मिर्च मसाला
चल बे गां# दो भेल बना..
रात्रीच्या शांततेत झालेल्या शिवीगाळाने मी जरा दचकलो. अचानक विचारांची तंद्री तुटल्याने नाही म्हटले तरी जरा चरकलो.
हात धोता है क्या भो#&के, कही खुजलीवाले तो नही है ..
माझे लक्ष जाई पर्यंत तिथून आणखी एक शिवी आली होती..
दोन बेवडे एका भेल विकणारया बारा चौदा वर्षाच्या मुलावर 'चढत' होते. काहीतरी मोठा जोक झाल्यासारखे खिदळत होते. टपली मारल्यासारखे त्याला हूल देत होते.
रात्री दहा साडेदहाची वेळ! ईतर मुंबईला एव्हाना जाग असते. पण चुनाभट्टी स्टेशनचा शांत झालेला परीसर. वरवर निपचित वाटणारया गर्दुल्यांचा वावर. भुंकणारया कुत्र्यांचा सुळसुळाट.
मिसळपाव