Skip to main content

हिंदुत्ववादी आणि उजवे

Published on 10/09/2025 - 12:24 प्रकाशित मुखपृष्ठ
बरेच भारतीय हे हिंदुत्ववादी लोक आणि उजव्या विचारांचे लोक यामध्ये गल्लत करतात. आधी बघू की हिंदुत्ववादी म्हणजे काय? १) त्यांना हिंदू धर्मातले देव ही संकल्पना मान्य असते. ते राम , कृष्ण , शंकर , हनुमान असे जे जे हिंदू धर्मातले देव आहेत ते त्यांना मान्य असतात. ते त्यांच्या अस्तित्वाबद्दल चिकित्सा करत नाहीत. हे काहीसे आक्रमक असतात. २) ते हिंदू धर्माबद्दल चुकीच्या शब्दात केलेली टीका , निर्भत्सना यांना कडाडून विरोध करतात. ३) त्यांना हिंदू धर्मातल्या बऱ्याचशा परंपरा , हिंदू धार्मिक ग्रंथ हे मान्य असतात. ते त्यांची चिकित्सा करत बसत नाहीत.

याद्या 4740

नग्नता- सवस्त्र आणि विवस्त्र

Published on 10/09/2025 - 08:43 प्रकाशित मुखपृष्ठ
नग्नता- सवस्त्र आणि विवस्त्र ================ -- राजीव उपाध्ये डॉ० बर्नाड बेल या फ्रेंच विद्वान-मित्राने मला मानववंशशास्त्राची गोडी लावली (माझ्या लग्नात त्याने माझ्या बाजूने साक्षीदार म्हणून सही केली होती). मानववंशशास्त्राच्या परिचयाने जगभरच्या मानवीसंस्कृतींकडे बघायचा निकोप दृष्टीकोन प्राप्त झाला तर "सर्व काही भारतीय ते सर्वश्रेष्ठ" हा (सनातनी) दुरभिमान गळून पडला. खरं तर याची बीजं मुंबईला शिकत असताना पेरली गेली होती. आमच्याकडे चित्रपट बघण्यासाठी फिल्मक्लब आणि फिल्म सोसायटी असे दोन क्लब होते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 5817

चंद्रग्रहण अनुभूती: हा खेळ सावल्यांचा!

Published on 08/09/2025 - 17:59 प्रकाशित मुखपृष्ठ
नमस्कार! काल रात्रीच्या चंद्रग्रहणाचा अनुभव अविस्मरणीय होता. सुरूवातीला ढग आणि पाऊस! त्यामुळे "संपेल ना कधी हा खेळ (ढगांच्या) सावल्यांचा" असं वाटत होतं. चंद्राला आधी ढगांचं ग्रहण लागलं होतं. दोन टेलिस्कोप व बायनॅक्युलरसह आम्ही मित्र तयार होतो. पण ढग होते. ढगात असतानाच चंद्र पृथ्वीच्या उपछायेत जाऊन ग्रहणाची सुरूवात झाली. पण सूर्य इतका तेजस्वी आहे की, तो अंशत: झाकला गेला तरी चंद्राच्या तेजात लक्षात येईल असा फरक पडत नाही. नंतर जेव्हा चंद्राने पृथ्वीच्या मुख्य सावलीत प्रवेश केला (सूर्य पूर्णपणे पृथ्वीच्या आड गेला) तेव्हा मात्र चंद्राची कडा काळी झालेली दिसली. पण सतत ढग होते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1116

कल्पका:

Published on 08/09/2025 - 12:10 प्रकाशित मुखपृष्ठ
नास्ति भारत: देश: यत्र कल्पका: सन्ति दुर्लभा:। अपमानिता: यदा नित्यं प्रगतीस्तत्र कथं भवेत्॥ --राजीव उपाध्ये
लेखनविषय:

याद्या 465
काव्यरस

सोबत. . . अखेरच्या क्षणांची

Published on 08/09/2025 - 08:58 प्रकाशित मुखपृष्ठ
दीर्घकालीन दुर्धर आजार अनेकांच्या वाट्याला येतात. संबंधित आजाराचे सर्व उपचार करून डॉक्टर्स थकले की शेवटी रुग्णाच्या नातेवाईकांना अंतिम सल्ला दिला जातो तो म्हणजे, “आता मृत्यूची वाट पाहण्याखेरीज आपल्या हातात काही नाही”. खरंय, अशा केसेसमध्ये मृत्यू हा अंतिम आणि नैसर्गिक ‘उपाय’ ठरतो. अशा तऱ्हेने त्या रुग्णाचे आयुष्यातील अखेरचे पर्व चालू होते आणि ते किती काळ चालेल हे अनिश्चित असते. आपल्या जिवलग अथवा कुटुंबीयांच्या मृत्यूची चाहूल लागणे हा कुतुहलमिश्रित दुःखद विषय असतो. प्रत्यक्ष मृत्यू होईपर्यंत कुटुंबीय अथवा सेवक अशा कोणाला ना कोणाला तरी रुग्णाची सोबत करावी लागते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2382

