Skip to main content

....विश्वाची उलगड होते.....

लेखक कानडाऊ योगेशु यांनी सोमवार, 16/05/2016 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
....विश्वाची उलगड होते..... केसांस झटकता सखये,ह्रदयाची पडझड होते.. केसांत माळता गजरा,ह्रदयाची फुलझड होते.. पंखांस विसरतो जेव्हा,(तू) सदनाचा पत्ता देते. मी ऊंच भरारी घेतो,पंखांची फडफड होते. तू कविता बनूनी भिनता,श्वासांचे ध्रुपद होते! मी गीत लिहाया बसतो,शब्दांची गडबड होते. मी चाळली किति समिकरणे,पण गुढ उकलले नाही तव मिठित सखये अवघ्या,विश्वाची उलगड होते.** असतेस जवळि तू जेव्हा..जगण्याचे गाणे होते... नसतेस जवळि तू तेव्हा....जगण्याची तडफड होते धग ती नव्हतीच वणव्याची,होळीची ऊब असावी. निद्रेत सुखाने शिरता..स्वप्नांतहि धुळवड होते... सर्वस्व अर्पूनि मजला,तू मज ईश्वरसम करते मी तुझा पुजारी बनतो...

< < < < मजबूरी हय > > > >

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 16/05/2016 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
मिकादा, पैजारबुवा, अभ्यादादा आऊर रातराणीतै के पिच्चे पिच्चे मै भी कस्काय चल पड्या कायच म्हैती नाही. पन मेरा भी जळके करपा मस्सालाभात हुवा इस्लीये मयनेभी हिन्दिक्की चिंदी करनेका ठाणच डाल्या. मंग काय...एक आय अपने पोरट्याको कयसे धोपातटी हय वैच्च चित्र कविता मे उतारके इद्दर डालरा हू!

एक उर्दू गझल - जो ठिकाना हैं हमारा

लेखक पथिक यांनी सोमवार, 16/05/2016 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
जो ठिकाना हैं हमारा हम वही जा रहेंगे मिटटी से आये हैं मिटटी से जा मिलेंगे ये हवा जो चली हैं इसके संग संग बहेंगे कभी फूलों को चूमेंगे कभी धुल से खेलेंगे न काफ़िलों से दोस्ती न मंज़िलों से यारी कहीं भी रुकेंगे, किधरको भी चलेंगे बेकार न जायेगा रोना यहाँ हमारा एक आंसूं में से कल हज़ार फुल खिलेंगे होशवालों को मुबारक बाग़े होश की सैर हम दश्ते जुनूं में अपने यार से मिलेंगे (कुणी अनुवाद केला तर उत्तम)
काव्यरस

< < < मजबूरी है > > >

लेखक रातराणी यांनी सोमवार, 16/05/2016 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
पैजारबुवा के पाऊल पे पाऊल डालते हुए मयभी इधर अपनी एक मजबूर रचना प्रस्तुत करती हूँ. मिकादादा, पैजारबुवा, एसभाय, और अपने मोहल्ले के आन बान शान अभ्या दो डॉट सबकी माफी पयलेसे ले लेती हूँ. दुनियाकी हर एक औरत अपने नवरे का सबसे ज्यादा म्हणजे लयच गुस्सा कब करती मालूम? जब वो घोरता है तब.

मोबदला

लेखक पथिक यांनी सोमवार, 16/05/2016 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
किती उदास संध्याकाळी किती एकाकी रात्री किती अस्वस्थ दिवस संपले हरवून गेले या गुंतलेल्या वाटांमध्ये तुला शोधता शोधता पण याचा मोबदला फक्त एवढाच मिळाला कि कधीतरी एखाद्या वाटेत एखाद्या वळणावर एक खूण दिसली एक अस्पष्ट खूण तुझ्या पावलांची

