Skip to main content

इनोद (अर्थातच पी जे, चोरलेले इ. इ.)

Published on 20/01/2011 - 17:03 प्रकाशित मुखपृष्ठ
उगाच पाचकळपणा... ______________________ एक बाई दुसर्‍या बाईला विचारले प.बा.:तु हा गहू कसा आणला? दु.बा.:पिशवीतून आणला प.बा.:तसं नाही हो, कोणत्या भावाने आणला? दु.बा: चुलत भावाने आणला.. -------------------------------- गावकरी: १० रुपयाच्या रिचार्ज वर किती टॉकटाईम मिळेल? दुकानदारः ७ रुपये.. गावकरी: ठीक आहे..उरलेल्या ३ रुपयांची चॉकलेटं द्या... ------------------------------- जर २५ रुपयाला पाव भाजी मिळते, तर १०० रुपयाला काय मिळेल? : : : : : : : फुल भाजी..
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 9208

गरजू हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत

Published on 20/01/2011 - 15:34 प्रकाशित मुखपृष्ठ
माझ्या माहितीतल्या एका संस्थेतर्फे गरजू व हुशार विद्यार्थ्यांना काही आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने एक उपक्रम चालू होत आहे. ज्या विद्यार्थ्यांना या वर्षी दहावीत ९४%च्यावर गुण मिळतील तसेच त्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. १,८०,०००/- पेक्षा कमी असेल अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. सायन्स आणि कॉमर्स शाखेतील ११वी आणि १२वी साठी आर्थिक मदत केली जाईल. जर का विद्यार्थ्याने १२वीत परफॉर्मन्स मेंटेन केला तर वैद्यकिय अथवा अभियांत्रिकीच्या (फक्त शासकिय महाविद्यालायतील) शिक्षणासाठी देखिल मदत केली जाऊ शकते. आपणा सर्वांना नम्र आवाहन...
लेखनप्रकार

याद्या 5179

सोया क्युब्स पुलाव आनि सुकि भाजि

Published on 20/01/2011 - 15:19 प्रकाशित मुखपृष्ठ
सोया पुलाव सोयाबीन क्युब्स हा नॉनवेज ला एक पर्याय आहे असे म्हणतात (मला नक्की माहित नाही ) असो ........ सोयाबीन क्युब्स, पाऊन किलो तांदूळ ,हिरवे मटार,कांदा उभा चिरलेला ,टोमाटो चीरलेल, हि.

याद्या 7461

तारुण्य ..!!

Published on 20/01/2011 - 13:17 प्रकाशित मुखपृष्ठ
तारुण्य किती मस्त असते एक छान कविता असते तारुण्य म्हणजे सळसळनारा कल्लोळ असतो बेदम असा उत्साह असतो मस्तीचा एक डंख असतो डंख मारण्याची डंख घेण्याची हीमत म्हणजे तारुण्याचा कैफ असतो तारुण्याला नसतो भविष्यकाळ नसतो भूतकाळ त्याला असतो फक्त वर्तमानकाळ भूतकाळाने तो नाही मन रिझवत तो जगत असतो आजची स्वप्ने आणि ठाऊक असतात उद्याची बहाणे तारुण्य पाखराच्या मस्तिसारखे असते फुलपाखरासारखे झुलत असते काय करू नि काय नको त्यांचे मस्त एक गाणे असते तारुण्यात असते आभाळावर मुठ उगारण्याची हिम्मत कोठल्यातरी ध्यासाने त्यांचे मन जाते झिंगत काविता सुद्धा जमून जातात अस्सल मस्त टिकून राहतात जन
लेखनविषय:

याद्या 2662
काव्यरस

भविष्य / ज्योतिष वगैरे वगैरे वगैरे

Published on 20/01/2011 - 09:46 प्रकाशित मुखपृष्ठ
१. युयुत्सु ह्यांच्या भविष्य अथवा ज्योतिष शास्त्र पद्धती प्रमाणे ते कोणताही तोडगा अथवा उपाय करायला सांगत नाहीत. आणि एकूणच त्यांची पद्धती ही प्रचलित लोकप्रिय पद्धतींपेक्षा वेगळी दिसत आहे. त्यानी ही पद्धत नीट मराठी भाषेत समजावून सांगितली तर कदाचित होणारे गैरसमज टळतील. २.अ. युयुत्सु ह्यांचा देव आणि धर्म ह्या गोष्टीशी संबंध नसल्याने ते हा मुद्दा मान्य करतील असे नाही. परंतु ज्या गोष्टींचे कारण आपल्याला समजले नसेल त्या गोष्टी बहुधा नशीब अथवा प्रारब्ध ह्यावर ढकलल्या जातात.

