Skip to main content

ये,बैस ना जराशी...

लेखक सत्यजित... यांनी शुक्रवार, 07/07/2017 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
ये,बैस ना जराशी,कर बात चांदण्याची दररोज येत नाही ही रात चांदण्याची! हिणवून काल मजला,गेलाय चंद्र रात्री दे दाखवून त्याच्या औकात चांदण्याची! कळतेय ना मलाही,होतो उशीर आहे कवळून जा उराशी तादात चांदण्याची! येतेस तू अताशा,स्वप्नात रोज माझ्या स्वप्नांत भेट होते साक्षात चांदण्याची! स्वप्नांत चांदण्याच्या,गेल्या कितीक राती घेवून रात ये तू दारात चांदण्याची! आलीस ना छतावर झटकून केस ओले? शहरात होत आहे बरसात चांदण्याची! —सत्यजित

भवताल

लेखक चंद्रकांत यांनी शुक्रवार, 07/07/2017 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
भवताल भंजाळलेला भवताल, भरकटलेली माणसे आणि अस्वस्थ वर्तमान नियतीने निर्धारित केलेलं प्राक्तन की, स्वतःच आखून घेतलेली वर्तुळं संस्कृती केवळ एक शब्द नाही प्रदीर्घ वाटचालीचा इतिहास सामावलेला आहे त्यात माणसाच्या अस्तित्वाचा पण तोही आक्रसत चाललाय एकेक पावलांनी कुठून कुठून वाहत येणारे प्रवाह अथांग उदरात साठवत राहिला शतकानुशतके कोरत राहिला अफाट काळाच्या कातळावर लेणी सजवत राहिला साकोळलेल्या ओंजळभर संचिताला क्षणपळांची सोबत करीत चिमण्यापावलांनी पळत राहिला सुंदरतेची परिमाणे शोधत दिशा बदलली वाऱ्यांनी अन् पडले मर्यादांचे बांध कणा कणाने निसटतो आहे हातून वर्तमान वाहत्या प्रवाहांना पायबंद घातले आहेत पर

आळशांची कहाणी ( भाग १ )

लेखक अरूण गंगाधर कोर्डे यांनी शुक्रवार, 07/07/2017 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, आता श्रावण महिना चालू होईल. म्हणजे कहाण्यांचा महिना. आपण मागच्या पिढीतील असाल तर नक्कीच कहाण्या ऐकल्या असतील. किंवा गंमत म्हणून तरी वाचल्या असतील. साधारणपणे चांगली कामे करणारे, सात्विक वागणारे, किंवा सात्त्विक वागण्यावर भर देणाऱ्या लोकांवर कहाण्या लिहिल्या जातात. पण आळशी माणसांवर कोणी कहाणी लिहिल्याचं दिसत नाही. कहाणी लिहिणाऱ्यांना माणसाचा हा परंपरागत गूण लक्षात आलेला दिसत नाही. ही कहाणी वाचल्यावर कदाचित आपणही नवीन कहाणी रचू शकाल. या कहाणी मुळे जर कोणाच्या भावना वगैरे दुखावल्या गेल्या तर आधीच माफी मागत आहे.

चाल आणि वेग (Speed and Velocity) - सुधारित आवृत्ती

लेखक अनिकेत कवठेकर यांनी गुरुवार, 06/07/2017 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
(तपशील आणि गृहितकांमधील दुरुस्तीनंतर पुनर्प्रकाशित) रात्रीचा, त्यातही अमावस्येच्या एका काळ्याकभिन्न रात्रीचा पहिला प्रहर सुरू होऊन सर्व श्वापदांचं काळजाचा थरकाप उडवणारं आवाजी विश्व हरणापासून सश्यापर्यंत सर्वच भित्र्या प्राण्यांना लपायला भाग पाडत होतं. परंतु आज विक्रम मात्र वेगळ्याच विश्वात होता व पाठीवर मोळा असल्यागत वेताळाला घेऊन चालला होता. वेताळालाही हे लक्षात येत होतं. “अरे विक्रमा, वेताळ तर मी आहे. पण तुझ्या मनावर कोणीतरी दुसरंच स्वार दिसतंय. आत्ता उतरवतो बघ. एक कोडं घालतो आणि मला लगेच त्याचं उत्तर हवंय. समजा तुझ्या राज्यात चार मल्ल आहेत.