माझा मंडपेश्वर अनुभव

लेखक वडापाव यांनी सोमवार, 16/05/2016 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
काल दहिसर बोरिवलीदरम्यानच्या मंडपेश्वर लेणींमध्ये जाऊन आलो. भारतीय इतिहास संकलन समितीच्या बोरीवली शाखेनं आखलेला कार्यक्रम होता. तन्ना सरांचा मेसेज आला आणि लगोलग तो दहा-बाराजणांना पुढे पाठवला. रविवारचा सुटीचा सोयीचा दिवस आणि मंडपेश्वरबाबत डाॅ. सूरज पंडित (Dr. Suraj A. Pandit ) यांच्याकडून मोफत माहिती. ब-याच जणांनी हो-नाही म्हणत, काही जणांनी 'मंडपेश्वरात काय पाहायचं' असा पवित्रा घेत, शेवटी माझ्यासोबत एकटा ( Manas Barve ) मानस बर्वेच आला. तोही वेळेच्या आधी. मीच आरामात उठून चेंगटासारखं आटपत आलो. येताना न विसरता कॅमेरा सोबत घेतला.

ग्लास टॉप, हॉब टॉप, फॅन्सी गॅस शेगडी - ग्राहकांच्या जिवाशी खेळ?

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 16/05/2016 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
LPGHomemakerपरिक्षा संपल्या, त्या परिक्षांचे निकाल लागले. सुट्ट्या सुरु झाल्या आणी संपल्या. लगेच संपल्या? हो... लगेच संपल्या. शाळेत SSC बोर्ड बदलून CBSE चे वारे वाहायला लागल्याने शाळा 4 एप्रिलला सुरुही झाल्या. दोन्ही चिरंजीवांच्या शाळा सकाळी, त्यात धाकटा CBSE ला तर मोठा SSC बोर्डच्या 10 वीच्या वर्गात पदार्पण.

बायको कोण असते...

लेखक निओ यांनी सोमवार, 16/05/2016 01:36 या दिवशी प्रकाशित केले.
एक हलकी फुलकी कविता. बायको कोण असते... कधी ती पायात लुडबुडणारी मांजर असते कधी ती लाडिक चाळे करणारी प्रेयसी असते कधी ती अटीतटीने भांडणारी विरुद्ध पार्टी असते कधी समजून घेणारी मित्र असते कधी त्रास देणारी डोकेदुखी असते कधी मस्का लावणारी असते कधी जवळ असावी असे वाटताना गैरहजर असते आणि कधी नको असताना जवळ असते कधी न सांगता समजून घेते कधी गैरसमज करून घेते कधी मुलांची काळजी करते कधी स्वतःच्या रुपाची तारीफ करते कधी नवर्याला नावे ठेवते कधी नवर्याचा पगार वाढवून सांगते कधी फिरायला नेलं कि नखरे करते कधी हट्टउन हौस पुरवून घेते कधी हौसेने नवीन पदार्थ करून खायला देते कधी शॉपिंगने बेजार कर

तो हा नाथसंकेतीचा दंशु

लेखक सतिश गावडे यांनी सोमवार, 16/05/2016 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
पिण्डे पिंडाचा ग्रासु | तो हा नाथसंकेतीचा दंशु | परि दाऊनि गेला उद्देशु | महाविष्णु ||ज्ञा. ६-२९१|| "अलख निरंजन" आपेगांवच्या गोविंदपंत कुलकर्ण्यांच्या वाडयासमोर उभे राहून त्या कानफाटया जोग्याने आवाज दिला. दाढीजटा वाढवलेल्या, कमरेपासून छातीपर्यंत गुंडाळलेली मेखला, जानव्यासारखी शोभणारी शैली, हरणाच्या शिंगाची शॄंगी, पुंगी, कर्णकुंडले, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, हातात त्रिशूल, काखेत झोळी, पायात खडावा अशा काहीशा आदरयुक्त भीतीदायक वेशात तो जोगी घरातून भिक्षा येण्याची वाट पाहत होता.