Skip to main content

मृगजळ दिसण्याआधी ....

लेखक अविनाश लोंढे. यांनी सोमवार, 05/09/2016 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
एक नव्हतो आपण कधीच , तरीही आजपर्यंत दोघंही एकचं .... ! तू तुझी कारणं शोधत राहिलीस , अन मी माझ्या पळवाटा .... ! पीळ नको देऊस विचारांना , नियतीच्या खेळातले आपण खेळणं ' ! 'रानटी' भविष्याच्या ' रानात ' , कल्पनेच्या स्वप्नांला , अस्तित्वाच 'मरणं ! ' 'घाण' तू ही नव्हती , मीं ही नाही ...... मी सूर्य बघत राहिलो , तू आकाशगंगा ! खरं ते खरंच असत , जस तू अन मी .... पळणाऱ्या वेळेत , आंनद घे ... पळण्याचा ! जसा मी होतो , मस्त होतो , तुही 'मस्तच' होती , मृगजळ दिसण्याआधी ! तक्रार नाही नियतीची , पळणाऱ्या वेळेत , आंनद घे ... पळण्याआधी !

फॉकलंड युद्ध- अर्जेन्टिनाचे आक्रमण (१)

लेखक औरंगजेब यांनी सोमवार, 05/09/2016 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांचा सहजासहजी विजय झाला नव्हता. त्यातच ब्रिटन ची अर्थव्यवस्था हि भारत गमवावा लागल्यामुळे कमालीची ढासळली होती. दुसरी कडे दक्षिण अमेरिका खंडात एक वेगळाच कट शिजत होता. २ एप्रिल १९८२ ,कुठलाही संदेश न पाठवता अर्जेन्टिना ने आपल्या फौज फॉकलंड बेटांवर घुसवल्या. आणि सुरवात झाली एका युद्धाची. फॉकलंड बेटे हि ब्रिटिश स्वयंशासित समूह चा भाग आहेत. गव्हर्नर रेक्स हंट तिथे कार्यरत होता. पण ५७ मारिन आणि ११ सिविल गार्ड अशी आणि एव्हडीच ब्रिटिश फौज बेटावर होती. वात्स्तविक अर्जेन्टिना फॉकलंड बेटांवर हल्ला करू शकतो ह्याची ब्रिटनला कल्पनाच नव्हती.

लोकलपंची २.

लेखक अलका सुहास जोशी यांनी रविवार, 04/09/2016 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
लोकलपंचीच्या पहिल्या भागासाठी लिंक http://www.misalpav.com/node/37209 लोकलपंची २. पारसिक डोंगराचा कभिन्न अंधार कापत हिरव्यागार प्रदेशात लोकलसखू एकेकाळी शिरायची . ते नॉस्टेल्जीक दिवस आजही आठवतात . ठाणं एकदाचं उलथलं की "नवी पहा या ही दुनिया " असं निसर्गचित्रं रुळांच्या दुतर्फा उलगडत जायचं .गर्द हिरवा आसमंत लोकलसखीसाठी रुजामे अंथरायचा . डोंगरातल्या मुंब्रादेवीला टाटा करत सखू एक कुर्रेबाज वळण घ्यायची आणि गारव्यात डोंबीला शिरायची . फार नाही हो , फकस्त तीसेक वर्षांपूर्वीची ही गोष्ट . ठाणं सोडलं की पाऊण गाडी रिकामीच असायची .

दर्द ---- भाग २ ---------( कथा )-----------( काल्पनीक )

लेखक सिरुसेरि यांनी रविवार, 04/09/2016 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
दर्द - भाग १ या आधीचे इतर लेखन - अनुक्रमणिका दर्द ---- भाग २ ---------( कथा )-----------( काल्पनीक ) राघवची आणी देविकाची नंतर कधीच भेट झाली नाही . राघवनेही कधी तसा प्रयत्न केला नाही . देविकाने त्याला चांगलाच दर्दभरा धक्का दिला होता . त्यामुळे त्याच्या मनात कुठे तरी तिच्याबद्दल राग , द्वेश साठला होता . त्याने स्वताला परिक्षा , अभ्यास यामध्ये गुंतवुन घेतले .

शिका

लेखक स्वलिखित यांनी रविवार, 04/09/2016 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मिपा वर पहिल्यांदा काही शब्द अर्पण करत आहे .लेखनात व टंकनात चुका आहेत / असल्यास क्षमस्व. __/\__ आज शिकाने मनाशीच निर्धार केला होता. जर का आपल्याला उत्तर मिळालं तर शाबासकी मिळाल्या बिगर राहणार नाय असं शिकाला वाटत होतं. काय ना बाय कारणं दाखवून आज मुद्दाम बाकीच्या पोरांना त्याने मगाच गावात धाडलं होतं. उरली सुरली दोन जनावरं घेऊन गावाकडं आता निघाला होता. तसं म्हणलं तर आता कडुसच पडल होतं. पायाखालची वाटच काय ती दिसत होती तेवढी.

माहिती हवी आहे.

