Skip to main content

इथे अग्निपंख फुलले होते!

Published on 30/12/2007 - 12:04 प्रकाशित मुखपृष्ठ
इथे अग्निपंख फुलले होते!... ... गावातल्या रस्त्याकडेचा मासळी बाजार फुलायला लागला आणि आसपासच्या झाडांवर पक्ष्यांचा वखवखलेला कलकलाट सुरू झाला. रात्रीच्या निवाऱ्यापुरती आणि पिलावळीच्या आसऱ्यासाठी काडीकाडी जोडून वाळल्या झाडांवर बांधलेली घरटी सोडून सगळे कावळे मासळी बाजाराकडे झेपावले. पलीकडच्या गल्लीतल्या अवाढव्य पसरलेल्या, जगण्याची आशा सोडलेल्या रुग्णाईत म्हाताऱ्यासारख्या चिंचेच्या झाडावरच्या बगळ्यांच्या थव्यांचे ध्यान मोडले आणि पांढुरके पंख पसरत घरट्यातल्या घरट्यात त्यांचा नाच सुरू झाला.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 4314

काय सांगू नवलाई

Published on 30/12/2007 - 11:20 प्रकाशित मुखपृष्ठ
या कविता मी संकलित केलेल्या असून मूळ कविची माहिती कवितेच्या खाली देण्यात आली आहे. काय सांगू नवलाई बाई,जाहले उन्मन उतरता पाण्यामध्ये लाज गेलीच वाहून. आता पदराशी माझ्या वारा करी हितगुज वेळी अवेळी वाजते मनामधे अलगुज. घर राहिले पाठीशी तुटे संसार पुरता काठावर यावे सांग सखे,कुणा ग करिता! कविता संग्रहः शब्द मनातले कवि: अतुल व्यं.देशमुख प्रकाशकः ग्रंथविशेष प्रतिष्ठान © सौ.स्मिता देशमुख
लेखनविषय:

याद्या 2664

शुद्धलेखन नियम,काय बदल केले पाहिजेत ?

Published on 29/12/2007 - 20:43 प्रकाशित मुखपृष्ठ
मराठी शुद्धलेखनाची नवी नियमावली तयार करण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घेतला आहे. त्यासाठी त्यांनी एक कृती आराखडा तयारही केल्याची बातमी वाचनात आली. १९६१ ला महामंडळाने शुद्धलेखनाची नियमावली तयार केली. सर्व नियम संस्कृत भाषेला आधार मानूनच करण्यात आले होते. आता आधुनिक काळात मराठी भाषेचा शुद्धपणा आणि मराठी भाषेच्या प्रगतीसाठी नवीन शुद्धलेखनाची नियमावलीची गरज वाटत असावी.संस्कृत भाषेतून आलेल्या शब्दांचा फेरविचार, इंग्रजी आणि हिंदी शब्दांचा अभ्यास आदी प्रमुख सूत्रे डोळ्यासमोर ठेवून नियमावली तयार करण्याचा विचार महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी बोलून दाखविला आहे.

याद्या 55432

विनायक परत आला.....

Published on 29/12/2007 - 19:18 प्रकाशित मुखपृष्ठ
सध्या 3 सदस्य आणि 6 पाहुणे आलेले आहेत. हजर सभासद प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सहज विनायक सुस्वागतम असेच येत रहा....

याद्या 5977

मन...

Published on 28/12/2007 - 21:10 प्रकाशित मुखपृष्ठ
मन पाखरांची किलबिल ओल्या हिरव्या रानी.. मन दवबिंदू सांडलेले गवताच्या पानोपानी.. मन मुग्ध वसंताची चाहूल मन बोचर्या शिशिरातील पानगळ.. मन झुळुक वार्याची हळुवार.. मन भयाण वादळ अनिवार.. मन शोध सुखाचा दूरवर.. मन दु:ख दडलेले खोलवर.. मन मुक्त हास्याची खळखळ.. मन मुक्या अश्रून्ची गलबल...
लेखनविषय:

याद्या 3602
Taxonomy upgrade extras

"तारे जमिन पें" :- वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या नजतेतून .... [ आमिर ईज बेस्ट !!!]

