http://www.misalpav.com/node/21045#comment-381773
समुद्र का विहिर...? बेडकं का खेकडे..? या नस्त्या व्यापाला कटाळुन, जरा नाचगानं करुन शीन घालवावा,,,म्हंन्तो... या मंग करु वाईच डोस्कं ग्गार...
(चाल--- पाडाला पिक्कलाय अंबा...)
सोडलं हो...आता सोडलं हो...आता सोडलं हो,सोडलं भसाभसा पानी
हो...ओ...सोडलं भसाभसा पानी,,,ध--नाजी राव पाटाला भसाभसा पानी ॥धृ॥
धागा ह्यो पडला थंड ,बॉडीत होईल बंड ... ओ धनाजी...
थंड कसा पडला जी,,हो ओ,, थंड पडला कसा जी... ओ पाटिल...
सोडा ना लवकर पानी... ध--नाजीराव सोडा ना भसाभसा पानी.. ॥१॥
कुनाची कापडं काडुन कुनी, दुसर्याची धुतात फुकट धुनी...ओ धनाजी...