Skip to main content

माईलस्टोन....

लेखक भम्पक यांनी सोमवार, 19/08/2024 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
खरं तर दहावीलाच लक्षात आलेलं त्याच्या.परंतु कोणावरही उगीच दडपण आणून काही करायला लावणे हे त्याला पटण्यासारखे नव्हते.म्हणजे स्वतःच्या मुलाबाबत सुद्धा.तरी त्याचे जवळचे मित्र सांगायचे बरका त्याला की पोरांना पूर्ण स्वातंत्र्य देऊन नाही चालत.अधून मधून टोकलं पाहिजे,रिव्ह्यू घेतला पाहिजे.तोही ठरवायचा पण पुन्हा तेच.होतंच नसे त्याच्याकडून.त्याला त्यावेळी त्याचा काळ आठवायचा की दादांनी कधीही त्याला टोकलं नाही की विचारले नाही.उलट त्याच्या कोणत्याही निर्णयांचे त्यांनी स्वागतच केले असायचे.अन त्यांचा विश्वास ही होता त्याच्यावर.तो सेम थिअरी लावीत होता स्वतःच्या पोराला.खरं तर त्याचं पोरगही खूप सिंसिअर.

मदत हवी आहे,,,

लेखक भम्पक यांनी सोमवार, 19/08/2024 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण १९८८-१९९० दरम्यान मी शाळेत ८ वि ते १० वि त असेल.त्या वेळी मराठीच्या पाठयपुस्तकात आम्हाला "अशी वाढते भाषा " नावाचा धडा होता. अतिशय समर्पक आणि परिणामकारक . लेखकाने इतक्या रसाळ पद्धतीने अन एकदम चुरचुरीत पद्धतीने मराठी भाषा कशी वाढते याबद्दल सांगितले होते. मला त्या धंद्यातील सर्व उदाहरणे लक्षात आहे .जसे हरताळ फासणे , संबंध ताणणे , ठिय्या देणे इ . परंतु लेखकाचे नाव नेमके आठवेना झालेय. तसे मी बालभारतीच्या अधिकाऱ्यांना मेल केलाय पण त्यांचे उत्तर काही येईना. आता मिपाकरांनाच विचारतो कि आपल्या वाचनात हा लेख आला असेल तर कृपया त्याच्या लेखकाचे नाव कळवावे. माझ्या मते श्री . म.

कृष्णाच्या गोष्टी-९

लेखक Bhakti यांनी रविवार, 18/08/2024 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
***धर्मराज्य हरपले युधिष्ठिराच्या हातून कृष्णाने धर्मसत्ता प्रस्थापित केली असली तरी, अभिषिक्त सम्राट युधिष्ठिर होता. त्या सत्तेचे तो केंद्र होता. त्यामुळे युधिष्ठिरालाच दक्षपणे नव्याने स्थापन केलेल्या धर्मराज्याचे संरक्षण करणे आवश्यक होते. ही गोष्ट युधिष्ठिराने ध्यानी घ्यावी आगि निश्चिततेची भावना मनात मुळीच बाळगू नये म्हणून महर्षी व्यासांनी युधिष्ठिराचा निरोप घेताना सम्राटाच्या या जबाबदारीची त्याला स्पष्ट जाणीव दिली.

हाय! कम्बख्त तूने पी ही नहीं।

लेखक मनस्विता यांनी शनिवार, 17/08/2024 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
M&B अलीकडेच कोथरूडमधील एक लायब्ररी बंद झाली. त्यांच्याकडे असलेल्या लाखो पुस्तकांचा ठेवा त्यांनी सवलतीच्या किमतीत विकायला काढला. खरं तर पुस्तकप्रेमींच्या दृष्टीने अत्यंत दुःखद घटना. पण म्हणतात ना उत्पत्ती, स्थिती आणि लय हा निसर्गनियम आहे. त्यांच्याकडील पुस्तकांचा काही ठेवा आपण आपल्या घरी आणावा म्हणून श्रावणी (माझी मोठी मुलगी) आणि मी तिथे गेलो. तिथे असलेली असंख्य पुस्तके तसेच आमच्यासारखे असंख्य पुस्तकवेडे तिथे गर्दी करून होते.

कोहम्: मानवी लैंगिकतेचा गोंधळ

लेखक kool.amol यांनी शुक्रवार, 16/08/2024 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
LGBTQ हा समुदाय गेल्या काही वर्षात कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत येत असतो. जगभर चालणाऱ्या त्यांच्या चळवळी, मागण्या, न्यायालयीन लढे हे आपण पाहत, वाचत असतो. आपली लैंगिकता ही जन्मापासून शेवटपर्यंत एकच राहते असं आपल्याला वाटतं पण काही जणांमध्ये ती बदलते सुद्धा. ती बदलता येते का? कोण आहेत ह्या समुदायातील मंडळी? असं काय वेगळं आहे त्यांच्या शरीरात? त्यांचं शरीर, भावना आणि लैंगिकता ह्यामागे काही वेगळं विज्ञान आहे का? असेल तर काय आणि नसेल तरी नेमकं काय? ह्या संकल्पना माणूस नावाच्या प्राण्यातच आहेत का? हे आणि असे अनेक प्रश्न काही घटनांमुळे वारंवार चर्चेला येत असतात.

चतुर्थी, षष्ठी आणि प्रथमा.

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 15/08/2024 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : मला व्याकरण हा विषय , त्यातही विशेष करुन संस्कृत व्याकरण फार आवडते ! संस्कृत तर साक्षात देववाणी देवाची वाणी षष्ठी तत्पुरुष समास ! प्रत्येक शब्दाला , अक्षराला अर्थ आहे , व्युतप्त्ती आहे . अभ्यास केला पाहिजे . कळलं पाहिजे ... कळलं पाहिजे .

१५ ऑगस्ट विशेष : प्रशस्त, अतिभव्य, अप्रतिमही!

लेखक पराग१२२६३ यांनी गुरुवार, 15/08/2024 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
Howrah junction या 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्याची 77 वर्षं पूर्ण होत असतानाच आणखी एका ऐतिहासिक घटनेला 170 वर्षं पूर्ण होत आहेत. ती ऐतिहासिक घटना म्हणजे हावडा रेल्वे स्थानकाची 170 वर्षपूर्ती.