मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गरजू हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत

विनायक प्रभू · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
माझ्या माहितीतल्या एका संस्थेतर्फे गरजू व हुशार विद्यार्थ्यांना काही आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने एक उपक्रम चालू होत आहे. ज्या विद्यार्थ्यांना या वर्षी दहावीत ९४%च्यावर गुण मिळतील तसेच त्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. १,८०,०००/- पेक्षा कमी असेल अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. सायन्स आणि कॉमर्स शाखेतील ११वी आणि १२वी साठी आर्थिक मदत केली जाईल. जर का विद्यार्थ्याने १२वीत परफॉर्मन्स मेंटेन केला तर वैद्यकिय अथवा अभियांत्रिकीच्या (फक्त शासकिय महाविद्यालायतील) शिक्षणासाठी देखिल मदत केली जाऊ शकते. आपणा सर्वांना नम्र आवाहन... आपल्या माहितीत असे कोणी विद्यार्थी असतील तर कृपया पूर्ण माहितीसह (नाव, पत्ता, पालकांचे नाव व पत्ता, आर्थिक उत्पन्नाचे तपशील) कृपया मला व्यनि करावा. विद्यार्थ्याची मुलाखत, एक प्रवेश परिक्षा, काउंसेलरची घरी भेट आणि पालकांच्या उत्पन्नाच्या आकड्यांची शहानिशा या नंतर अंतिम निवड केली जाईल. तुम्ही काही मित्रांनी सुरु करुन दिलेले छोटेसे रोप मोठे होतेय. धन्यवाद.

वाचन 5177 प्रतिक्रिया 0