"पंचांचा निकाल काहीही असो, मी निरपराधी आहे असेच माझे मत आहे. या जगाचे नियमन करणारी.........", लोकमान्य टिळक.
लहान असतांना मराठी दुसरीत गेलेली ही वाक्यं!!!!
मला नेहमी प्रश्न पडत असे की जर लोकमान्य टिळकांना पंचाचा निकाल मान्य नाही तर ते टॉवेल का नाही वापरत?
बाबांना हा प्रश्न विचारला तर त्यांनी हसून सांगितलं की ए येड्या, इथे पंचा म्हणजे अंग पुसायचा नाही तर पंच म्हणजे ज्यूरी......
मी लगेच बाबांना म्हटलं की मला ही ज्यूरी दाखवाच...
पण स्वतंत्र भारतात जन्म झाल्यामुळे ही ज्यूरी पहाणं माझ्या नशिबी नव्हतं.