याद्या 9957

२०११ चा क्रिकेट विश्व चषक कोण जिंकेल ?

Published on 20/01/2011 - 08:39 प्रकाशित मुखपृष्ठ

याद्या 1829
प्रतिक्रिया 26

In reply to by स्पा

स्पावड्या, असले निरर्थक कौल काढत जाउ नकोस, या प्रश्र्णाला (कसे लिहायचे?) दुसरे काही उत्तर असूच शकत नाही. तेंडुलकर अलगद पणे विश्वचषक ओढुन आणेल पैजारबुवा,

In reply to by ज्ञानराम

अरे आशा नका लाऊ............... २००३ च्या जखमा अजून विसरू शकलो नाहीये मी

In reply to by स्पा

अर्थात भारत
म्हटलंच आहे ' उम्मीद पे दुनिया कायम हे . जुन्या घोषणा आठवल्या जितेगा भाई जितेगा इंडिया जितेगा ताक ह्या वेळच्या फुटबॉल विश्व चषक स्पर्धेत माझा संघ स्पर्धेबाहेर फेकला गेल्यावर मी जर्मनीतून जो टाहो फोडला ..आकांत तांडव केला .दुखाश्रू गाळले. कि माझा आकांत थेट रोमनगरीत पोहचला .( भावना पोहचल्या हे महत्वाचे )

In reply to by निनाद मुक्काम …

आरे कोणिहि जिन्कल तरि आपल्यात काय फरक पदतो का? उगिच काहितरि विचारुन भारत आसे उत्तर आयकुन समाधान वाटत आसेल तर मग भारत. बरे वाट्ले ना. विनित

काय रे ? जर काही भरिव लिहीता येत नसेल तर खरडवह्यांतुन ग्गो ग्गो गप्पा मारत बस ना ? त्याने किमान चार काँटॅक्ट्स तरी वाढतील तुझे ? हे असले वांझोटे कौल काढुन तु संस्थळ प्रगल्भ बनवणार की संस्थळकल्याण करणार? :) स्पा ला शुभेच्छा :)

In reply to by टारझन

कुणी ही जिंकल तर काय फरक पडणार आहे? तुला मला फक्त जास्त पैसे द्यावे लागतील; खाद्यपदार्थ जंक फूड शीतपेय ईतर पेय वस्त्रप्रावरणे सगळे स्पॉन्सरशीप चा खर्च आपल्याकडून वसूल करतात.

