Skip to main content

विज्ञान

(why is there nothing rather than something ???????)

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 30/06/2017 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

चिरंजीव रॉक्स

लेखक इनिगोय यांनी शनिवार, 10/06/2017 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
संवाद (१) “If you wish to make an apple pie from scratch, you must first invent the universe.” - Carl Sagan ९ – ही मस्त कोट आहे, मला आवडली. ३७ – तुला कळली? ९ – हो. म्हणजे तुम्हाला जर अगदी पहिल्यापासून ऍपल पाय बनवायचा असेल, तर आधी झाड लावावं लागणार. त्याच्यासाठी पृथ्वी बनवावी लागणार. त्यासाठी बिग बँग झाला पाहिजे म्हणजे युनिव्हर्स तयार होईल. ३७ – (!!) कार्ल सगान?? संवाद (२) ९ – हे काय गं, देवाची पूजा नाही केलीस? ३७ – नाही रे बाबा, मला पूजा वगैरे नाही जमत. माझा त्यावर विश्वास नाहीये.

पुरुष नसबंदी आणि समज गैरसमज

लेखक नर्मदेतला गोटा यांनी रविवार, 04/06/2017 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
पुरुष नसबंदी आणि समज गैरसमज पुरुष नसबंदी या विषयाबाबत आपल्या देशात अनेक गैरसमज आहेत. लोकशिक्षण करून ते गैरसमज दूर करावेत असेही कुणाला वाटत नाही. स्त्रियांच्या शस्त्रक्रियेच्या मानाने पुरुष नसबंदी फार सोपी, कमी वेळखाऊ वगैरे वगैरे फक्त जमेच्या बाजूच सांगितल्या जातात. पूर्ण माहीती स्वतः पेशंटला तरी असते की नाही शंका आहे. वास्तविक पेशंटला पूर्ण माहिती देऊन त्याने सारासार विचार करून निर्णय घ्यावा ही अपेक्षा आहे. पण जाहीरात अशी होते. यूं गया यूं आया, आल्यावरही तोच जोष कायम इ. पुरुषावर नसबंदी केल्यावर पुढचे तीन महीने आतमधे वीर्य तसेच असल्याने गर्भधारणा होण्याची शक्यता असते.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम यांना, त्यांचे नाव एका जीवाणूच्या नामकरणासाठी वापरून, नासाने सन्मानित केले !

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 23/05/2017 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
भारतासाठी एक अभिमानास्पद गोष्ट! "भारतासाठी अभिमानास्पद" असे मुद्दाम लिहिले आहे. कारण आज डॉ अब्दुल कलाम हयात असते तर त्यांना त्यांच्या अनेक सन्मानांसारखेच या सन्मानाचेही फारसे अप्रूप वाटले नसते. परंतु, त्यांच्या व्यक्तिमत्वाने भारलेल्या माझ्यासारख्या चाहत्याला या क्षणी अवर्णनीय आनंद झाला नसता तरच आश्चर्य! असामान्य शास्त्रज्ञांचा सन्मान, शास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या गोष्टीचे नामकरण त्यांचे नाव वापरून करण्याचा प्रघात आहे. ते कधी एखाद्या जैविक प्रजातीचे नाव, तर कधी एखाद्या ग्रह/तारा/खगोलशास्त्रीय समूहाचे नाव, तर कधी एखाद्या परिमाण/नियम/संकल्पनेचे नाव, इत्यादी असते.

||कोहम्|| भाग 7

लेखक शैलेन्द्र यांनी मंगळवार, 09/05/2017 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भागात आपण पाहिलं कि मानवाचा अगदी जवळचा नातलग असलेले चिंपांजी संवाद कसा साधतात आणि त्यांच्यात व आधुनिक मानवाच्या भाषेत काय फरक आहे , याच प्रश्नाकडे आता अजून थोडं विस्ताराने पाहू. मुळात मानवी भाषा इतर प्राण्यांच्या भाषेपेक्षा नेमकी कशी वेगळी आहे आणि मानवी मेंदू इतर प्राण्यांच्या तसेच अगदी इतर मानवांच्या मेंदूपेक्षा कोणत्या बाबतीत वेगळा आहे या दोन प्रश्नांबरोबरच, मानवाच्या मेंदूचा त्याच्या भाषेवर काय प्रभाव आहे हेही समजून घेणं महत्वाचं ठरतं. पहिल्यांदा आपण मेंदूत नक्की काय बदल घडले ते पाहू, मानवी मेंदूतील बदल खरंतर 170000 वर्षापासूनच सुरू झाले.