Published on 28/12/2007 - 20:33 प्रकाशित मुखपृष्ठ
"तारे जमिन पें" पाहिला की नाही? मला माहित आहे तिकिटे मिळत नाहीत ,तरिपण एकदा थेटरवर चक्कर टाकाच आणि बाहेर पडणार्‍या प्रेक्षकांकडे निट पहा. नेहमीसारखा गोंधळ, दंगा करत बाहेर पडणारा प्रेक्षकवर्ग आज असा शांत का दिसतो आहे. काही जण एकदम स्तब्ध दिसत आहेत, काहिजण एकदम हरवल्यासारखे चालत आहेत, काहिंच्या चेहर्‍यावर विचारांचे काहूर माजले आहे. काय झाले नक्की थेटरात? कशामुळे सर्वजण असे वागत आहेत?

याद्या 3708

बेनझीर भुत्तोची हत्त्या: भारतापुढील सन्कटान्ची नान्दी?

Published on 28/12/2007 - 10:30 प्रकाशित मुखपृष्ठ
माझ्या मते बेनझीर भुत्तोन्ची झालेली हत्त्या भारतापुढे सन्कट उभे करू शकते. पाकिस्तानात लष्कराचे प्राबल्य कमी करून तिथे लोकशाही प्रस्थापीत करू शकणारी एकमेव व्यक्ति नाहिशी करण्यात आली आहे. आता मुशरृफ याना पुन्हा आणी-बाणी घोषीत करण्याची आणि आपली पर्यायाने पाक लष्कराची अनिर्बन्ध सत्ता स्थापन करण्याची उत्तम सन्धी चालून आली आहे. बेनझीर ह्या काही प्रमाणात प्रागतिक विचारान्च्या होत्या, पुरोगामी होत्या.( अत्युच्च पदावर स्त्री ही कल्पनाच इस्लामला मान्य नाही!) त्यामुळे त्यान्ची हत्त्या हा इस्लाम मूलतत्ववाद्यान्चा विजय आहे. व हाच भारताला धोक्याचा इशारा आहे..

याद्या 2993

(नाठाळ मुलांसाठी) बालकविता

Published on 28/12/2007 - 02:40 प्रकाशित मुखपृष्ठ
अरे अरे शेंबड्या गंपा तुझ्याकडे रुमाल नाही? तो कशासाठी बाप्पा - शर्टाला जर आहे बाही. गाल फुगवून बसली आहे कोपर्‍यामध्ये रुसूबाई रडून कहर केल्यापेक्षा परवडले हे रुसू बाई लवकर लवकर उठायाचे शाळेत जायचे झटपट आटपून कशाला या उठाठेवी - मास्तर रोजच काढणार झोडपून
लेखनविषय:

याद्या 4580

सद्दाम आणि हिटलर

Published on 27/12/2007 - 07:35 प्रकाशित मुखपृष्ठ
मी महाविद्यालयात असताना 'मॉडेल युनायटेड नेशन्स असेंब्ली' या पूरक उपक्रमात मी ३ वेळा भाग घेतला आहे. या उपक्रमात दोन विद्यार्थ्यांचा संघ संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतील एकेका देशाचे प्रतिनिधीत्व करतो.असे एकूण ३० ते ४० संघ मी भाग घेतलेल्या वेळी होते. त्या सर्व संघांपुढे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पारित झालेला ठराव मांडण्यात येतो आणि त्यावर त्या विद्यार्थ्यांनी आपण प्रतिनिधीत्व करत असलेल्या देशांची भूमिका मांडणारे भाषण करायचे आणि इतर देशांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारून त्यांची 'बिनपाण्यानी' करायची.

याद्या 7926