मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

यंदाचा पाऊस .

अत्रुप्त आत्मा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
पाऊस यंदा खरच माझ्या, मनासारखा पडतोय . इकडे तिकडे पळता पळता मध्येच . . , आंगणात थबकतोय ! बराच चिखल मग बरेच उन्ह मग मधेच रिपरिप , टाकते नाहवून निसरडा कधी , गच्च ओला क्षणात रस्ता भिजवतोय ! पाऊस यंदा खरच माझ्या ,मनासारखा पडतोय . ॥ १ ॥ गच्चीत कधी तोच एकटा , मी मोठा तो धाकटा , तरिही अंगावर आणवून काटा मोठ्या भावासारखा घाबरतोय ! पाऊस यंदा खरच माझ्या , मनासारखा पडतोय . ॥ २ ॥ पाऊस कधी छपरावर नाहीतर गटारातल्या डुकरावर त्याची मर्जी फिरेल तसा हवं त्याच्या नशिबावर स्वतःची शक्ती पाऊस दाखवून "मीच परमेश्वर" , म्हणतोय पाऊस यंदा खरच माझ्या, मनासारखा पडतोय . ॥३॥ कधी दणाणून भरवतो पागोळी , गरिबांना घडवतो एकदाच्या अंघोळी कुठली घाण - कुठे काढून ?, खरच विसर्जन करतोय . . पाऊस यंदा खरच माझ्या ,मनासारखा पडतोय . ॥ ४ ॥ पाऊस कधी खिडकी मधून , घरामध्ये येतो . . इच्छा नसलेले दोन थेंब हतावरती देतो ? मग भिजवून मनामध्ये मला साला हसायला लावतोय . . पाऊस यंदा खरच माझ्या ,मनासारखा पडतोय . ॥ ५ ॥ पाऊस मला ओळखायला लावतो तोंडाभोवती आरसा धरतो . . मान फिरवून वाकडी तिकडी, दर्शन माझं मलाच घडवतो . हा पाऊस साला शेवटी मला, स्वतःलाच ओळखायला लावतोय ! पाऊस यंदा खरच माझ्या , मनासारखा पडतोय . . ॥ ६ ॥ पाऊस आहे आणि पावसाळी काव्य नाही . असे खरंच चालायचे नाही . तुम्ही म्हणाल "काही होत नाही" , पण मन माझे माझ्याशी बोलायचे नाही. पाऊस हळूच त्याचे अंतरंग ,माझ्या मुखी बोलवतोय ! पाऊस यंदा खरच माझ्या, मनासारखा पडतोय ॥ ७ ॥ अरे नको पडू , बास्स कर ! जरा तुझा थोडा ऑफ तास कर ! असे म्हणूनही न ऐकता साला धुव्वाधार कोसळतोय . . पाऊस यंदा खरच माझ्या, मनासारखा पडतोय ॥ ८ ॥ ================= अतृप्त . . .

वाचने 1100 वाचनखूण प्रतिक्रिया 3

कंजूस Fri, 06/20/2025 - 15:05
हा पाऊस साला शेवटी मला, स्वतःलाच ओळखायला लावतोय ! पाऊस यंदा खरच माझ्या , मनासारखा पडतोय . . आला लाइनीवर. सरसर आली कविता अचानक भिजवून गेली. लिहा लिहा लिहा दुत्त दुत्त रुसलेल्या प्रतिभेला पुन्हा लपंडाव खेळायला लावा.

कर्नलतपस्वी Fri, 06/20/2025 - 17:37
पाऊस, रस्तोरस्ती. रस्त्याच्या पलीकडचा पाऊस. रस्त्यात सर्व काळोखात वस्त्यात -कविवर्य ग्रेस महावितरण फेल.