मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तू फुलत रहा...

नूतन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
१०-१२ वर्षांपूर्वी एका प्रदर्शनातून आम्ही 'ॲडेनिअम 'चं एक झाड आणलं.छोटीशी बाल्कनी  फुलांनी बहरून गेली आहे अशी स्वप्नं कायमच पडायची.पण बागकामासाठी लागणारं ज्ञान, त्यासाठी खर्च करावा लागणारा‌ वेळ, इत्यादी इत्यादी गोष्टींच्या नावाने बोंबच होती. त्यामुळे फारशी काळजी घ्यावी लागणार नाही आणि बोन्साय.. (म्हणजे मुळातच मोठं झालेलं झाड . हो म्हणजे नवजात शिशु संगोपन करावं लागणार नाही!), या वैशिष्ट्यांमुळे खरं तर हे झाड आम्ही आणलं. शिवाय मी चाफाप्रेमी. त्यामुळे चाफ्याशी साधर्म्य असलेलं , वर्षभर फुलणारं हे  बोन्साय मनात भरलंच!

आदिमाय

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
तप्त तडिताघाताची दीर्घ मेघगर्जनेची मत्त सागरगाजेची जातकुळी एक ना? मोरपिसाच्या डोळ्याची खोल पाणभोवर्‍याची गूढ कृष्णविवराची जातकुळी एक ना? अगणित अभ्रिकांची शतकोटी शक्यतांची अनंताच्या उद्गमाची आदिमाय एक ना?

A Midsummer Night's Dream.

भागो ·
लेखनविषय:
A Midsummer Night's Dream संध्याकाळचे पाच वाजले कि माझी पाउलं शेट्टीच्या हॉटेलकडे वळतात. शेट्टीच्या हॉटेलमध्ये माझे एक खास टेबल आहे. शेट्टीला हे माहित आहे. मी येईपर्यंत तो त्या टेबलावर रिझर्वडची पट्टी लावून ठेवतो. त्या टेबलावरून मला रस्त्यावरची रहदारी पहायला आवडते. तसेच हॉटेलात बसलेल्या काही लोकांचेही दर्शन होते. त्यांना पाहून विचारांची गाडी स्वैर धावू लागते. किती शिकला असेल, कुठे नोकरी करत असेल, आपल्या आयुष्यात हा सुखी समाधानी असेल का? ह्या विचारांना काही अंत नाही. त्या दिवशी आकाशात ढग आले होते. पाउस पडण्याची लक्षणे होती. त्यामुळे हॉटेलात गर्दी नव्हती.

इच्छापत्र

कर्नलतपस्वी ·
लेखनविषय:
लेक मायेची खाण,माझ्या आईची सावली जशी झुळूक वार्‍याची, ग्रिष्माच्या काहीली लेक माझी प्राजक्त,मंद सुगंधाची जाण गेला घेऊन कुठे वारा, सुने झाले आंगणं ठायी ठायी विखुरल्या, तीच्या मखमली खुणा गोळा करता येतो,आवंढा गळ्यात पुन्हा पुन्हा लेक माझी गुणाची, तीचा पुनर्जन्म व्हावा बाप मी तीचा,पुनर्जन्मी तीचा लेक व्हावा.

निवडणूक, ऋषि सुनकांची

माहितगार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मंडळी पाश्चात्य देशीयांची दुसर्‍या देशांबद्दल सामान्य ज्ञान जुजबी असूनही भारता सारख्या असंख्य देशांच्या अंतर्गत राजकारणात यांची विद्यापीठे, प्रसार माध्यमे एन जी ओ, राजकारणी आणि त्यामागे असलेली शातीर मल्टीनॅशनल व्यावसायिक गणिते -आपले ठेवायचे झाकुन दुसर्‍याचे बघायचे वाकून- अशा स्वरूपात प्रचंड नाक खुपसत असतात. वसाहतवादाचा सुंभ जळाला तरी पिळ जात नाही.

मं...(मग)!

