Skip to main content

बोलाचा हापूस!

लेखक समीरसूर यांनी सोमवार, 16/05/2016 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
कुठल्याही विषयावर अखंड बोलणाऱ्या आणि तुम्हाला बोलण्याची अजिबात संधी न देणाऱ्या व्यक्तीच्या तावडीत तुम्ही कधी सापडला आहात काय? सध्या माझे ग्रह जरा पेंगुळलेले असल्याने माझ्या आयुष्यात असे दुर्मिळ योग वारंवार येत आहेत. माझे ग्रह तसे ही अर्धोन्मिलीत अवस्थेत एखाद्या मवाल्यासारखे कुठेतरी भटकत असतात हा मुद्दा वेगळा! जेव्हा नितांत गरज असते तेव्हा माझे ग्रह कुठे उलथलेले असतात कोण जाणे. बाबा पुता करून एकाला पकडून आणावे तर आधी आणून ठेवलेले पसार झालेले असतात. असो. तर सध्या अशा बोलून बोलून समोरच्याला नामोहरम करणाऱ्या बोलर लोकांच्या तावडीत मी सापडलो आहे.

भारतीय संस्कृतीमधील प्राचीन जलसाक्षरता

लेखक रमेश भिडे यांनी सोमवार, 16/05/2016 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
. पाचव्या शतकात वराहमिहीर नावाचा प्रकांड ज्योतिषी व पर्यावरणशास्त्रज्ञ होऊन गेला. भूगर्भातील पाण्याचा शोध घेण्याविषयी त्यांनी संशोधन केलेच, शिवाय अन्य ऋषींचे संशोधनही आपल्या बृहत्‌संहिता या ग्रंथात लिहून ठेवले. आजच्या काळाला त्याची सुसंगत जोड देत सध्याच्या संशोधनाला त्यातील काही सिद्धांतांचा, नियमांचा उपयोग होऊ शकेल. भूमीच्या अंतर्भागात असणारे पाण्याचे साठे शोधून काढणे हे मोठे आव्हान भूगर्भशास्त्रज्ञांसमोर पूर्वीही होते, आताही आहे.

The Man Who Knew Infinity

लेखक नागेश कुलकर्णी यांनी सोमवार, 16/05/2016 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
सिनेमा ह्या दृकश्राव्य माध्यमामध्ये बरीच ताकद आहे. दिग्दर्शक आपल्या प्रतिभेतून अजरामर अशी कलाकृती निर्माण करू शकतो, जी इतर माध्यामापेक्ष्या प्रेक्षकांना विचार करायला जास्त प्रवृत करते. सिनेमा आपल्याला प्रेक्षक न ठेवता, प्रत्यक्ष कथेचं एक पात्र बनवतो. asdf असाच एक सिनेमा पाहण्यात आला "The Man Who Knew Infinity". थोर भारतीय गणिततज्ञ रामानुजन ह्यांच्या जीवनाचा आणि कार्याचा हा प्रवास. गोष्ट सुरु होते मद्रास मध्ये एका नोकरीसाठी वणवण फिरणाऱ्या तरुणापासून.

<<<माजबुरी है>>>

लेखक नाखु यांनी सोमवार, 16/05/2016 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
लै लै गांजलेल्या मिपाकर वाच्कांनी ह्यो कागुद आमचे टाळक्यात हाणला(आतल्या दगडासकट) (डोक्याव शिरस्त्राण असलेने वाचलो) का? का?

एक ओपन व्यथा १

लेखक वटवट यांनी सोमवार, 16/05/2016 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
…. साधारण संध्याकाळची वेळ… गावातलं एक साधारण मध्यवर्ती पेठ… खूप सारी गर्दी... एक जण (डोकावत) : काय हो? दुसरा (तोही मान उंचावत गर्दीत बघतोय): काय? तोच एक जण: काय झालंय? तोच दुसरा जण: काय माहित… गर्दी दिसली म्हणून घुसलोय.. काय झालंय देव जाणे… तो एक जण पुन्हा एका तिसर्याला: ओ… तिसरा: काय? एक जण: काय झालंय? तिसरा: नाही ओ माहित काही… काहीतरी झालंय खरं… एक जण: ते तर मलापण कळतंय… तिसरा: बहुतेक कोणीतरी मेलंय… पुन्हा तो एक जण: मेलंय??? कि मारलंय?? तिसरा: काय माहित… पण असंच काहीतरी झालंय खरं… कोण मेलंय, कसं मेलंय, मुळात कोणी मेलंय का? असे असंख्य प्रश्न आजूबाजूचे आजूबाजूच्यांना विचारत होते.

