Skip to main content

आला पावसाळा आला पावसाळा

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 14/07/2017 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
(आदरणीय कवी कुसूमाग्रजांची क्षमा मागून) || आला पावसाळा आला पावसाळा || आला पावसाळा आला पावसाळा प्रवाशांनो तुमची कंबर सांभाळा मनपाचे रस्ते खड्डेरी दुचाकी तयामध्ये घातली चुकवित चालली पाणी गाळा समोरून पहा कोण येतसे त्याचीही अवस्था तशीच असे उडविल पाणी; त्याला तुम्ही टाळा चारचाकीवालाही सुरक्षित नसे खड्डयात आदळता शिव्या देत असे न जाणो मोठी खोक ये कपाळा जनांच्या स्मृती गौरवे वंदुनी पुढिल ऋतूची वाट पाहूनी आरोग्यासी वित्त आपले जाळा - पाषाणभेद

१२ जुलै ची कोरडी शतकी सायकल सफर.

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी गुरुवार, 13/07/2017 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
१२ जुलै ची कोरडी शतकी सायकल सफर. जुलै उजाडल्या पासुन मना सारखी सायकल चालवायची संधी मिळत नव्हती .. २५/४० किमी च्या एक दोन किरकोळ राईड वगळता अर्धा जुलै गेला तरी फार काही झालं नाही सायकलिंग .त्यात दोन दिवस गिरिमित्रात गेले . अर्थात सत्कारणी लागले ते दोन्ही दिवस ..

रिचर्ड गेयर आणि चीन

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 13/07/2017 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा एकदा चीनने आपल्या डोक ला भागात घुसखोरी केली आहे. भारत, भूटान आणि तिबेट या देशांना जोडणारा हा भाग सामरिक दृष्ट्या फार महत्वाचा आहे. तेथे चीन सध्या रस्ता बांधत आहे. भारतीय जवानांनी ते काम रोखल्यावर चीनी लोकमुक्ती सेनेने तीन किमी आत येऊन भारतीय बंकर उध्वस्त तर केलेच पण आंतरराष्ट्रीय पातळीवर फार मोठा तमाशा करून भारतावर नियंत्रण रेषेच्या उल्लंघनाचा आरोप ठेवला आहे. यालाच मराठीत ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असे म्हणतात. आपल्यापैकी अनेकांनी ‘रिचर्ड गेयर’ हे नाव ऐकलेच असेल. रिचर्ड गेयर हा नव्वदीच्या दशकातला हॉलीवूड सुपरस्टार. त्याचे अमेरिकन जिगोलो, शिकागो, सारखे अनेक चित्रपट गाजलेले आहेत.

नॉस्टॅल'जीया'

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 13/07/2017 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईत राहिलो नाही जास्तं... पण कूलर ऐंड कंपनी सारखी इराणी हॉटेलं... क्या बात है टाइप फीलिंग! उरल्येत फारच कमी म्हणा... अगदी बोटांवर मोजता येतील इतकीच्! त्यातली डुगडुगणारी जुनी लाकडी टेबलं/खुर्च्या... जुने पंखे, जुने आरसे, जीर्ण मेनुकार्ड, जुने सॉसचे लाल खंबे, गल्ल्यावर विराजमान जुना मालक... त्याचा जुना 'अती'ट्यूड... जुन्या टेबलवरच्या जुन्या काचेच्या खालचं जूनं कापड... जूना ऐशट्रे, जूने जुळे सॉल्टपेपर, जुन्या मधुबाला पासून जुन्या ऐर्नोल्डचे रैंडम जुने पोस्टर्स, जूना फिडोडीडो नी जुन्या चार्ली चैप्लिनचे जुने स्टीकर्स, ताज्या अंड्यांच्या जुन्या क्रेटची इमारत, बाजूला फ्रेश स्लाइस-

दुबईमध्ये ड्रोन-टॅक्सी सेवा प्रकल्पाचा शेवटचा टप्पा सुरू

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी बुधवार, 12/07/2017 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
जागतिक विक्रम आपल्या नावावर आणण्यासाठी प्रयत्नशील असणार्‍या देश-शहरांमध्ये दुबईचा फार वर... बहुदा पहिला... क्रमांक आहे. किंबहुना असे करून आपले नाव सतत चर्चेत रहावे आणि त्याचा आपल्या महत्वाचे उत्पन्न असणार्‍या पर्यटन व बांधकाम व्यवसायांना उपयोग व्हावा असा दुबई प्रशासनाचा सतत प्रयत्न असतो. असे "गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड"ने दुबईच्या नावावर नोंदवलेले ४१७ जागतिक विक्रम इथे पहायला मिळतील.

