Skip to main content

स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई!!

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 12/07/2017 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
'लेप्टोस्पायरोसिस' या प्रसंगी जीवघेणा ठरणाऱ्या आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी काय करावे, काय करू नये, हे सांगणारी एक जाहिरात सध्या मुंबई महापालिकेतर्फे सिनेमागृहांमध्ये दाखविली जात आहे.

खांडसहून शिडीघाट मार्गे पदरवाडी

लेखक ऋतु हिरवा यांनी मंगळवार, 11/07/2017 23:30 या दिवशी प्रकाशित केले.
८ जुलै २०१७ कर्जत जवळील खांडस या गावातून भीमाशंकर असे गिरीभ्रमण करता येते. पण आम्ही पदरवाडीपर्यन्तच जायचे ठरवले. यात मुख्य भाग होता तो म्हणजे थरारक असा शिडी घाट चढणे. ठाण्याहून सकाळी ७ वाजता निघायचे असे ठरले. मी अंबरनाथला रहात असल्याने ते मला पाइपलाइन रोडवर भेटणार होते. पण आमची एक मैत्रीणीला निघायला उशीर झाल्याने आणि त्यातच तिला इतर काही अडचणी आल्याने तिला पोचायला आणखीनच उशीर झाला. मग तिला अम्ही थेट बदलापूरलाच बोलवले. ती साधारण नउ सव्वानउ आली आणि मग आमचा प्रवास सुरु झाला. बदलापूर सोडले की विठ्ठल कामत हे उपहारग्रुह लागते. तिथे सर्वांनी नाश्ता केला. मग पुढे निघालो.

परीकथा - भाग पंधरा >> २.१० - ३ वर्षे

लेखक तुमचा अभिषेक यांनी मंगळवार, 11/07/2017 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
४ फेब्रुवारी २०१७ आमच्यावेळी पालकसभा व्हायच्या. पालकांना वर्गात बसवून आम्हा वर्गातल्या "निवडक" आठ-दहा मुलांना सर्व पालकांसमोर उभे केले जायचे. अश्या निवडक मुलांमध्ये नसल्यास तो आपला अपमान समजून मी नेहमीच त्यात असेन ही काळजी घ्यायचो. आणि मग आमची खर्‍या अर्थाने ‘शाळा’ घेतली जायची. त्यानंतर एक राऊंड घरीही व्हायचा तो वेगळा. पण आज परीच्या शाळेत पॅरेंट टीचर मिटींगला गेलेलो. फेस टू फेस. टीचर दोन आणि पॅरेंट मी एकच. आणि सुरु झाला नुसता कौतुक एके कौतुकाचा पाढा. शी इज वेरी वेरी रेज टू वेरी वेरी ब्राईट स्टुडंट. ती हे करते आणि ती ते करते, तिला हे ही जमते आणि तिला ते ही जमते.

तुझा निरोप घेताना

लेखक सिद्धेश्वर विलास पाटणकर यांनी मंगळवार, 11/07/2017 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
तुझा निरोप घेताना मन दाटून आले का कुणास ठावूक पण माघारी फिरताना मनी धैर्य कोठून आले मन हिमाच्छादित गोठले होते विचारांनी वेढले होते हात हलत होते निव्वळ तुझ्या हातांना प्रतिक्रिया म्हणून डोळे स्तब्ध होते हातांचे खेळ बघून आठवणींचा भृंग पिंगाया लागला क्लेशांचा अरी जोर धराया लागला जवळच एका पारावर बसून समस्त आठवणीना एक करून वाज वळू लागलो अश्रुनी दिवा भरून माघारी चालू लागलो सिद्धेश्वर विलास पाटणकर C

कुर्कुरीत रवा डोसा

लेखक पियुशा यांनी मंगळवार, 11/07/2017 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकर्स, खुप दिसानी उगवले मिपावर ;) नुकतच आमचं शुभ मंगल उरकल्यामुळे घर गृहस्थीतुन वेळ मिळणा झाला :) मग मिपावर येन दूरच .. तरी अधून मधून मिपावर चक्कर टाकायचे आता कळतय अरे संसार संसार ;) तर असो. आता आलेच आहे तर एक रेसेपी देऊनच जाते :) घ्या साहित्य : रवा १ वाटी तांदुळाची पिठी अर्धा वाटी २ चमचे मैदा ( ऑप्शनल ) कुणी बेसन पण वापरतात जिरे - चमचा भर आलं पेस्ट - अर्धा चमचा( ऑप्शनल ) दही - ३ चमचे मीठ - चवीनुसार हिरवी मिरची बारीक कापून किंवा पेस्टुन तुमच्या ऐपतीनुसार ;) कृती : वरील सर्व साहित्य पाणी घालून नीट पातळ मिक्स करून घ्या.

