Skip to main content

विज्ञान

औषधशास्त्र, औषधे, वैद्यक: ३

लेखक सुधीर कांदळकर यांनी सोमवार, 04/06/2018 या दिवशी प्रकाशित केले.
औषधशास्त्र, औषधे, वैद्यक: १ औषधशास्त्र, औषधे, वैद्यक ३ गेल्या लेखांकात क्लॉड गॅलेन हे नाव अनेक वेळा येऊन गेले. गॅलेनच्या कार्याचा परिचय करून घेतल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. क्लॉड गॅलेन वा लॅटीनीकृत क्लॉडिअस गॅलेनस. मी लॅटीनमध्ये लिहीत असतो तर सुधीरस कांदळकरस असे नाव लिहिले असते वा संस्कृतमधून लिहीत असतो तर सुधीरम कांदळकरम असे (सु)संस्कृत नाव धारण केले असते.

औषधशास्त्र, औषधे, वैद्यक: २

लेखक सुधीर कांदळकर यांनी बुधवार, 30/05/2018 या दिवशी प्रकाशित केले.
हिपोक्रेटस इ.स.पू. ४६० मध्ये जन्माला आला तर सुश्रुत इस.पू. सुमारे ६०० वर्षे. म्हणजे सुश्रुत हा कालक्रमाने हिपोक्रेटसच्याही अगोदरचा आहे. महाभारतातील एका उल्लेखाप्रमाने सुश्रुत हा विश्वामित्र ऋषींचा पुत्र होय. सुश्रुतसंहिता या ग्रंथाचा आजही आदराने उल्लेख केला जातो. सुश्रुतसंहितेत १८४ श्लोक आहेत . त्यात ११२० व्याधींचे तसेच ७७० औषधी वनस्पतींचे वर्णन आहे. ६४ खनिज स्त्रोत असलेल्या औषधांचे आणि ५७ प्राणीस्रोत असलेल्या औषधांचे वर्णन आहे. शस्त्राने शरीराचा छेद घेणे, टोचणे, शरीरात घुसलेली बाह्य वस्तू बाहेर काढणे, जखम चिघळू नये किंवा बरी व्हावी म्हणून रसायनांच्या साहाय्याने चटका देणे इ.

स्वनातीत व्यापारी विमानप्रवास... पुन्हा सुरू होणार !

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 28/05/2018 या दिवशी प्रकाशित केले.
स्वनातीत (आवाजापेक्षा जास्त म्हणजे सुपर-सॉनिक वेगाने ) उडणारी विमाने ही काही नवीन गोष्ट अजिबात नाही. मात्र, लढाऊ विमानांच्या बाबतीत स्वनातीत वेग ही सामान्य गोष्ट असली तरी व्यापारी तत्त्वावर केल्या गेलेल्या स्वनातीत विमानसेवेच्या (commercial supersonic air-travel) मार्गात सतत मोठमोठे अडथळे येत राहिले आहेत. सर्वसामान्य माणसांच्या मनात तर स्वनातीत प्रवास केवळ एक स्वप्न म्हणूनच राहिला आहे. १९६९ ते २००३ या कालखंडात व्यापारी तत्त्वावर चाललेली पहिली वहिली स्वनातीत काँकॉर्ड विमानसेवा बंद पडून आता १५ वर्षे लोटली आहेत. त्या सेवेला सुरुवातीपासूनच अनेक प्रकारच्या समस्यांनी ग्रासले होते.

चतुरभ्रमणध्वनीच्या (स्मार्टफोन) कॅमेर्‍याचे नाविन्यपूर्ण उपयोग

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 18/03/2018 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या घडीला चतुरभ्रमणध्वनी (स्मार्टफोन) बाळगणे ही नेहमिची गोष्ट झाली आहे. यात संभाषण आणि संदेश पाठवणे या सर्वसामान्य सोईबरोबर फोटो काढण्यासाठी कॅमेरा ही एक आकर्षक सोय असते, हे सांगायची गरज नाहीच. किंबहुना, जेथे जातो तिथला फोटो आणि सेल्फी फेबुवर टाकली नाही तर तो अक्षम्य अपराध असावा असा हल्ली फोनकॅमेर्‍याचा उपयोग होऊ लागला आहे.

एका सायन्स प्रोजेक्टची गोष्ट

लेखक बाजीप्रभू यांनी गुरुवार, 01/03/2018 या दिवशी प्रकाशित केले.
"अहो बाबा, तुमचे प्रोजेक्ट्स आजी ने बनवले... माझे तुम्ही बनवताय आणि माझ्या मुलांचे मीच बनवणार आहे कि भविष्यात!! ओपन सिक्रेट आहे हो हे, जजेसनाही माहित असतं कि पॅरेन्ट लोकच बनवतात सायन्स प्रोजेक्ट्स, कशाला भाव खाताय? बनवा कि माझा सायन्स प्रोजेक्ट". आमचं कॉन्सेप्ट, तुमचं लेबर वर्क आणि स्नेहा आणि मी प्रेसेंटेशन करणार, म्हणजे डिमांड-प्रोडक्शन आणि मार्केटिंग असं टिमवर्कचं वर्तुळ पूर्ण होईल सिम्पल. अश्या आर्ग्युमेंट्स करत माझ्या आळशी लेकीने माझ्या गळ्यात एक सायन्स प्रोजेक्ट अडकवला त्याची हि गोष्ट, मी :- बरं विषय काय आहे? ती :- ते माहित नाही तुम्हीच ठरवा. मात्र वर्किंग हवं मी :- ऑ!!