ही कविता फॉरवर्ड करा

लेखक vcdatrange यांनी बुधवार, 12/07/2017 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
ही कविता फॉरवर्ड करा ही कविता फॉरवर्ड करा, नाही तर पाप येईल रात्री झोपल्यानंतर, तुमच्या घरात साप येईल पाच जणांना फॉरवर्ड करा, हरवलेली वस्तु सापडेल नाही केली तर, भुत तुमच्या कानाखाली झापडेल दहा जणांना फॉरवर्ड करा, सोन्याचा हार मिळेल नाही केली तर, पाठीवर मार बेसूमार मिळेल पंचवीस जणांना फॉरवर्ड करा, स्टॉक मार्केट चढेल, नाही केली तर कावळ्याचं शिट डोक्यावर पडेल पन्नास जणांना फॉरवर्ड करा, नोकरीत प्रमोशन होईल नाही केली तर, सकाळ संध्याकाळ लूज मोशन होईल शंभर जणांना फॉरवर्ड करा, लॉटरी मिळून जाईल नाही केली तर, बायको तिच्या मित्राबरोबर पळून जाईल

या वेड्याला न कसला लोभ , ना कुणाचा राग

लेखक सिद्धेश्वर विलास पाटणकर यांनी बुधवार, 12/07/2017 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
या वेड्याला न कसला लोभ , ना कुणाचा राग नको इस्टेट , नकोय कसला वाद हवाय तो फक्त आणि फक्त वाचकांचा आशीर्वाद भावनांच काय ते त्या तर येतचं असतात काही उमटतात पत्रावर तर काही पंचतत्त्वी विलीन होतात या मनातील लाव्हास जर मिळेल आपुल्या प्रेमाचे इंधन शब्दांचा वणवा मग भडकेल असा काही नसेल त्याला कुठलेच बंधन पर्वणीची त्या वाट पाही सरस्वती ती उभीच राही चारी दिशा बघत राही साद तरी येत नाही साद तुम्ही द्याल तर पेटून उठेन मी अन नाही दिलीत साद तर आतल्या आत मिटेन मी सिद्धेश्वर विलास पाटणकर C

लॉटरी

लेखक aanandinee यांनी बुधवार, 12/07/2017 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
लिफ्टमधून बाहेर पडेपर्यंत तिच्या हातावरची त्याची पकड घट्ट झाली होती. तिचं काळीज धडधडू लागलं. घरी गेल्यावर आपली धडगत नाही हे ते कळलं होतं. “मी खरच कधीच बोलले नाही तिच्याशी. लिफ्टमधे तिने hi केलं तेव्हा मी फक्त हसले” घरात शिरल्या शिरल्या तिने घाबरून सांगितलं. “खरंच?” संजयने उपहासाने विचारलं. “तू क्वीन एलिझाबेथ आहेस ना! की तू बोलत नाहीस आणि लोकंच आपण होऊन तुझ्याशी बोलायला येतात.... इतकं, इतकं कठीण आहे एक सांगितलेली गोष्ट पाळणं? लोकांशी बोलू नको, बोलू नको कित्ती वेळा सांगितलंय!” चिडून तिच्या अंगावर ओरडत तो पुढे सरकला. तिच्या केसांना हिसका देऊन त्याने तिचं डोकं, केसांना धरून घट्ट पकडलं.

स्वच्छ भारत!

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 12/07/2017 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
बेस्टची एक खच्चून भरलेली बस. पुरुष प्रवासी पॅसेजमधेही उभे आहेत. महिलांसाठी राखीव बाकडी मात्र, एका महिला प्रवाशासाठी पूर्ण बाकडे अशा हिशेबाने भरलेले! लक्षपूर्वक ध्यान दिले, तर जवळपास प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर, पुरुष प्रवाशांना खुन्नस दिल्याचा भाव दिसतोय! अचानक पावसाची सणसणीत सर आल्याने खिडक्यांच्या काटा फटाफट खाली ओढल्या जातात, आणि पावसामुळे ट्रॅफिकही जॅम होते. गाडी जागेवरच! दोनच मिनिटांत उकाड्याने गर्दी कासावीस होऊ लागते. घामाच्या धारा सुरू होतात. अशा वेळी अस्वस्थता येते. चीडचीड होते.