....विश्वाची उलगड होते.....

लेखक कानडाऊ योगेशु यांनी सोमवार, 16/05/2016 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
....विश्वाची उलगड होते..... केसांस झटकता सखये,ह्रदयाची पडझड होते.. केसांत माळता गजरा,ह्रदयाची फुलझड होते.. पंखांस विसरतो जेव्हा,(तू) सदनाचा पत्ता देते. मी ऊंच भरारी घेतो,पंखांची फडफड होते. तू कविता बनूनी भिनता,श्वासांचे ध्रुपद होते! मी गीत लिहाया बसतो,शब्दांची गडबड होते. मी चाळली किति समिकरणे,पण गुढ उकलले नाही तव मिठित सखये अवघ्या,विश्वाची उलगड होते.** असतेस जवळि तू जेव्हा..जगण्याचे गाणे होते... नसतेस जवळि तू तेव्हा....जगण्याची तडफड होते धग ती नव्हतीच वणव्याची,होळीची ऊब असावी. निद्रेत सुखाने शिरता..स्वप्नांतहि धुळवड होते... सर्वस्व अर्पूनि मजला,तू मज ईश्वरसम करते मी तुझा पुजारी बनतो...

< < < < मजबूरी हय > > > >

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 16/05/2016 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
मिकादा, पैजारबुवा, अभ्यादादा आऊर रातराणीतै के पिच्चे पिच्चे मै भी कस्काय चल पड्या कायच म्हैती नाही. पन मेरा भी जळके करपा मस्सालाभात हुवा इस्लीये मयनेभी हिन्दिक्की चिंदी करनेका ठाणच डाल्या. मंग काय...एक आय अपने पोरट्याको कयसे धोपातटी हय वैच्च चित्र कविता मे उतारके इद्दर डालरा हू!

एक उर्दू गझल - जो ठिकाना हैं हमारा

लेखक पथिक यांनी सोमवार, 16/05/2016 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
जो ठिकाना हैं हमारा हम वही जा रहेंगे मिटटी से आये हैं मिटटी से जा मिलेंगे ये हवा जो चली हैं इसके संग संग बहेंगे कभी फूलों को चूमेंगे कभी धुल से खेलेंगे न काफ़िलों से दोस्ती न मंज़िलों से यारी कहीं भी रुकेंगे, किधरको भी चलेंगे बेकार न जायेगा रोना यहाँ हमारा एक आंसूं में से कल हज़ार फुल खिलेंगे होशवालों को मुबारक बाग़े होश की सैर हम दश्ते जुनूं में अपने यार से मिलेंगे (कुणी अनुवाद केला तर उत्तम)
काव्यरस

< < < मजबूरी है > > >

लेखक रातराणी यांनी सोमवार, 16/05/2016 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
पैजारबुवा के पाऊल पे पाऊल डालते हुए मयभी इधर अपनी एक मजबूर रचना प्रस्तुत करती हूँ. मिकादादा, पैजारबुवा, एसभाय, और अपने मोहल्ले के आन बान शान अभ्या दो डॉट सबकी माफी पयलेसे ले लेती हूँ. दुनियाकी हर एक औरत अपने नवरे का सबसे ज्यादा म्हणजे लयच गुस्सा कब करती मालूम? जब वो घोरता है तब.

मोबदला

लेखक पथिक यांनी सोमवार, 16/05/2016 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
किती उदास संध्याकाळी किती एकाकी रात्री किती अस्वस्थ दिवस संपले हरवून गेले या गुंतलेल्या वाटांमध्ये तुला शोधता शोधता पण याचा मोबदला फक्त एवढाच मिळाला कि कधीतरी एखाद्या वाटेत एखाद्या वळणावर एक खूण दिसली एक अस्पष्ट खूण तुझ्या पावलांची