Skip to main content

भंडारदरा ते शिवनेरी: दोन दिवस ढगात.. भाग २

लेखक पी. के. यांनी शनिवार, 03/09/2016 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
भंडारदरा ते शिवनेरी: दोन दिवस ढगात.. भाग 1 सकाळी जाग आली ती पावसाच्या आवाजानं. खिडकीतून बाहेर बघितलं तर बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. गझर व्हायला आजून पंधरा मिनिटे बाकी होती. पाऊस माझ्या सर्व प्लॅन वर पाणी फेरतोय कि काय आस वाटू लागलं. प्लॅन कॅन्सल केला तर किती हास होईल त्याची फक्त कल्पना केली आणि आता माघार नाही असं ठरवलं. पाऊस फक्त नवी मुंबईत, बाहेर रखरकीत ऊन असा समज (गैरसमज) करून घेतला आणि आवरायला लागलो. रेनकोटची गरज पडणार हे माहित होतं पण इतक्या लवकर गरज पडेल वाटलं नव्हतं.

मला पडलेला प्रश्न ०२

लेखक महेश शिपेकर यांनी शनिवार, 03/09/2016 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
शहर कोणतेही असो १) कोणताही सामाजिक उपक्रम हा त्या भागातील मंडळे सादर करतात २) कोणतेही जन आंदोलन करताना तिथली जनता करते खरेच जर हे सामाजिक कार्य असेल तर दरवेळी सरकारला किंवा सरकारी अधिकारी अथवा जन प्रतिनिधीना जबाबदार न धरता जनतेलाच का वेठिस धरले जाते उदाहरणार्थ :- १) रस्ता रोको, चक्का जाम, सार्वजनिक वाहतूकिच्या साधनांची मोडतोड २) (आधी ठराविक ) आता सगळ्याच सण उत्सव, यात्रा, जत्रा यावेळी लावले जाणारे कर्णकर्कश्य त्रासदायक साउंड सीस्टिम टिप:- नागरिकांना याचा खरेच त्रास होतो तर ते आपल्या मुलांचे या बद्दल प्रबोधन का नाही करत कारण ते उपक्रम राबवणारे तसेच दगडफेक तोडफोडीत डांबले जाणारे कार्यक

सावली....

लेखक Jabberwocky यांनी शनिवार, 03/09/2016 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
मी सांगितल माझ्या सावलीला, जा तिला जाऊन भेटून ये. ती नाही भेटली तर, तिच्या सावलीशी बोलून ये. घट्ट मिठी मार तिला, थोडे अश्रूही गळूदेत खांद्यावर. तिलाही कळूदेत काय होत माझ, ती दूर दूर गेल्यावर. त्रास देउ नकोस तिला फक्त डोळे भरून पाहून ये. आणता आली तर तिची छवी, डोळ्यांत साठवून घेऊन ये. शांत बैस तिच्याजवळ, फक्त तिलाच बोलूदेत. येताना ते सगळे शब्द, कानात साठवून घेऊन ये. निघताना काही दिल तिने तर नको म्हणून सांगून ये. थोड प्रेम देऊन ये माझ, आणि थोडस तिच्याकडून घेऊन ये… आणि थोडस तिच्याकडून घेऊन ये…
काव्यरस

लोकलपंची.

लेखक अलका सुहास जोशी यांनी शनिवार, 03/09/2016 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई लोकल……..हिच्याबद्दल प्रेम वाटणारं कोणी असेल असं हिलाही वाटत नसावं. पण ती माझी फार आव़डती सखी आहे. सोळाव्या धोक्याच्या वर्षातल्या अतरंगी करामती वयापासून ते आजच्या ठाय लयीतल्या कुटुंबवत्सल आयुष्यापर्यंत हिने मला फार सुंदर साथ दिली आहे. लोकलचं बदलतं बाह्यरूप तो सब जाने है. पण तिची अंतरंग सुखदु:ख एखाद्यालाच सांगते ती. नीट ऐकणारा मात्र पाहिजे. तिचं टेचात येणं पहात रहावसं. व्ही.टी. ला संध्याकाळी पाचनंतर फलाटाच्या दुतर्फा तुफान गर्दीची खडी ताजिम स्वीकारत ती राणीसारखी येते. रूळांवरून मोहक नागमो़डी लचके घेत. जणू रँपवर कॅटवॉक करणारी सेक्सी शुश्मिता सेन. बाईपणाचा सारा नखरा तिच्यात असतो.