मोबाईल ऍपची कल्पकता आणि उपयुक्तता

लेखक कल्पक यांनी सोमवार, 17/04/2017 01:09 या दिवशी प्रकाशित केले.
युक्रेनमधल्या एका छोट्या खेड्यात एक यान कूम नावाचा मुलगा राहायचा. त्याची आई गृहिणी होती आणि वडील बांधकाम कंपनीत मॅनेजर होते. घरची परिस्थिती बेताचीच होती. मूलभूत सोयींचा तुटवडा होता. तो सोळा वर्षांचा असताना, १९९२ साली युक्रेनमधल्या अस्थिर राजकीय-सामाजिक परिस्थितीमुळे त्याची आई त्याला घेऊन अमेरिकेत कॅलिफोर्नियाला स्थलांतरित झाली, वडील मात्र येऊ शकले नाही. परिस्थिती इतकी बिकट होती की अमेरिकेत खर्च कमी व्हावा म्हणून त्याच्या आईने अभ्यासासाठी लागणाऱ्या वह्या-पेन असं शालेय साहित्य सुद्धा येताना आणलं.

कथुकल्या ३ + शशक पुर्ण करा चॉलेंज

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी रविवार, 16/04/2017 00:58 या दिवशी प्रकाशित केले.
कथुकल्या १ कथुकल्या २ ---------------------- नमस्कार मंडळी. यावेळी तुमच्यासाठी एक चॅलेंज टाकलं आहे. तिसरी कथा शतशब्दकथा आहे…पण ती आहे अपूर्ण. तुम्हाला येईल का ती पुर्ण करता… ----------------------------------------------- १. स्मशानचोर दिग्या अन जग्या मुडदे चोरायचे… स्मशानात पुरलेले. संशयाला जागाच सुटणार नाही असं परफेक्ट त्यांचं काम.

वायूमंडल

लेखक नरेंद्र गोळे यांनी रविवार, 09/04/2017 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या पृथ्वीवर आपण राहतो, त्या पृथ्वीवरच्या भूपृष्ठाचा एक तृतियांश भाग पाण्याने अनावृत्त असला तरी दोन तृतियांश भागावर पाण्याचे विशाल साठे विपुलतेने विखुरलेले आहेत. महासागर आहेत ते. अनावृत्त भागही वस्तुतः वायूंच्या सुमारे दहा किलोमीटर उंचीच्या थराने आवृत्तच आहे. ह्या वायूंचे वजन, म्हणजेच वातावरणीय हवेचा दाब.

जीवात्मा

लेखक संदीप-लेले यांनी शनिवार, 01/04/2017 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
कधी ह्या देहात, कधी त्या देहात आणि फिरतसे, अनेक योनीत असे कुठे वास, मधल्या वेळेत? आणि करे काय, नसता कशात? ओळख तयाची, कोणत्या खात्यात? तोच हा अमुक, कोण ठरवत? आहे तो खरेच, कसे हे ठरत? नसती भावना, प्राण्याच्या योनीत अचानक येती, मानवी देहात आज जारे बाबा, अमुक देहात आणि कर मजा, तमुक योनीत सांगा असे सारे, कोण त्यां सांगत? आणि गुपचूप, कोण शिकवत? जातो का शाळेत, मधल्या सुट्टीत? वेदना जखम, काया ही झेलत स्वत्वाची जाणीव, कायम सोबत सतत कर्मात, असे हीच रत तरी म्हणे भोग, असे हा भोगत फळाची आसक्ती, नसावी कायेत ह्यास मात्र फळ, मुक्तीच्या रुपात ऐकावे नवल, गंमत जंमत नाही रंग रूप, आकार बंधात तरी लागे गुण, किंव

||कोहम्|| भाग 6

लेखक शैलेन्द्र यांनी शुक्रवार, 31/03/2017 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
||कोहम्|| भाग 6 मागच्या भागात आपण विविध प्राणी आणि त्यांचे वेगवेगळे समुदाय यांच्या विषयी थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न केला, उत्क्रांतीत नेहमी तेच प्राणी यशस्वी ठरलेत जे सामुदायिक आयुष्य जगू शकले.