उध्दु . . तुला माह्यावर भरोसा नाय काय ?

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी मंगळवार, 11/07/2017 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
उद्धुचे वडील किती मोठे . . मोठे . . त्यांचे पण नशीब करंटे . . . . करंटे . . त्यांच्या पोटी आला हा गोटा गोल . . गोटा गोल . . उध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . . उद्धुचा मुलगा आदू . . . आदू . . . आहे तो पक्का लडदु . . . लडदु . . . पेंग्विनचा खर्च करतंय कोण . . करतंय कोण उध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . . उद्धुचा पेपर सामना . . . सामना . . . संपादकाला काही येईना . . येईना . . . गुहेचा झाला पांजरपोळ . . . . पांजरपोळ . . . . उध्दु तू माझ्याशी गोड बोल . . . गोड बोल . . . उद्धुची पार्टी आहे सत्तेत . . . सत्तेत . . . तरी मनाने विरोधकातच बसलेत . . बसलेत . .

ताम्हिणी घाटात एक रात्र

लेखक मंदार कात्रे यांनी मंगळवार, 11/07/2017 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
एक सौदीवाला , एक कुवेतवाला आणि एक ओमानवाला अशा तीन मित्रांची ओळख फेसबुकवर झाली २०१० मध्ये ... एक समान धागा म्हणजे तिघेही कोकणातले... सहासात वर्षात फेसबुक आणि इतर सोशल मीडिया वर धमाल मस्ती चाललेली ... पण तिघांच्या प्रत्यक्ष भेटीचा योग आला तो या वर्षी फेब्रुवारीत ... त्याच वेळी ठरले की या पावसाळ्यात कुठेतरी जंगलात एक रात्र काढायची... आम्ही गेली ३/४ वर्षे चालवलेल्या "भुताटकी"पेज ला नवीन स्टोरीज साठी काहीतरी मटेरियल सुद्धा मिळेल ही अपेक्षा ;) तर शेवटी होता होता ८-९ जुलै तारीख अन ताम्हिणी घाट फिक्स झाले . आम्ही दोघे रत्नागिरीकर पहाटेच्या रत्नागिरी दादर पॅसेंजर ने सकाळी १० ला कोलाड ला पोहोचलो .

आक्रमक चीनचा धोका

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 11/07/2017 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
पाकिस्तानला शिव्या देण्याची भारतीय नेते आणि जनता यांना तशी सवय झाली आहे. किंबहूना पाकिस्तानला शिव्या दिल्याशिवाय आमची देशभक्ती सिद्धच होत नाही. शत्रू जेवढा छोटा तेवढ्या शिव्या जोरात. हा भारतीयांचा ढोंगीपणा नेहमी पहायला मिळतो. चीनबद्दल मात्र आमची ब्र काढायची हिम्मत नसते, तिथे आम्ही भारतीय पेग गिळून गप्प बसतो. असो. पाकिस्तानबद्दल सध्या पुरे.

’हॅरी पॉटर’: कास्टिन्ग (भाग १)

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी मंगळवार, 11/07/2017 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
’हॅरी पॉटर’ म्हटलं कि सर्वात आधी आठवतात तीन नावं – अभ्यासात सर्वात हुशार असलेली हर्मायनी ग्रेंजर, थोडासा मस्तीखोर, घाबरट आणि एका उंदराच मालक असलेला रॉन विजली आणि द स्टार ऑफ द फिल्म अर्थात ’हॅरी पॉटर’ .... ही तीन पात्र ज्यांनी पडद्यावर रंगवली ती आता ३० च्या घरात आहेत. हर्मायनी रंगवली ती ब्रिटिश अभिनेत्री एमा वोट्सन या ब्रिटिश अभिनेत्रिने. पहिल्या भागात काय cute दिसते ती. रॉन विजली उभा केला तो रुपर्ट ग्रीन्ट याने. सुरुवातीला अगदीच वेंधळा वाटत असला तरीही पहिल्या भागाच्या शेवटी बुद्धिबळाचा डाव खेळताना काय सुंदर अभिनय केलाय पठ्ठ्याने.