामाला व जर्सी मध्ये राहायला होतो. माझी पत्नी व मुली सुट्टीसाठी साधारण ३ महिने म्हणून अमेरिकेला आल्या होत्या. ते यायच्या आधी मी माझ्या कंपनीने दिलेल्या इन्शुरन्समध्ये माझ्या पत्नी व मुलींना सामील करण्यासाठी म्हणून विनंती केली. ती नाकारली गेली आणि कारण काय तर म्हणे ते फारच कमी दिवस येत आहेत. वर सांगितलं की त्यातूनही मला पाहिजे असेल तर मी घेऊ शकतो पण मग उर्वरित पूर्ण वर्षाचे पैसे भरायला लागतील.

माझीच मी...

लेखक आनंदमयी यांनी गुरुवार, 01/09/2016 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
शुभ्र कोऱ्या चांदव्याशी हासले माझीच मी धुंद हळव्या शब्दगंधी गुंतले माझीच मी.. लाख स्वप्ने गुंफुनी मी बांधली तारांगणे उसवता अलवार टाका उसवले माझीच मी सौख्यसमयी भोवताली लाख होते सोबती आणि दु:खाच्या घडीला सोबती माझीच मी हाय तू तुडवून जाता दूर प्रीतीची फुले त्या फुलांच्या अत्तरासम बहरले माझीच मी मतलबी सारेच येथे, नाहि कोणाचे कुणी मुखवटे नुसते सभोती, शेवटी माझीच मी! © अदिती
काव्यरस