Skip to main content

आकाशात तार्‍याचा स्फोट- ल्युपस तारकासमूहामध्ये सुपरनोव्हा

Published on मंगळवार, 24/06/2025 प्रकाशित मुखपृष्ठ
स्फोटामुळे 50 लाख पट तेजस्वी झालेला तारा डोळ्यांनी दिसू शकेल सुपरनोव्हा (अति नवतारा) म्हणजे तार्‍याचा स्फोट होण्याची स्थिती. तार्‍यांच्या जीवनक्रमामध्ये शेवट होण्याची एक शक्यता असा स्फोट ही असते. तार्‍यांचं युगुल (पेअर) असेल व एक तारा खुजा (ड्वार्फ) असेल किंवा तार्‍याचं वस्तुमान जास्त असेल तर असा स्फोट होतो. स्फोट झालेला तारा दक्षिणेकडच्या वृक म्हणजे ल्युपस (Lupus) तारकासमूहातला +22.3 प्रतीचा तारा होता. त्याचा स्फोट झाल्याचं 12 जूनला लक्षात आलं.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1634

साहित्य, ललिता आणि पुरचुंडीभर राख !

Published on सोमवार, 23/06/2025 प्रकाशित मुखपृष्ठ
साहित्य असाच एका रविवारी फेसबुकवर चाळवाचाळव करत असताना त्याला त्या ३.५ बीएचके फ्लॅटची जाहिरात दिसली. एका बंगल्याच्या पुनर्विकासानंतर सहकारनगर सारख्या सभ्य आणि सुसंस्कृत भागात असलेला फ्लॅट "निदान बघून तरी येऊ" असे म्हणून तो, ललिता आणि लेखना तो फ्लॅट बघायला गेले. चकाचक इमारत, २ कार पार्किंग्स.. आणि तेही अगदी लांब लचक कार सहज आत बाहेर येऊ जाऊ शकेल अशा.. प्रशस्त हॉल ... सॉरी सॉरी - लिविंग रूम... मोठाल्या बेडरूमस .... वॉशिंग मशीन आणि डिश वॉशर सहज बसेल आणि तरीही जागा उरेल असे स्वयंपाकघर ... सॉरी सॉरी - मॉड्युलर किचन ... प्रत्येक बेडरूमला मध्यम बाल्कनी .. लिविंग ला मोठ्ठी गॅलरी ...
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 4829

फाया

Published on रवीवार, 22/06/2025 प्रकाशित मुखपृष्ठ
"कृबु (*)व्यापित या जगी अता तुज स्थान काय उरते ? मनात येता क्षणार्धात मग इच्छित अवतरते ! काव्य, नाट्य, शिल्पे, चित्रे अन् जटिल अधिक काही गरज तुझी यासाठी कशाला?
लेखनविषय:

याद्या 794

मूक चित्रपट

Published on शनीवार, 21/06/2025 प्रकाशित मुखपृष्ठ
गेल्या काही दिवसात चार मूक चित्रपट बघितले. १ A Trip To The Moon. 2 The Last Laugh 3 The Cabinet of Dr. Caligari (1920) 4 Metropolis प्रत्येक सिनेमा साठी स्वतंत्रपाने लिहावे लागेल. आत्ता फक्त A Trip To The Moon. बद्दल लिहितो. ही फिल्म जॉर्ज मेलीएसने दिग्दर्शित केली आहे. जॉर्ज मेलीएस हा एक प्रसिद्ध जादुगार होता. ही film १९०२ बनवली होती. त्या आधीचे "सिनेमे" दोन तीन मिनिटांचे असत. ही film तब्बल साडे बारा मिनिटांची फीचर film आहे. म्हणजे ह्या सिनेमाला कथा आहे. वर ही पहिली वहिली Sci Fi film मानली जाते. ज्युल्स व्हर्न च्या कथेच्या कल्पना ह्यात वापरल्या आहेत.
लेखनविषय:

याद्या 889

यंदाचा पाऊस .

Published on शुक्रवार, 20/06/2025 प्रकाशित मुखपृष्ठ
पाऊस यंदा खरच माझ्या, मनासारखा पडतोय . इकडे तिकडे पळता पळता मध्येच . . , आंगणात थबकतोय ! बराच चिखल मग बरेच उन्ह मग मधेच रिपरिप , टाकते नाहवून निसरडा कधी , गच्च ओला क्षणात रस्ता भिजवतोय ! पाऊस यंदा खरच माझ्या ,मनासारखा पडतोय . ॥ १ ॥ गच्चीत कधी तोच एकटा , मी मोठा तो धाकटा , तरिही अंगावर आणवून काटा मोठ्या भावासारखा घाबरतोय ! पाऊस यंदा खरच माझ्या , मनासारखा पडतोय . ॥ २ ॥ पाऊस कधी छपरावर नाहीतर गटारातल्या डुकरावर त्याची मर्जी फिरेल तसा हवं त्याच्या नशिबावर स्वतःची शक्ती पाऊस दाखवून "मीच परमेश्वर" , म्हणतोय पाऊस यंदा खरच माझ्या, मनासारखा पडतोय .
लेखनविषय:

याद्या 1100

घनदाट, घनगर्भ अंधार दाटून येतो

Published on शुक्रवार, 20/06/2025 प्रकाशित मुखपृष्ठ
कधीतरी मनात आतून अंधार दाटून येतो तो इतका दाट असतो की डोळ्यात बोट घातले तरी काही म्हणता काहीच दिसत नाही मग आस लागते त्या किरणांची जी या घनगर्भ अंधाराला दूर सारून शांत, शीतल असा प्रकाश शिंपडून जातील. पण हे क्षणा क्षणाच वाट पाहणं असह्य होत जात, अस वाटत की त्या अमरत्वाचा शाप मिळालेल्या अश्वत्थाम्या प्रमाणे आपल्याला पण हा युगानु युगे वाट पाहण्याचा शाप मिळालेला आहे का ? एक एक क्षण एकेका युगाप्रमाणे भासतो आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1296

21 जून योग दिवस : उद्यानातिल स्वास्थ्य साधक

Published on शुक्रवार, 20/06/2025 प्रकाशित मुखपृष्ठ
(हा लेख लिहण्यापूर्वी उद्यानात सकाळी पाच ते आठच्या दरम्यान अनेक स्वास्थ्य साधकांशी वार्तालाप केला आहे.) माझे बालपण जुन्या दिल्लीत गेले. त्याकाळी मोरीगेट ते यमुने पर्यन्त अनेक मोठी उद्याने होती. नंतर 35 वर्षे उत्तम नगर इथे राहिलो. जवळच्या जनकपुरी इथेही मोठे-मोठे उद्यान आहेत. बालपणापासून मला पासून उद्यानात फिरण्याची सवय आहे. गेल्या ऑगस्टच्या सुरवातीला ग्रेटर नोएडा इथल्या एका हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये शिफ्ट झालो. मुलाला 22व्या माल्यावरचा फ्लॅट विकत घ्यायला भाग पाडले याचे एकमेव कारण या भागातील उद्यान बाल्कनीतून समोर दिसते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 638