Skip to main content

लंपन, वानरांच्या फौजा आणि थोडं पाल्हाळ

नंदन यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
काही फायदा होतो म्हणून वाचन करु नये, हे जरी खरं असलं तरी त्यातून वेगवेगळे अनुभव आपण लेखकाच्या दृष्टीतून घेऊ शकतो. नाहीतर एका आयुष्यात असे घेऊन घेऊन अनुभव तरी किती घेणार? बसल्याजागी वेगवेगळे अनुभव - व्हिकॅरियसली म्हणजे दुसऱ्याच्या उसन्या दृष्टीतून का होईना, आपण पुस्तकाच्या वाचनातून घेऊ शकतो. 'का आपुला ठावो न सांडिता, आलिंगिजे चंद्रु प्रकटिता', असं कमलिनीबद्दल ज्ञानेश्वरीत म्हटलंय तसंच काहीसं. अर्थात कुणाला कुठला अनुभव, कुठला विचार आवडेल हे सांगणं अवघड. त्या त्या व्यक्तीच्या पिंडावरती ते अवलंबून.

अखंड तेजीची नको करू कामना - चंद्रशेखर चितळे

प्रकाश घाटपांडे यांनी या दिवशी प्रकाशित केले.
दैनिक सकाळ - १९ आक्टोबर २००७
अखंड तेजीची नको करू कामना ।।
(चंद्रशेखर चितळे) एक आटपाट नगर होते. तेथे प्रजा आनंदाने राहत होती. उद्योजक, व्यावसायिक, सेवा पुरवठादार, नोकरदार... अशी सर्व प्रकारची जनता तेथे होती. तेथे अन्य प्राणी देखील वास्तव्यास होते. गाई-म्हशी, कुत्रे-मांजर पोपट-चिमण्या... आदी सारे होते. डुकरांची जमातसुद्धा होती. संक्रांतीचा मुहूर्त साधून एका फिरंगी व्यावसायिकाने आटपाट नगरामध्ये टोप्या विकावयाचे दुकान टाकले. सुरवातीच्या कुतुहलामुळे दुकानामध्ये गर्दी जमली आणि हळूहळू साधारण व्यवसाय होऊ लागला.

उद्याच्या बाजाराबाबत

धोंडोपंत यांनी या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, अपेक्षेप्रमाणे शेअरबाजार खाली आला आहे. काल दुपारी झालेल्या पुलबॅक वर भाळून ज्या मूर्खांनी काल दुपारी खरेदी केली, त्यांनी स्वत:च्या मूर्खपणाला शिव्या द्याव्या. कारण मार्केट प्रचंड ओव्हरबॉट होतं आणि त्याला पडायला काहीतरी कारण पाहिजे होतं. ते सेबीने दिलं इतकचं. नाहितर चिदुच्या (चिदंबरमच्या) गोड गोड साखरपेरी आश्वासनानंतर आज फॉलोअप बाइंग दिसलं असतं, पण तसं झालं नाही, ते होणार नव्हतं. आज ते़जीमातेच्या महाआरत्या चालल्या नाहीत. कोणताही विधीनिषेध न बागळता एखाद्याने लुंगी सोडावी तस मार्केट आज "सुटलं". आम्ही मंदीतच होतो आणि आहोत. जे कोणी तेजीत असतील त्यांचे स्टॉपलॉस हिट झाले असतील.

खोडसाळपंतांची गझल - रुचिपालट! :)

विसोबा खेचर यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आमचे मनोगतीय मित्र श्री खोडसाळपंत यांनी अलिकडेच एक सुरेख गझल लिहिली आहे. गझल फारच छान आहे. आम्ही खोडसाळरावांचे प्रथमपासूनच फ्यान आहोत.