लेखक उपयोजक यांनी रविवार, 04/09/2016 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
खालील माहिती हवी आहे.बरीचशी शोधाशोध करुनही न मिळाल्याने मिपाकरांकडे आलो आहे.अाता सर्वजण गणेश आगमनाच्या तयारीत असतील.त्यामुळे नमनाला घडाभर तेल न घालता थेट प्रश्न विचारतो. 1)पूर्वी CNBC या वाहिनीवर GE (General Electric)corporation ची एक जाहिरात लागत असे.बरीच मोठी अशी ही जाहिरात होती.या जाहिरातीत tion वरुन शेवट होणार्या बर्याचश्या शब्दांचा,विशेषणांचा वापर केलेलं हे गाणं होतं याचा व्हिडिओ किंवा Mp3 आंजावर कुठे मिळेल? 2)संगीतकार यशवंत देव यांनी मल्याळी गायक के जे येसुदास यांच्याकडून गाऊन घेतलेलं "शब्दमाळा पुरेशा न होती स्पर्श सारेच सांगून जातो" हे सुप्रसिध्द गीत Mp 3 किंवा व्हिडिओ स्वरुपात आंजावर

आल्प्स च्या कुशित आम्ही खुशित !!! भाग २ उत्तरार्ध

लेखक सुहास बांदल यांनी रविवार, 04/09/2016 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
​​ मागील भागाची लिंक http://www.misalpav.com/node/37121 दिवस २ काल चा दिवस थोडा धावपळीत गेला होता त्या मुळे मस्त झोप झाली होती. सकाळी अपार्टमेंट वर च नाश्ता करून आम्ही १० ला निघालो ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत अपार्टमेंट ला परत यायचे असे मला सांगण्यात आले (जणु काही प्रवासात माझ्या मुळे च उशीर होतो.) कालच्या प्रमाणे आज पण मला कुठे जायचे आहे याची फारशी कल्पना नव्हती. मग प्रिया ने तिच्या 'Bucket List' मधील एक जागा मला सांगितली. तर आज आम्ही जाणार होतो 'अल्पाईन कोस्टर ग्लेशीयर ३००० ' ला.

स्वादिष्ट आटा नूडल्स

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 04/09/2016 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
काल संध्याकाळी सौ. बाहेर गेलेली होती. आमच्या चिरंजीवांना नूडल्स खाण्याची इच्छा झाली. आईच्या गैर हजेरीत, बाबा त्याच्या अशा खादाडीच्या इच्छा पूर्ण करतात हे त्याला चांगलेच माहित होते. मी म्हणालो नूडल्स करून देईल. पण मैदा वाले नूडल्सच्या जागी कणकीचे नूडल्स मिळतात का कुठे बघ. चिरंजीव उतरले, मला काही प्रोब्लेम नाही. पण नूडल्स स्वदिष्ट झाले पाहिजे आणि तो घरा बाहेर पडला. घरात कांदे होते, टमाटर हि होते, प्रत्येकी दोन-दोन घेतले. फ्रीज मध्ये फ्रेंच बिन्स हि होत्या. ७-८ शेंगा त्याही घेतला. मनात विचारकेला पाहू शेंगा नूडल्स मध्ये कश्या लागतात. बहुतेक या आधी कुणी नूडल्स मध्ये शेंगा टाकल्या नसतील.

केप टाउन ते क्रूगर व्हाया गार्डन रूट! ----भाग २

लेखक पद्मावति यांनी रविवार, 04/09/2016 03:22 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी उठून खिडकीच्या बाहेर बघितलं तर हवा छान वाटली. ब्रेकफास्ट रूम मधे खाली गेलो तर अरसुला तिच्या दोन सहायकांबरोबर स्वत: एप्रन बांधून कामे करत होती. हाताने कामे आणि तोंडाने अखंड गप्पा... चार पिढ्यांपुर्वी तिचे कुटुंब स्वित्झर्लंड मधून केप टाउन मधे स्थायिक झाले. रक्ताने स्विस असली तरी मनाने ती पक्की साऊथ आफ्रिकन आहे. काहीही गोंधळ झाला, प्रॉब्लेम आला तरी रिलॅक्स..यू आर इन केप टाउन.

बादलीयुद्ध १२

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 04/09/2016 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला डायलॉग. "गयी रे, मेरी गयी रे. कितनी अच्छी थी रे वो..... गयी रे... ह्या ह्या ह्या..." हे शेवटचं 'ह्या ह्या ह्या' म्हणजे रडण्याचा टोन. तो हसण्याचा की रडण्याचा यावर बरेच तर्क वितर्क होते. कसलेले कलावंत श्मामराव पोर्चच्या मधोमध तंगड्या वगैरे पसरुन आपला अभिनय पणाला लावत होते. "अबे या की आता" बराच वेळ खुदूखुदू रडून झाल्यावर त्यांनी रागाने फर्मान सोडले. दुसरा डायलॉग. "क्या हुआ गणपत ऐसा रो क्यू रहा है?" शेवटी कुणीतरी ढकलून दिल्यावर सागर नावाचं कॅरॅक्टर श्यामरावची चौकशी करायला गेलं. मग पुन्हा एकदा. "गयी रे, मेरी गयी रे. कितनी अच्छी थी रे वो..... गयी रे...