Skip to main content

मदत हवी आहे - द. ग. गोडसे ( समंदे तलाश )

लेखक मनो यांनी बुधवार, 06/01/2016 06:01 या दिवशी प्रकाशित केले.
द. ग. गोडसे यांचे समंदे तलाश हे पुस्तक कुणाकडे आहे का - त्यातल्या एका लेखाची (सवाई माधवराव शनिवार वाड्यातील चित्राबद्दलचा लेख ) संदर्भासाठी गरज आहे. सध्या भारताबाहेर असल्यामुळे पुण्यात अथवा इतर ठिकाणी जाणे शक्य नाही. जर कुणी त्या लेखाचे फोटो पाठवू शकेल तर मदत होईल. धन्यवाद

मोसाद - भाग ४

लेखक बोका-ए-आझम यांनी बुधवार, 06/01/2016 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
. मोसाद - भाग १ मोसाद - भाग २ मोसाद - भाग ३ मोसाद - भाग ४ ३ जानेवारी १९४६. न्यूरेम्बर्ग, जर्मनी. सगळ्या जगाला एका फटक्यात बदलून टाकणारं दुसरं महायुद्ध संपुष्टात आलं होतं. संहार, व्याप्ती, क्रौर्य या सगळ्याच बाबतीत एकमेवाद्वितीय असलेल्या या युद्धानंतर तशीच एक अभूतपूर्व घटना घडली होती.

रजत

लेखक दिनेश५७ यांनी मंगळवार, 05/01/2016 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
लोकलने चर्चगेटकडे जाताना अंधेरीच्या आधी, पूर्वेकडे सबवेच्या बाजूला एक मोडकळीस आलेली इमारत दिसते. त्यावरचा बोर्डही धूसर झालाय. पण ती अक्षरं खूप ओळखीची वाटतात! बहुधा या इमारतीत तयार झालेली वस्तू आपण प्रत्येकाने दप्तरात प्रेमानं सांभाळली होती. शाळा सुरू व्हायच्या आधीच्या खरेदीचा पहिला मानही या वस्तूलाच मिळायचा. वही! तिच्या गुळगुळीत कव्हरवरून तळवा हळुवारपणे फिरवताना, आपण जगातली सर्वात मौल्यवान वस्तू हाताळतोय असं नकळत वाटायचं. वही उघडून नाकाशी धरल्यावर नाकात घुमणारा कोऱ्या करकरीत पानांचा गंध आंबुस असला तरी धुंद करून सोडायचा. आम्हाला तेव्हा दोन प्रकारच्या वह्या घेऊन दिल्या जात.

बाजीराव मस्तानी न पाहताच आलेले शहाणपण

लेखक सप्तरंगी यांनी मंगळवार, 05/01/2016 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
ऐतिहासिक नोंदी : बाजीराव मस्तानी न पाहताच आलेले शहाणपण : 1. सगळेच शहाणपण येण्यासाठी movie पहायची नाही तर fb , मिपा , नेट नेटाने चाळायची गरज असते. 2. आत्ताच आलेल्या माहितीनुसार यापुढे उठसुठ कुठल्याही सुमार गोष्टींसाठी पाकिस्तानात जा असे म्हणायची गरज नाही तर सरळ बाजीराव-मस्तानी पहा असेही म्हणू शकतो, equal आणि उचित अपमान केल्याचे श्रेय पदरी पडेल. 3.

सायकल राईड - तापोळा - भाग १

लेखक मोदक यांनी मंगळवार, 05/01/2016 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
नववर्षाची सुरूवात शुक्रवारी होत असल्याने मोठ्ठा वीकांत रिकामा होता त्यामुळे वीकांताला कुठे जायचे याचे वेगवेगळे बेत ठरू लागले. कांही महिन्यांपूर्वी अमितने तापोळा सहल केली होती आणि तो रूट एकदा सायकलने करण्याचे सर्वांच्याच मनात होते त्यामुळे तापोळा हे ठिकाण पक्के ठरवले व फोनाफोनी करून बुकींग केले. मी, किरण आणि अमित या राईडला जाणार हेही नक्की झाले. महाबळेश्वर आणि महाडच्या घाटवाटांच्या राईडनंतर सायकल खूप कमी चालवली होती. सराव नव्हताच आणि एकंदर मोठ्ठा गॅप पडला होता त्यामुळे या राईडच्या एक आठवडा आधी रोज ५० किमी सायकलींग केले.

