वरळीच्या या ठिकाणांना पूर्वी अनेकदा भेट दिली असली तरी परत एकदा जावेसे वाटत होते .
भूमिगत मेट्रोने पहिला प्रवास हे ही मनात होते . या मेट्रोस मुंबई मेट्रो लाईन ३ किंवा अॅक्वा लाईन म्हणून ओळखले जाते . सरकत्या जिन्याने उतरून छशिमट मेट्रो स्थानकात आलो . खिडकीवर सायन्स सेन्टर स्टेशनचे तिकीट काढले . तिकीट रु . ३ ० /- मात्र . स्टेशन अगदी चकाचक . फलाटावर जाण्याचा मार्ग आणि फलाटावर आज शुकशुकाट .
गाडी येण्याची सूचना मिळाली . काही सेकंदासाठी प्लॅटफॉर्मच्या बाजूस असलेल्या काचेचे व आलेल्या गाडीचे दोन्ही दरवाजे एकाच वेळी अघडल्या गेले .
आम्ही आत शिरलो . काही सेकंदात दरवाजे बंद झाले . गाडी जणू काही आमच्यासाठी आरक्षित अशी संपूर्ण मोकळी . बहुदा शनिवारचा दिवस असल्याने बरीच कार्यालये बंद असावीत .
फोटोच्या नादात आमचा एकजण फलाटावरच राहिला होता . आम्ही सायन्स सेन्टर स्टेशनला उतरून त्याची वाट पहिली . दहा मिनिटात पाठीमागच्या गाडीने तोही येऊन पोहचला . बरे झाले आम्ही प्रत्येकाकडे ज्याचे त्याचे तिकीट दिले होते . कारण स्टेशनहून बाहेर पडताना देखील तिकीट स्कॅन करावे लागते , सरकत्या जिन्याने वर आलो . प्रवास खूपच सुखकारक झाला होता .
अगदी बाजूलाच विज्ञान केंद्र आहे .
एक थ्री डी शो आणि अजून एक दुसरा शो मिळून प्रत्येकी रु . १ ३ ० /- चे तिकीट काढले .
केंद्राच्या आवारात बाग आहे आणि तेथे विज्ञानावर आधारित पुष्कळ खेळ ठेवले आहेत . जसे तरफेचा उपयोग करून वजन उचलणे . साखळी - कप्पीचा उपयोग . एकाच उंचीवर बांधलेले पण विविध लांबीचे झोके . लंबकाचा आंदोलनकल त्याच्या लांबीवर अवलंबून असतो त्याचे प्रात्यक्षिक . येथेच एक दीड तास सहज वेळ घालवू शकतो .
नंतर केंद्रात प्रवेश केला . येथेही काही प्रात्यक्षिकं आहेत . आणि वरच्या काही मजल्यांवर मानव इतिहास वगैरे चितारले आहे . दोन्ही शो पाहिले . सर्व आवडले .
थोड्याच वेळात वेगवेगळ्या शाळांच्या सहली येण्यास सुरुवात होऊन बरीच गर्दी झाली . शाळांचे शिक्षक मुलांची जबाबदारी असल्याने त्यांना रांगेने शिस्तीत केंद्रात घेऊन जात होते . त्यामुळे मुले बागेतील खेळांना मुकली होती . त्यामुळे एक सांगावेसे वाटते . पालकांनी मुलांना सहलीस जरूर पाठवावे पण स्वतःही निदान एकदा तरी त्यांना स्वतंत्रपणे फिरवून आणावे .
केंद्राच्या बाहेरून टॅक्सी घेतली आणि तारांगणाला पोहचलो . शनिवार , रविवारी येथे घुमटाकार गृहात खागोलशास्त्र व ताऱ्यांबद्दल मराठीतून माहितीपूर्ण दिली जाते . विषय होता आज रात्रीचे आकाश आणि दुसऱ्या भागात ब्रह्माण्डा विषयी माहिती. हा शॊ सुद्धा खूप आवडला .
समोरच गोलाकार आकाराची नेहरू केंद्राची इमारत आहे .
येथे कला दालनात आमच्या परिचितांपैकी एकाचे चित्र प्रदर्शन (व विक्री ) होते . त्यांचा चित्र विषय होता 'सखी ' . मला चित्रांमध्ये जास्त काही समजले नाही पण आमच्या अचानक भेटीने ते मात्र खूप खुश झाले .
अजून वरच्या मजल्यावर 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हे एक कायमस्वरूपी प्रदर्शन आहे जेथे भारताचा इतिहास, संस्कृती आणि कला यांचा वेध घेता येतो .
सर्व पाहून कालीपिलीने परत CSMT आलो . (पूर्वीचे बोरीबंदर जास्त सुटसुटीत वाटते )
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1269
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर चित्र संकलन आणि सहल.
झोपाळ्यावर बसण्याबद्दल
हं म्हणजे वैज्ञानिक तथ्य
In reply to झोपाळ्यावर बसण्याबद्दल by गोरगावलेकर
मला एक कळत नाही या नव्या
प्रश्न रास्त आहे. पण नोकरदार
In reply to मला एक कळत नाही या नव्या by हणमंतअण्णा शंक…
मेट्रो महाग आहे
In reply to मला एक कळत नाही या नव्या by हणमंतअण्णा शंक…
सुरुवातीच्या काही महिने
In reply to मला एक कळत नाही या नव्या by हणमंतअण्णा शंक…
दिल्लीकरांना राग येईल परंतू
In reply to सुरुवातीच्या काही महिने by विवेकपटाईत
खूप छान!
छान लेख !
काहीतरी गैरसमज झालेला दिसतो
In reply to छान लेख ! by धर्मराजमुटके