दोस्ता...

लेखक पगला गजोधर यांनी शनिवार, 03/09/2016 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रेरणा: आदूबाळ यांची समर ऑफ ६९ ची अनुवादित रचना पाहिली, आणि मीही एका इंग्रजी मालिकेच्या प्रारंभगीताचा मराठीत केलेला हा प्रयत्न ....
काव्यरस

हिशेब हिशेबाचा

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 03/09/2016 06:37 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा मागच्या रविवारी संध्याकाळी बायको बरोबर फिरताना माझ्या मित्राची भाची रुचिरा रस्त्यावरील शाहरुकच्या पोस्टर समोर उभी राहून, तोंडाचा चंबू करत सेल्फी घेताना दिसली. हाय - हॅलो झाल्यावर तिला विचारले एकटी इकडे कुठे फिरते आहेस. त्यावर ती म्हणाली आम्ही इथे जवळच नवीन अपार्टमेंट घेतले आहे. एवढे बोलून थोडा वेळ ती सेल्फी फॉरवर्ड करण्यात गुंतली, मग पाठ वळवून निघाली पण आम्हीच आग्रह धरल्याने नाईलाजाने ती आम्हाला तिच्या घरी घेऊन गेली.

हिशेब हिशेबाचा

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 03/09/2016 06:36 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा मागच्या रविवारी संध्याकाळी बायको बरोबर फिरताना माझ्या मित्राची भाची रुचिरा रस्त्यावरील शाहरुकच्या पोस्टर समोर उभी राहून, तोंडाचा चंबू करत सेल्फी घेताना दिसली. हाय - हॅलो झाल्यावर तिला विचारले एकटी इकडे कुठे फिरते आहेस. त्यावर ती म्हणाली आम्ही इथे जवळच नवीन अपार्टमेंट घेतले आहे. एवढे बोलून थोडा वेळ ती सेल्फी फॉरवर्ड करण्यात गुंतली, मग पाठ वळवून निघाली पण आम्हीच आग्रह धरल्याने नाईलाजाने ती आम्हाला तिच्या घरी घेऊन गेली.

गोखल्यांचे सीमोल्लंघन

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 03/09/2016 00:59 या दिवशी प्रकाशित केले.
गोखल्यांचे सीमोल्लंघन गोखले टिळक रोडवरच्या महाराष्ट्र बँकेत होते. बाजीराव रोडला घर आणि दूर टिळक रोडला नोकरी... असं खूप मोठ्ठं सीमोल्लंघन गोखले दररोज करीत असत. आमचे वडिल हे गोखल्यांचे श्रद्धास्थान. आयुष्यातली कोणतीही छोटीमोठी गोष्ट त्यांच्याशी शेयर केल्याशिवाय गोखले रहात नसत. आमच्या वडिलांची दाद त्यांना महत्त्वाची वाटे.

घाटवाटांची सायकल राईड - v2.0 - ताम्हिणी घाट (भाग ३) - समाप्त.

लेखक मोदक यांनी शनिवार, 03/09/2016 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
***************************** भाग १ - कुंभार्ली घाट भाग २ - कशेडी घाट ***************************** माणगांवला सकाळी उठलो.. आवरले. किरणने जाहीर केले की त्याला बरे वाटत नाहीये, हातही सुजला आहे त्यामुळे बहुदा तो वाटेतून टेम्पो घेईल. आजचे टारगेट होते ताम्हिणी घाट. अनेकदा सायकलने माणगांवला उतरून, अनेकदा ताम्हिणी, डोंगरवाडी वगैरे गावांना भेटी देवूनही आम्ही ताम्हिणी घाट कधीही सलग एका दिवसात पूर्ण केला नव्हता.

मनाचा एकांत - रवा आणि खसखस

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 02/09/2016 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
रवा आणि खसखस वेगवेगळे करायची शिक्षा भोगताना, सूक्ष्म नजरेने, एकाग्र चित्ताने, वेचत राहते मन जनामनातले साम्यभेद तासनतास, . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी! शिवकन्या