मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दाटलेली हुरहूर.

Deepak Pawar ·
लेखनविषय:
दाटलेली हुरहूर मन असं सैरभैर कुणाचे हे रंग सारे पसरले मनभर काय झाले असे मन वेडेपिसे कुणाचे हे मनावर उमटले ठसे. रंग न्हाली सांज येई कुणाची ही भूल पडे गंध ओल्या वाऱ्यातून कुठे मन दूर उडे शोधिते कुणाला कळेना मनाला झाडातून पानातून कोण आता दिसे कुणाचे हे मनावर उमटले ठसे. उमललेल्या पहाटेस सपनात येई कोण बहरल्या वेलीपरी मोहरुन जाई मन कुणाचे हे रूप मनभर धूप पसरून दिसभर गंधाळते जसे कुणाचे हे मनावर उमटले ठसे. https://youtu.be/RBXDiuu3qT8

मेंदूच्या विकासातील टप्पे - नवे संशोधन

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मेंदूच्या विकासातील टप्पे - नवे संशोधन -राजीव उपाध्ये २०२५ च्या अखेरीस 'नेचर कम्युनिकेशन्स' मध्ये प्रकाशित झालेल्या कॅम्ब्रिज विद्यापीठाच्या संशोधनाने मानवी परिपक्वतेच्या पारंपारिक सीमांना पूर्णपणे बदलले आहे. या संशोधनाने मेंदूच्या रचनेचे पाच मुख्य कालखंड आणि ९, ३२, ६६ आणि ८३ हे चार कालखंड पाडले. या वयातील "वळण-बिंदू (टर्निंग पॉईण्ट) ओळखून, हे संशोधन असे स्पष्ट करते की मानवी मेंदू त्याच्या स्थिर आणि पूर्ण विकसित अवस्थेत चौथ्या टप्प्यापर्यंत पोहोचत नाही. तसेच हे संशोधन असे सूचित करते की, ज्याला सध्या पौंडावस्था (adolescence) मानले जाते, ती अवस्था वयाच्या ३२ व्या वर्षापर्यंत सुरू राहते.

आंब्याच्या झाडवरचे सरडे

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सरकार बदलली तरी तेच-तेच लोक टोप्या बदलून पुन्हा सत्तेत येतात. पुन्हा सत्तेची मलाई खाण्यात ते दंग होतात.

"बौद्ध मूर्तीशास्त्र"

Bhakti ·
लेखनविषय:
सर्वांना वाटेल की मी अतीच सिनेमे पाहते काय(कोणाला आपल्याबद्दल काही वाटलं तरी आपण बदलू नाही ,हा बेसिक नियम मान्यच असेल ..:)) तर मी माझ्या क्षेत्राशिवाय अजूनही काही विशेष पाहत असते.मुळात अज्ञानी राहायला आवडत नाही.३ इडियट मधल्या रांचोचा एक डायलॉग मला फार रिलेट होतो,कायमच...

ए. आय. वापरून केलेले मराठी लेखन कसे ओळखावे?

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
इंग्रजी आणि युरोपियन भाषांमधे लेखन करण्यात ए. आय. पटाईत आहे. (विवेकी आहे का ते अजून माहित नाही पण पटाईत मात्र आहे, अजिबात विवेक नसलेले पटाईत लेखक माणसांत देखील असतात त्यामुळे ए. आय. तर आपल्याच डेटावरचा पोपट आहे), मात्र भारतीय भाषांमधे लेखन करताना खूपदा ए. आय. बेसिक चुका करतो. आताशा त्या चुका बर्‍याच कमी झाल्या असल्या आणि उत्तरोत्तर या चुका कमीच होत जाऊन अनकॅनी असे लेखन तो करेल.

ए०आय० - एक नवे देवत्व!