झाडांच्या सावलीत, राणीच्या बागेत, ... ... येताय ना ? ;)

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 05/01/2016 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरना माननीय प्रेषक, कंजूस, यांची नैसर्गीकपणे मोकळी-चाकळी माफी मागून :) मिपाकरांच्या सेवेत सादर ... झाडांच्या सावलीत राणीच्या बागेत ने-चर वॉक श्रवणोत्सुक नेत्र वेगळ्या कोनातून मनोरा पाहणारे Appreciation टॉक चिंचेची अन चिनाराची झाडे कुट-कुटली, पुर्व-पश्चिम दक्षीण-उत्तर, गाभुळलेले, हिरवे चढ उतार झेलत हळूवार-मौन कधी जोरदार वाहत्या वार्‍यासंगे बोलके तुषार वळणे डौलदार नजाकत लवलव गवताची पाती झुलता झंकार फुलपाखरे किती चमकदार पक्षीगाती मंजुळ मनाचे तराणे कळ्या फुलतात हळूवार प्रतिक्षा त्या खास किटकांची फुलांचे परागीभवन फळांच्या आशा कधी निराशा

ऑर्फिअस, जी. ए आणि मी (भाग ३)

लेखक Anand More यांनी मंगळवार, 05/01/2016 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ _______________________________________________________________________________________ जी ए आणि त्यांचा ऑर्फिअस तुम्हाला सुरुवातीपासूनच धक्के देऊ लागतात. मी आणि माझ्या मित्रांचा, 'जर फक्त खात्री करायची होती की युरीडीसी येतेय की नाही तर मागे कशाला वळून पहायचे ? फक्त हाक मारायची की, लगेच कळले असते युरीडीसी येतेय कि नाही ते', हा बाळबोध मुद्दा जी एंनी एका फटक्यात खोडून काढला. त्यांचा ऑर्फिअस तर प्लुटोचा निरोप घेऊन वळतो आणि परतीच्या मार्गावर युरीडीसीशी गप्पा मारू लागतो. तो तिला तिच्या मृत्यूपूर्वीच्या जीवनातल्या आठवणी सांगू लागतो. तिच्या सौंदर्याच्या, फुलणाऱ्या फुलांच्या, खळखळ वाहणाऱ्या झऱ्यांच्या, मंजूळ आवाजाच्या पाखरांच्या, तृप्त निसर्गाच्या, आणि आता पुन्हा ते सुगंधी अनुभव गोळा करता येतील अश्या भविष्याच्या.

सोशल नेटवर्किंग (भाग २)

लेखक लाडू. यांनी मंगळवार, 05/01/2016 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
पुढच्याच सेकंदाला श्रावणीने मयंकला मित्र म्हणून स्वीकारले होते. आणि मयंकला आभाळ ठेंगणे वाटू लागले. ताबडतोब तिला hi पाठवलं त्याने. पण तिचा reply आला नाही. ती online असल्याच दाखवणारा हिरवा ठिपका पण नाहीसा झाला होता. मनात भयंकर चरफडत मयंकने कॉम्पुटर बंद केला. तोवर फोन थरथरला. सवयीप्रमाणे वरुनच मोबाईल चा ट्रे खेचत त्याने मेसेज पहिला. अनघा. त्याच्या fan following मधली एक मैत्रीण. तिला कधीपासून मयंक आवडत होता देव जाणे. पण त्याचं नुसत अवडंबर माजवलं होत तिने. आपल मयंकवर किती प्रेम आहे हे जगाला दाखून द्यायची एक संधी सोडत नसे ती. मयंकने आपल्याला गर्ल फ्रेंड म्हणावं यासाठी काहीही करायला तयार होती ती.

स्त्री पोषाख, स्त्री-पुरुष संबंध आणि (अ)सुरक्षिततेचा सांभाळ

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 05/01/2016 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
(अ)सुरक्षीततेची भावना आणि भिती हे तसे खूप सारे कंगोरे असलेले, व्यापक पट असलेले विषय आहेत.

या या मयाय्या

लेखक मूखदूर्बळ यांनी सोमवार, 04/01/2016 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
हाव खुप दीस चिततालो कित्ये तरी बरवया म्हणून पण कित्ये बरवपाचे ते कळ नशील्ले. बायल माका म्हणताली तू मराठीन इतले बरयता तर कोकणीन कीत्येच काय बरयणा नाय कित्याक. बायलेन इतले म्हळ्ळा झाल्यार बरवपाकच जाय म्हणून बरवपाक घेत्ल्ये रोकडेच. पडत्या फळाची आज्ञा म्हणचे पेक्षा प्रत्यक्ष झाडानच आज्ञा दिल्यार नाय म्हणपाचो प्रश्नच ना. तर सांगपाची गोस्ट म्हळ्ळ्यार हाव चार दिस गोया वचून आयलो. गोया वचून आयल्यार हाव सदाबशीन तरतीर्त जाता (हाव सोरा बी घे ना हे मुद्दाम सांगता ना जाल्यार फुडल्या खेपेक माकाय एक काजू रस घेउन यो अशे ऑर्डरी मिळतले.