बांग्लादेश विरूद्ध नेदरलँड्स फायनल होणार. तिथं काय होईल सांगता येत नाही. नेदरलॅण्ड्सचा टेन डोशेट एकहाती सामने फिरवू शकतो तर बांग्लादेशच्या तमिम इक्बालमुळे भल्याभल्यांना धडकी भरते. डर्क नॅनेसने मातृभूमीशी फितुरी करून नेदरलॅण्ड्स कडून पदार्पण केले खरे मात्र ऑस्ट्रेलियन संघाकडून ऑफर येताच लगेच तो नेदरलॅण्ड्सच्या संघाशी द्रोह करून तिकडे पळाला. आता डर्क नॅनेसला कांगारून विश्वचषकासाठीच्या १५ जणांच्या संघात स्थान दिलेले नसल्याने तो नेदरलॅण्ड्सकडून खेळणार असल्याची खबर आहे. त्याच्यासारखा तेजतर्रार गोलंदाज असताना नेदरलॅण्ड्सची गोलंदाजीची बाजू मजबूतच होणार असल्याने त्यांनीही 'झालं गेलं र्‍हाईनला मिळालं' या तत्त्वानुसार डर्कला 'आपलं' म्हटलेलं आहे! हर्शल गिब्ब्सचा दक्षिण आफ्रिकन संघात समावेश नसल्याने वॅन बुंजचा आत्मविश्वासही सध्या उत्तुंग आहे! 'एरिक स्झ्वार्क्झिंकी' हा नवा खेळाडू नेदरलॅण्ड्सच्या संघात आहे. त्याच्या नावाचा उच्चार करता करता स्टेनसुद्धा दमून जातो तिथे इतरांची काय कथा! बाकी कर्वेझी, हेगलमन, शिफर्ली, क्रुगर, याँकमन सारखे इतरही खेळाडू आहेतच. शिवाय यंदा फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्पेनने केलेल्या पराभवाचे उट्टे तिसर्‍याच एखाद्या संघावर काढण्यास डच क्रिकेट संघ उत्सुक आहे. तर दुसर्‍या बाजूस बांग्लादेशकडे तमिम इक्बाल नावाचा वाघ आहे. मश्रफे मोर्तझाने शॉन टेटला स्पीडसाठी चॅलेंज केले आहे. मोहम्मद अश्रफुल यावेळी पूर्णवेळ फिरकी गोलंदाज म्हणून खेळणार आहे. एबी डीव्हिलियर्स या सध्या फलंदाजांच्या रँकिंगमध्ये १ नंबरवर असणार्‍या फलंदाजाची दोन टप्पी डिलिव्हरीवर विकेट घेणार्‍या मनुष्यास काय अशक्य आहे? वेळ पडलीच तर तो बॅटींगसुद्धा करू शकतो. थोडक्यात तो बांग्लादेशचा युसुफ पठाण आहे. 'डॉलर मेहमूद'वर संघाच्या बेटिंग.. हे आपलं.. बॅटिंगची मदार आहे. शाकिब-अल-हसन यंदा कदाचित यष्टिरक्षणही करेल. अर्थात त्याच्या दहा ओव्हर्सचा कोटा संपल्यावर. थोडक्यात तो बांग्लादेशचा डॅनियल व्हेटोरी आहे. (व्हेटोरीनंही न्यूझीलंडकडून यष्टीरक्षण करायचं तेवढं बाकी आहे. बाकी सगळं करून झालंय त्याचं. शाकीबचंही तेच.) शिवाय रूबल हुसेन, मोहमदुल्ला, इम्रुल केय्स, आफ्ताब आहमद वगैरे मंडळी आहेतच. आफताब तर ढाक्यातून चितगावात शॉट मारतो! भरीस भर म्हणून फुटबॉल मॅचेससुद्धा जिथं रद्द होतील अशी ग्राऊंड्स त्यांच्या दिमतीला आहेतच. पहिली फेरी तर ते याच मैदानांच्या जोरावर पार करणार! आपले पैसे बांग्लादेशवर.

सावलीतला कोलाहल

Published on 20/01/2011 - 07:11 प्रकाशित मुखपृष्ठ
रोज संध्याकाळी फ़िरून परत येण्याच्या वाटेवरच शॉप अ‍ॅन्ड सेव्ह सुपरमार्केट आहे. त्यामुळे अचानक लागलेले किंवा अचानक आठवलेले वाणसामान तिथून आणण्याची सोय आहे. एकदम मोठी यादी वगैरे बनवून दोन तीन आठवड्यांचे सामान जरा दुरच्या मार्केटमधून आणून टाकलेले असतेच. तरीही वाटेवर हे जास्त वर्दळ नसलेले दुकान दिसले, की पाउले तिकडे उगाचच वळतात. मग आलोच आहोत तर माझे उगाच अबरचबर खादाडीचे जिन्नस टोपलीत टाकणे, त्यावर चित्राचे ठरलेले भाष्य ऐकणे वगैरे प्रसंग नेहमीचेच. आज देखील हा मराठीतला प्रेमळ संवाद ऐकून तिथे नेहमी दिसणारी चायनीज म्हातारी मंदसे हसली.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3554

पंतप्राधान ?????

Published on 20/01/2011 - 02:04 प्रकाशित मुखपृष्ठ
आत्ताच एक (खरेतर शिळी) बातमी वाचनत आली. धक्का बसला. धक्का आपले पंतप्रधान, जे उच्च विद्या विभुषीत आहेत, ते रिझर्व बँकेचे गव्हर्नर होते, त्यांनी अशी प्रतिक्रीया द्यावी??????????? http://news.in.msn.com/national/article.aspx?cp-documentid=4817477 (तिनही भाग वाचा)

याद्या 2807