डिजिटल भारतासाठी युजर एक्सपीरिअन्स डिजाईन

लेखक कल्पक यांनी रविवार, 28/01/2018 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या ५००० वर्षात माणसानी जेवढी वैज्ञानिक-तंत्रज्ञानविषयक प्रगती केली त्यापेक्षा जास्त प्रगती गेल्या ५०० वर्षात केली. जेवढी प्रगती गेल्या ५०० वर्षात केली त्यापेक्षा जास्त प्रगती गेल्या ५० वर्षात केली. माणसाच्या प्रगतीचा हा वेग दिवसेंदिवस वाढतच आहे. आज जगाच्या ७ अब्ज लोकसंख्येपैकी ३ अब्ज लोक इंटरनेट वापरतात, ६ अब्ज लोक मोबाईल फोन वापरतात (त्यात १ अब्ज भारतीय मोबाईल धारक आहेत) आणि ३ अब्ज लोक ईमेल वापरतात. जगात १ अब्ज वेबसाईट्स, २ अब्ज संगणक आणि ४० लाख पेक्षा जास्त मोबाईल ऍप्स आहेत.

मनोविकारशास्त्र(psychiatry)--आधुनिक वैद्यकशास्त्रातील एक मिथक!!

लेखक सिंथेटिक जिनियस यांनी बुधवार, 29/11/2017 या दिवशी प्रकाशित केले.
साधारणतः २००६ साली मी कॉलेजमधून पास आऊट झाल्यावर नोकरीसाठी प्रयत्न करु लागलो.इंटरव्ह्युसाठी लांब ठीकाणी जायचे ,तिथे जाण्यासाठी तयारी करायची ,इंटरव्युला सामोरे जायचे असा प्रकार सुरु होता.इंटरव्युला जाताना सुर्वातीला मजा वाटायची नंतर त्याचे दडपण यायला सुरवात झाली.

दमा (Bronchial Asthma ) - चला समजावून घेऊ (भाग - १)

लेखक डॉ श्रीहास यांनी मंगळवार, 29/08/2017 या दिवशी प्रकाशित केले.
प्रास्तविक : माझे वडील गेल्या ३७ वर्षांपासून श्वसनविकार व ॲलर्जीतज्ञ म्हणुन प्रॅक्टीस करत आहेत, सुरवातीच्या ८-९ वर्षांनतर त्यांना रुग्ण प्रशिक्षण कार्यक्रमाची कल्पना सुचली तेव्हापासून आमच्या दवाखान्यात दमा ,COPD आणि टिबी या आजारांसाठी रुग्ण प्रशिक्षण कार्यक्रम घेतला जातो .... ह्या कार्यक्रमाची २००९ साली लिमका बुक आॅफ रेकाॅर्डस् मध्ये नोंद घेतली गेली (१०,००० पेक्षा जास्त रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना प्रशिक्षीत केलं गेलं) आणि इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड मध्ये देखिल दखल घेतली गेली आहे.

आपण स्वप्न का बघतो.

लेखक आदित्य कोरडे यांनी बुधवार, 19/07/2017 या दिवशी प्रकाशित केले.
फार पुरातन काळा पासून माणसं त्यांना पडणाऱ्या स्वप्नांचे अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आलेत. स्वप्नात भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत, पूर्व सूचना मिळतात असे मानले जाते. माणसाना भेडसावणाऱ्या चिंता स्वप्नांचे रूप घेऊन येतात किंवा ईश्वर बऱ्याचदा आपल्या भक्तांशी संवाद साधायला स्वप्न एक माध्यम म्हणून वापरतो असेही मानले जाते. अनेक कवी, लेखक, नाटककार, चित्रकार आदींना त्यांच्या कलाकृती साकार करण्याची प्रेरणा स्वप्नातून मिळाल्याचे सांगितले आहे.

रेकी करताना आलेले अदभुत्,अविश्वसनीय्,अनाकलनीय अनुभव.

लेखक शानबा५१२ यांनी बुधवार, 05/07/2017 या दिवशी प्रकाशित केले.
मी रेकीची 'लेवल १' ही दीक्षा घेतली आहे.रेकी हे एक विज्ञान आहे असे मी मानतो,रेकीला मी कुठल्याच देवाशी कींवा धर्माशी जुळत/जोडत नाही.आता सरळ अनुभव लिहतो.ईथे मी फक्त प्राण्यांसंबधीत आलेले अनुभव लिहत आहे. १) सोनु व ढींगण्या : माझ्या पाळलेल्या पोपटांपैकी नर म्हणजे सोनु.त्याच्याकडे माझे दुर्लक्ष होतेय असे वाटले म्हणुन खुप दीवसांनी पिंज-याजवळ जाउन पिंज-यात हात टाकुन त्याच्यापाठीवर रेकी देउ लागलो.रेकी माझ्या ह्रदयातुन हातात व हातातुन त्याच्यापाठीवर जात आहे असे जाणवत होते.सोनु खुप दीवसाने मी हात फीरवत आहे म्हणुन मला ओळखीचे असे प्रेमळ आवाज काढत होता.अचानक मी पाहीले की त्याने मान पुर्ण खाली घातली व मध्