मोबदला
लेखनविषय:
किती उदास संध्याकाळी
किती एकाकी रात्री
किती अस्वस्थ दिवस
संपले
हरवून गेले
या गुंतलेल्या वाटांमध्ये
तुला शोधता शोधता
पण याचा मोबदला
फक्त एवढाच मिळाला
कि कधीतरी
एखाद्या वाटेत
एखाद्या वळणावर
एक खूण दिसली
एक अस्पष्ट खूण
तुझ्या पावलांची
वाचने
1139
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
हम्म अजून काहीतरी हवं होतं पुढे असं वाटलं.
In reply to हम्म अजून काहीतरी हवं होतं by रातराणी
पायातलं पडलेलं पैंजण वगैरे??
In reply to पायातलं पडलेलं पैंजण वगैरे?? by चांदणे संदीप
हि कविता कोण्या व्यक्तीला उद्देशून नाही. यातला 'तू' अमूर्त आहे.
हम्म अजून काहीतरी हवं होतं