शिवस्तुती

लेखक अरूण गंगाधर कोर्डे यांनी गुरुवार, 06/07/2017 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
आदिदेव महादेव नटभैरव नटरंग करी तांडव आंदोलन होई भयकंपन नटराज पंचवदन अतिरुद्र महांकाल दशहस्त काळाग्नी रुद्र गळा सर्पाभरण महातत्व महाप्रचंड जाळितसे मदन वदन विरक्त महायोगी महागुरू जगत्कारण भूतगण शिवगण पूजिती मायेसहित गजानन भावभोळा शिवशंकर होई वरदायक देई शुद्ध भक्ती मुक्ती आम्हां तारक गंगाधरसुत म्हणे होई मज आश्वासक
काव्यरस

II तो स्पर्शच नवा होता II

लेखक सिद्धेश्वर विलास पाटणकर यांनी गुरुवार, 06/07/2017 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
तो स्पर्शच नवा होता का कुणास ठाऊक भासे हर एक भेटीची, अपूर्वाई उमजे ना मज कारण का तो कायम हवा होता II चुकून लागलेल्या धक्क्याने भवताली दाट धुके झाले सुचले नाही क्षणभर मन कायमचे मुके झाले भर ग्रीष्मात मज बाधला प्रेम शिशिराचा गारवा कारण , कारण ..... कसं सांगू तुम्हाला तो स्पर्शच नवा होता II शुष्क होते मन माझे सत्वास मी जागलो का जाणे सैरभैर धक्क्यापरी वागलो हळू हळू अंतराने रंग घेतला नवा पालवी ती जागोजागी देठही तो हिरवा कारण , कारण ..... कसं सांगू तुम्हाला तो स्पर्शच नवा होता II सिद्धेश्वर विलास पाटणकर C

भीमाशंकर - सायकल सफर

लेखक दो-पहिया यांनी गुरुवार, 06/07/2017 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! मी मिसळपावचा जुना वाचक जरी असलो तरी सदस्य म्हणून नवीनच आहे. नुकत्याच लिहिलेल्या ब्लॉग मुळे मिसळपावच्या सरपंचांशी ओळख झाली आणि त्यांच्या सुचनेनुसार मी माझा लेख येथे देत आहे. भीमाशंकर बद्दल बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं पण कधी जाण्याचा योग आला नव्हता. आमच्या ऑफिसमधील एक सहकारी नुकताच जाऊन आला होता. त्याने केलेलं वर्णन ऐकल्यापासून भीमाशंकरला कधी एकदा जातोय असं झालं होतं. पण गाडी न काढता सायकलने जायचा बेत होता. पुण्यापासुन भीमाशंकर १०० किमी आहे. शनिवारी निघून रविवारी परत यायचे. जाऊन येऊन २०० किमी.

चायना आणि चुंबी (३) संधी मुत्सद्देगिरीची

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 06/07/2017 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
डोकलामच्या टापूवर रस्त्याच्या बांधणीची चीनची वेळ चुकली का ? माहित नाही, शस्त्रास्त्र स्पर्धेत चीन भारतापेक्षा आघाडीवर असला, आणि डराकाळ्या कितीही फोडल्या तरी याक्षणी मुत्सद्देगिरीच्या बाबतीत प्रत्यक्षात अडचणीत आहे. इथे ९९ गुण डोवाल डॉक्ट्राईनला १ गुण आमेरीकनांच्याही अडकलेल्या हाताला. दोन देशात खरेच युद्ध झाले तर आर्थीक आणि जिवीत हानीची दोन्ही देशांना मोठी किंमत मोजावी लागेल हे खरे असले तरी मुत्सद्देगिरीच्या बाबतीत एखाद्या वस्तुचा सौदा करण्याचा प्रयत्न करतो तशी स्थिती असते. बाजारातला सौदा फिस्कटला तर युद्धे होत नाहीत. आंतरराष्ट्रीय राजकारणात सौदा होऊ शकला नाही तर युद्धापर्यंत गोष्ट जाऊ शकते.

नविन लेखमलिका :’हॅरी पॉटर’

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी गुरुवार, 06/07/2017 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
जगात सगळ्यात सुखी पिढी कुठली असेल तर ९० च्यां दशकात जन्माला आलेली, आमची पिढी...!! ज्या काळात जन्माला आलो त्यात खरं तर नुकत्याच ब-याच नवनवीन गोष्टी आल्या होत्या ... मग टीवी असेल, कॉम्प्युटर असेल, इंटरनेट असेल.....पण हे सगळ काही बालपणी जास्त शिवलं नव्हतं आम्हाला. भर उन्हाळ्यात अख्खी दुपार खेळण्यात घालवणे, सूर-पारंब्या, विटी-दांडू, कबड्डी, असे नानाविध खेळण्यात गेलं. सचिन-सौरभ-राहुल-अजहर हे हिरो असेल तरीही क्रिकेट सुद्धा फार मोठ स्थान काही बळकावू शकलं नव्हतं.