गॅरेज युनिव्हर्सिटी...१
गॅरेज युनिव्हर्सिटी...१
(सर्व पात्रे व घटना काल्पनिक)
"विज्या कुठे आहे रे?"
"अरे तो काल रात्रीच गोव्याला गेलाय, येईल तीन चार दिवसांनी, पण तू कसा काय आज सकाळी सकाळी उगवलास?" बाबू शेठचा परिचित आवाज ऐकून फियाट च्या खालूनच कुठलेतरी नट बोल्ट टाईट करता करता अज्या दादा विचारता झाला.
"आयला पहाटे माझा सासरा गचकला, बायको आणि मेव्हण्याला अर्जंट पुण्याला सोडून यायच होतं. विज्या आला असता ना रे पटकन जाऊन."
आता मात्र पाठीवर सरपटत अज्या दादा गाडीच्या खालून बाहेर येत म्हणाला " काय झालं रे त्यांना अचानक? आणि तू नाही का जाणार?"
"हार्ट अटॅक आला होता रात्री... पहाटे खपला.
हमारा स्टेशन हमारी शान
'बोरीवली स्टेशनचा कायापालट'
अशा शीर्षकाची बातमी वाचली तेंव्हाच ठरवलं होतं की आपण अशा कामात भाग घ्यायचा. त्यानुसार लगेच माहिती काढली आणि एम ए डी (मॅड) म्हणजेच मेक अ डिफरन्स फाउंडेशनबद्दल कळलं. मग काही दिवसानंतर डोंबिवली स्टेशनच्या रंगरंगोटीचे फोटो बघितले. आतुरता अजूनच वाढली. हे सगळं होऊन गेल्यावरच का कळतंय, आगोदर का नाही असं वाटायला लागलं.
दरवाजा हो तो ऐसा हो!
साने गुरुजींच्या "खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे" च्या धर्तीवर "मिपाला पोस्ट अर्पावे" या हेतूने पोटावरती हि एक पोस्ट. डोन्टवरी! यात कुठलेही डायट सल्ले नाहीत, व्रत-वैकल्ले नाही, उपास-तापास नाहीत कि लोखंड उचलायचे प्रकार नाहीत. आहे ते एका "पोटिव्हेशन" बद्दल आयमीन "मोटिव्हेशन" बद्दल.
"पोट" हे श्रीमंतीचे लक्षण असतं हे आजोबांचं वाक्य तर चिकन-मटण खाल्यानंतर कमीत कमी दोन तास झोपलं नाही तर माणूस "नरकात" जातो हे बाबांचं वाक्य.
!! यश !!
प्रत्येकाला जीवनात यशाची घाई असते,
यशाचीही चव भलतीच न्यारी असते,
ज्याने ती चाखली ती धन्य होतो,
जो वंचित राहिला बिचारा तो "अन्य" होतो !!
पण यशाच्या अंगी कुठलाही भेद नाही,
धर्म, पंत, जात, लहान, थोर नाही,
मनगटात बळ आणि मनात जिद्द असेल तर,
जगाला काबीज करणेही अशक्य नाही !!
तशीच यशाची एक दुसरीही बाजू असते,
ती तुम्हाला दुस्य्रांच्या ईर्षेच्या यादीत जोडते,
तुम्ही लाख स्वता बरोबर स्पर्धा करत असला तरी,
बाकी जग नेहमीच तुम्हाला प्रतियोगी म्हणून ओळखते !!
मित्रानो यशाचा असं कुठलंच सूत्र नाही,
मेहनत, बुद्धिमत्ता, निष्ठा यांना कुठलाही विकल्प नाही,
यश नाही मिळणार म्हणून जो प्रयत्न करणे सोडतो,
तो कधीच यशाच्य
माझ्या बालपणीचा सुगंधित ठेवा... गुलाब
तिथे वर कुठे तरी स्वर्ग असतो म्हणे.... त्या स्वर्गात देव रहात असतात म्हणे... तेच आपलं भविष्य एका पुस्तकात लिहीत असतात म्हणे... त्यांचं ते लिखाण आपल्याच कृतीवर अवलंबून असतं म्हणे... त्यालाच प्राक्तन असं संबोधन असतं... म्हणजे आधीच्या जन्मातल्या आपल्या वर्तणुकीवर ते लिखाण ठरतं म्हणे... आणि त्याच लिखाणाच्या अनुषंगाने आपला दुसरा जन्म आणि त्या दुसर्या जगण्याचा मार्गही ठरतो म्हणे... म्हणजे आधीच्या जन्मात जर आपण काही दुष्कृत्ये केली असतील, तर दुसर्या जन्मात आपल्याला खूप त्रास होतो. त्याचबरोबर आधीच्या जन्मात जर आपण काही सत्कार्ये केली असतील तर दुसरा जन्म सुखाचा जातो...
लंडनवारी - भाग ३ - कॅनलवरचं लॉक आणि साउथ केन्सिंगटन
लंडनवारी: पूर्वतयारी - छोटालं गाव आणि मोठालं शेत - कॅनलवरचं लॉक आणि साउथ केन्सिंगटन
ब्लॉग दुवे: पूर्वतयारी - छोटालं गाव आणि मोठालं शेत - कॅनलवरचं लॉक आणि साउथ केन्सिंगटन
दुसर्या लाँग डे मुळे पुढच्या दिवशी बरीच निवांत जाग आली.
नवरात्र नऊ रंग , स्त्री-शक्ति आणि आम्ही ( मागे वळून पाहताना .....)
नवरात्र नऊ रंग , स्त्री-शक्ति आणि आम्ही ( मागे वळून पाहताना .....)
माझा मूळ लेख आणि त्यावरील प्रतिक्रिया ह्यावर बराच गदारोळ झाला आणि शेवटी तो फक्त वाचन मात्र झाला..
गुपित
गुपित
थांब जरासा अजुनी
अजून समईत वात आहे
थांब जरासा अजुनी
अजून चांदरात आहे
कोमेजून जरी गेला चाफा
कोमेजून जरी गेला गजरा
थांब जरासा अजुनी
रातराणी बहरात आहे
उलटुनी गेला प्रहर
रात्र संभ्रमात आहे
थांब जरासा अजुनी
चाहूल उदरात आहे
राजेंद्र देवी
काव्यरस
मिसळपाव