कवितेच्या गणिताची कविता + - x ÷

Published on 07/09/2025 - 13:07 प्रकाशित मुखपृष्ठ
कविता-रतीचे | विभ्रम अनंत तयांचे गणित | कैसे करू? तरीही करितो | वेडे हे धाडस माझ्या अक्षरांस | हासू नये :) ~~~~~~~~~~~ कधी बेरीज बेचैनीची कधी वास्तव वजावटीस कधी गुणाकार गहनाचा कधी भागे कवी शून्यास कवितेचे गणित कसे हे उत्तर ना त्याचे कळते ओळींच्या मधली जागा गणिताला डिवचून जाते गणिताच्या मर्यादांचा ज्या कुणी(@) लाविला शोध तो कवी नसावा हृदयी याचा नच उरतो खेद ~~~~~~~~~~~ @ Kurt Gödel is well-known for his incompleteness theorems, which showed inherent limitations of formal mathematical systems.
लेखनविषय:

याद्या 1435
काव्यरस

संकेत

Published on 07/09/2025 - 12:02 प्रकाशित मुखपृष्ठ
सुकेतूचा हात मध्येच थांबला. त्याच्या स्क्रीनवर उजवीकडे खाली कोपऱ्या एक निळा गोलाकार ठिपका हळूहळू रंग बदलत होता. निळा रंगाचा ठिपका हळूहळू लाल होत होता सुकेतुचे डोळे मोठे झाले. त्याने आपल्या माऊसचा फोकस त्या लाल होणाऱ्या ठिपक्यावर केला. त्याबरोबर एक विंडो उघडली. त्या विंडोत वाक्य होते - मित्र संख्या २८ , वेळ उद्या सकाळी पहिली घटिका. सुकेतूने भराभर विंडो मधल्या इतर ओळी वाचायला सुरुवात केली. त्याचा श्वास वाढू लागला. त्याने कपाळावरचा घाम पुसला आणि म्हणाला, “ अरे या प्रोजेक्टची वेळ झालेली आहे”. बाजूलाच अंबुज बसला होता. तो म्हणाला, “ कसली वेळ?
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1849

तात्यांचे टेरिफ: ब्राह्मणी अर्थव्यवस्थेविरुद्ध जनतेच्या संघर्षाचे प्रतीक

Published on 06/09/2025 - 10:44 प्रकाशित मुखपृष्ठ
भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात मनुवादी ब्राह्मणी अर्थव्यवस्था ही गरिबांच्या शोषणावर उभी होती. ब्राह्मणी मानसिकतेने ग्रस्त उद्योगपतींनी मजुरांचे श्रम, त्यांचे हक्क आणि त्यांची माणुसकी यांची पायमल्ली केली. त्या काळात बॉलीवूडनेही जनतेच्या बाजूने भूमिका घेतली. चित्रपटांमधून शोषणाविरुद्ध आवाज उठवला. मिल मालक 'प्राण' शोषण करणार्‍या ब्राह्मणी अर्थव्यवस्थेचे प्रतीक होते—जो मजुरांच्या घामातून आपला वैभव उभारायचा. स्वातंत्र्यानंतर जनतेने या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. तत्कालीन पंतप्रधानांनी या शोषणकारी व्यवस्थेला आव्हान दिले. काही मोठ्या उद्योगांचे राष्ट्रीयकरण झाले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3894

४३ दिवस हिमालयात अडकलेला माणूस!

Published on 05/09/2025 - 21:00 प्रकाशित मुखपृष्ठ
- वैद्यकीय शिक्षण घेत असलेला ऑस्ट्रेलियन जेम्स स्कॉट - "तिथे" ३ दिवसांहून जास्त काळ कोणीही तग धरू शकणार नाही - बहीण जोआनचं प्रेम व तिने केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा - कराटेतून मिळालेलं शरीर, प्रसंगावधान, शिस्त आणि धैर्याची कसोटी - सोबतीला जीवाभावाच्या माणसांच्या आठवणी, प्रेम आणि फक्त बर्फ! - छोट्या गोष्टींमधून साध्य केलेलं आत्मबळ - ध्यानाद्वारे अचूक जागा सांगणारे रिनपोचे थरंगू लामा - ऑस्ट्रेलियन लोकांची हिंमत, आत्मविश्वास आणि हट्ट - "तू देव आहेस, कारण कोणीच माणूस इथे असा राहू शकत नाही!" - सुटकेनंतरचा अनपेक्षित घटनाक्रम नमस्कार!
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2194

(π)वाट

Published on 05/09/2025 - 20:43 प्रकाशित मुखपृष्ठ
स्पर्शरेषा जोखते जणु वर्तुळाची वक्रता परीघ अंशी / व्यास छेदी (π) उरवी तत्त्वता वर्तुळाचे केन्द्र जीवा # ना कधीही स्पर्शिते केंद्र गिळता तीच जीवा व्यास बनुनी राहते (π) द्विगुणित होऊनी परिघास जेव्हा भागतो हाती ये त्रिज्या-जिला व्यासार्ध कुणी संबोधितो वर्तुळाच्या गारुडाने भूल गणिती टाकली जटिल विद्यांची कवाडे (π) करितो किलकिली परीघ, त्रिज्या दोन्हीही परिमेय असती पण तरी (π ) का मज वेड लावी अपरिमेयाचे परी ~~~~~~~~~~~~~ # जीवा = chord of a circle (π) = 3.14..... अपरिमेय= मोजता न येणारे/ irrational
लेखनविषय:

याद्या 2014