आदिमाय
तप्त तडिताघाताची
दीर्घ मेघगर्जनेची
मत्त सागरगाजेची
जातकुळी एक ना?
मोरपिसाच्या डोळ्याची
खोल पाणभोवर्याची
गूढ कृष्णविवराची
जातकुळी एक ना?
अगणित अभ्रिकांची
शतकोटी शक्यतांची
अनंताच्या उद्गमाची
आदिमाय एक ना?
वाचने
686
वाचनखूण
प्रतिक्रिया
0