प्राची अश्विनी ·
लेखनविषय:
मं ..(मग?) मsssग कधीतरी 'रे' ची वाट बघून बघून थकलेल्या 'गं' चा स्वर चढतो. "मीच नेहमी हाक मारायची, मीच भेटायची बोलायची धडपड करायची, तुला काहीच नाही वाटत माझ्याबद्दल" या "मीचमी"च्या मुद्दूसूद भांडणात मग हळूच डोकावतो तो मं.. "राग येणार नाहीतर काय, मं(मग)? मुद्दामहून करतो का रे? मं(मग)?" हा मं एकटा नसतो, मागून त्याच्या ग असला तरी अध्याहृत, कळत नकळतसा.

रे.....!

प्राची अश्विनी ·
लेखनविषय:
रे!! रे तसा रोजच असतो सभोवताली पण कधीतरी अचानक गवसतो. आणि बघताबघता जीवाभावाचा रुहानी होतो. रेषेसारखा जरी सरळ असला तरी तसा गडी थोडा तिरपागडीच. म्हणजे रुढी रिवाजांच्या चौकटी न मानणारा. भूत भविष्याचं ओझं न वाहणारा, मोकळा, सुटसुटीत, आखीव रेखीव रे! कधी, आलं अंगावर घेतलं शिंगावर असा रांगडा , कधीकधी तर ऋषीसारखा स्थितप्रज्ञ तर कधी, राजमान्य राजश्री वगैरे वगैरे! पण रे ला पहायचं ते गं सोबत! एका रे ची तिथं किती ती रुपं! गं भोवती रिमझिमणारा, रुंजी घालणारा रुमानी रे! गं ला नखशिखांत राजवर्खी रंगात खुलवणारा रंगीन रे!

तात्या ......... !

चौथा कोनाडा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
तात्या वारला ! चंद्रशेखर अभ्यंकर असं भारदस्त नाव धारण केलेला हा आडमाप माणूस - वयाने आणि आकाराने माझ्यापेक्षा बराच मोठा होता. मोठा असूनही त्याला कधी अहोजाहो केलं नाही. तो वारला हे भिडेखातर लिहितोय - तात्या मेला अस लिहिलं पाहिजे. काही वर्षापूर्वी भारतात होतो तेव्हा तात्याच्या अनेक भेटी व्हायच्या. सोशल मीडियातून मला भरगच्च मित्र मिळाले. पुढे वेगवेगळ्या कारणांनी सगळेच दुरावले - त्यातला तात्या प्रमुख ! फेसबुक आणि ऑर्कुट लोकप्रिय व्हायच्या आधी - मिसळ पाव हा नव्या मराठी लेखकांचा अड्डा होता. तात्या त्यातला मुख्य माणूस.

लोकं पूर्वकल्पीत धारणा ठेवून एकमेकांशी का वागतात?

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
“मागच्या वेळी तुम्ही एखाद्याला पहिल्यांदा कधी पाहिलं होतं,त्याला भेटला होता आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व तुम्हाला जे वाटलं होतं तेच होतं का? कदाचित कधीच नसावं.विचार करा, एका दिवसात तुम्हाला किती वेळा “अरे, तो अबोल आहे”, किंवा “ती इतकी छान नाही” किंवा “ते तिथे का असतील?” असे प्रश्न मनात उद्भवले असतील. आजकाल, लोक नेहमी असं गृहीत धरतात की त्यांना इतरांबद्दल सर्व गोष्टी माहित आहेत. परंतु खरोखर, इतरांबद्दल, त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल, किंवा त्यांच्या भूतकाळाबद्दल, त्यांना अजिबात सुगावा नसतो. मग भाऊसाहेब, लोकं पूर्वकल्पीत धारणा ठेवून एकमेकांशी का वागतात?” असा प्रश्न कालच्या भेटीत मी प्रो.

गं...!

प्राची अश्विनी ·
लेखनविषय:
कसला वेल्हाळ आणि गोssड असतो हा 'गं'! मागचे "सा रे" विसरायला लावणारा, पुढलं "मा प" ओलांडू न देणारा, "धा नी" रंगात मोहरवणारा, पायाला हळूच मिठी मारणारा ठेहरावसा उंबराच जणू.. थोडासा सरळ, थोडासा वळणदार..