पुण्यातील जागांचे भाव

व्यंकट यांनी या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, पुण्यातील जागांचे भाव आकाशाला भिडले आहेत. लोक पार तळेगाव, लोणावळा, पिरंगुट, सासवड, उंड्री, चाकण पर्यंत राहावयास गेले आहेत / जात आहेत. जागेच्या किमती २००० ते ६५०० च्याही वर गेलेल्या आहेत. आय्.टी. वाले सोडले तर इतरांच्या कुवतीच्या पलीकडे सध्या जागा घेणे झाले आहे. आय.टी. वाले सेकंड होम घेत आहेत तर इतरांस घरभाडेही परवडेनासे आहेत. विशेषतः स्थानिक लोकांस जागा घेणे अवघड झाले आहे. पुणे आता मुंबई होऊ लागले आहे काय? इतर शहरांतील लोकांचे काय अनुभव आहेत? मध्यमवर्गीयांची संख्या वाढत असतांनाच दारिद्र्य रेषाही वर जात आहे का? आपण एखाद्या गृहयुद्धाकडे जात आहोत काय?

महिषासूर आणि दूर्गा (विनोदी ऍनिमेशन)

विकास यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
आपण जर खालील फ्लॅश अजून पर्यंत पाहीला नसला तर अवश्य पहा. मुलांनापण पहायला आवडतो. (मला फायरफॉक्स मधे बघता आले नव्हते) http://www.dadazi.net/usa/mahis.swf विकास

एन आर एम डे

विकास यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
नमस्कार, म. टा. मधील खालील बातमी आपल्या माहीती करता: प्रिय एनआरएम’ मित्रहो!, [ Wednesday, October 17, 2007 07:15:57 am] नमस्कार ‘ एनआरएम ’ मित्रहो !, स. न. वि. वि. , पत्रास कारण शुभेच्छा दस-याच्या. आमच्या ‘ एनआरएम डे ’ च्या. इंडोनेशिया , जावा , सुमात्रा बेटांवर भारतीय संस्कृती घेऊन जाणा-या कौंडिण्य ऋषींचा उल्लेख भारतीय इतिहास पुराणात आहे . त्यांच्याशी नातं सांगणारी कोंढाणा किल्ल्यासह अनेक स्थानं आपल्या महाराष्ट्रात आहेत .

मनातले

सहज यांनी या दिवशी प्रकाशित केले.
जुने हिंदी सिनेमे बघताना तर नेहमी वाटायचे "अरे! गप्प का? सांग ना हिरॉइनला ती तुला आवडते." आत्ता बोलला नाहीत तर नंतर बोंबलत बसाल, इडिअट्स का स्वतःला त्रास करून घेताय. :-) (शेवटी वैतागून जे तुमचे काम कुत्रा, कबूतर तुमच्यासाठी करु शकते ते तुम्ही स्व:ता का नाही करत?) इथे तुमच्या मनात बराच काळ रेंगाळणारे, पटकन येऊन टोचणारे, हे असे का असते, लोक अस का करतात, आज अमुकने मुद्दामुन असे वागून कसे पकवले, आज असे घडले, ऐकले, प्रवासात काहीतरी दिसले, घडले ते शेअर करणे, संर्घषाच्या अश्याप्रसंगी काय करायचे (नातेसंबध, ऑफीसमधील टेंशन), अमूक गोष्टीला काय म्हणतात आठवत नाही कोणाला बरे माहीत आहे का?

आउटसोर्सिंग!

चित्रा यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लोक काय काय आउटसोर्स करतील याचा नेम राहिलेला नाही. एकाच्या सुपीक डोक्यातून आलेली ही कल्पना काय आहे ते येथे ऐका..
परत NPR वरचाच कार्यक्रम आहे. मुलाखतकार रॉबिन यंग. कल्पना डेव्ह हुई. ही ध्वनीफित ऐकायला Real Player लागेल.
काहीतरी कारणाने मलाच वरच्या दुव्यावर ऐकता आले नाही, म्हणून दुसरा दुवा देते आहे - ताज ट्यून बघा.