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
 ए०आय० - एक नवे देवत्व! ============================ - राजीव उपाध्ये टीप - एक घोषणा करणे आवश्यक आहे - कदाचित हा लेख ए०आय० ला एक प्रॉम्प्ट देऊन लिहीला आहे, असे किरकिर करणार्‍यांना वाटू शकते. पण हे ए०आय० बरोबर केलेल्या **दीर्घ** विचारमंथनाचे संकलन आहे. त्यामुळे त्यावर माझे संस्कार झालेले आहेत. सुमारे दोन वर्षापूर्वीचा म्ह० ए०आय० अवतीर्ण होऊन स्थिराऊ लागला तेव्हाचा एक गमतीदार प्रसंग आहे.

मंतरलेले बेट (ऐसी अक्षरे -३९)

Bhakti ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
1 "मंतरलेले बेट" हे व्यंकटेश माडगूळकरांनी अनुवादित केलेले एक अतिशय सुंदर आणि वेगळे पुस्तक आहे. मूळ इंग्रजी नाव "Big City, Little Boy" आणि लेखक Manuel Komroff.

सायकल… एक प्रवास, एक विश्व

Avinash Anushe ·
लेखनप्रकार
पुणे ग्रँड टूरच्या निमित्ताने पुन्हा एकदा पुण्याच्या आसपासच्या निसर्गरम्य परिसरात झालेला रस्त्यांचा बदल आणि सायकलिंगसाठी निर्माण झालेली अनुकूल परिस्थिती प्रकर्षाने जाणवली. डोंगररांगा, हिरवीगार दऱ्या, तलाव आणि वळणावळणाचे रस्ते यांच्या सान्निध्यात सायकल चालवण्याचा अनुभव खऱ्या अर्थाने वेगळाच असतो. कधीकाळी पुण्याच्या आसपास सायकलिंग करताना मनात नेहमी एक विचार यायचा या सुंदर परिसरात जर दर्जेदार रस्ते आणि सायकलिंगसाठी अधिक सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या, तर पुणेकरांना किती अप्रतिम अनुभव घेता येईल! आज त्या कल्पना प्रत्यक्षात उतरताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर मला माझा सायकलिंगचा प्रवास आठवला.

बांगलादेश

खटपट्या ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
बंगलादेशा ने भारतात सुरक्षेच्या कारणास्तव सामने खेळण्यास नकार दिला म्हणून आता त्यांचा T20 विश्वचषकातला सहभाग जवळजवळ संपुष्टात आला आहे, मुळात बांगलादेशाने भारतात ते सुरक्षित नाही असे म्हणणे म्हणजे एखाद्या वारांगनेने माझे शील तुमच्या घरी आले तर धोक्यात येऊ शकते असे म्हणण्यासारखे आहे, बांगलादेश स्वतःला स्वप्नात अमेरिका, किंवा कॅनडा समजतो की काय? मजा म्हणजे बंगलादेशाच्या खेळाडूंना भारतात सुरक्षित वाटत नसेल तर इतके बांगलादेशी धोका पत्करून भारताची सीमा ओलांडून का येतात? कमीतकमी इथून परत गेलेल्या बांगलादेशी नागरिकांनी तरी त्यांच्या खेळाडूंना सांगावे की बाबांनो भारतात काहीच धोकादायक नाही. तुम्ही खेळ

भूमिगत मेट्रो , नेहरू विज्ञान भवन, नेहरू तारांगण आणि नेहरू केंद्राला भेट

गोरगावलेकर ·
लेखनविषय:
वरळीच्या या ठिकाणांना पूर्वी अनेकदा भेट दिली असली तरी परत एकदा जावेसे वाटत होते . भूमिगत मेट्रोने पहिला प्रवास हे ही मनात होते . या मेट्रोस मुंबई मेट्रो लाईन ३  किंवा अ‍ॅक्वा लाईन म्हणून ओळखले जाते . सरकत्या जिन्याने उतरून छशिमट मेट्रो स्थानकात आलो . खिडकीवर सायन्स सेन्टर स्टेशनचे तिकीट काढले . तिकीट रु . ३ ० /- मात्र . स्टेशन अगदी चकाचक . फलाटावर जाण्याचा मार्ग आणि फलाटावर आज शुकशुकाट .