Skip to main content

विडंबन

रस्ता-२

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 29/04/2008 14:19 या दिवशी प्रकाशित केले.

अभ्यंकरशेठना शेवटी कुठला रस्ता मिळाला हे बघायला गेलो आणि आम्ही भलत्याच रस्त्याला लागलो..

आज तुम्ही तोंड का हे झाकले?
काय म्हणता शेण आहे फासले!

ती कधी आली न येथे एकटी
सोबतीला तात, बंधू आणले 

मी कशाला सांग बोंबलतो असा?
या बघाया मज कशाने तिंबले

लग्न कर वेळी अवेळी सांगते
(काय मजला वेड आहे लागले?)

(रस्ता)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 29/04/2008 03:30 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच प्रतीक्षेनंतर अनिरुद्ध अभ्यंकर यांचा सुंदर 'रस्ता' सापडला आणि मला हायसे वाटले!;) चावल्यावर जे मुखी मी घोळले तेच फिरता पाठ मागे थुंकले पिंकलो न येथे एकटा मी कधी सोबतीला हे जथे पण पिंकले तू कशाला चुना निघताना दिला तोंड रे माझे अशाने पोळले मुखरसां, मी काय रे आता करू? कोपरे सगळे जिन्याचे रंगले यार माझे वेळी अवेळी भेटती लोक म्हणती थुंकण्या हे चालले हाय हा तांबूल मजला भावतो, त्या तमाकूविण कुणाचे भागले? तांबूलहा 'रंगेल'ही माझ्या मुखी थुंकण्याचे सुख मलाही लाभले! हा मला 'रस्ता' मिळाला शेवटी त्यास पिचकारुन आता रंगले! पचकला 'रंग्याच' जाल
Taxonomy upgrade extras

(जैव वैविध्य)

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 25/04/2008 01:19 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा चैत्रेचैत यांचे जैव वैविध्य

(जैव वैविध्य)

थांब्याच्या बाकावर बसल्या 'दोन' बायका
काव काव काव काव काव काव काव

काळ्याशार गटारात डुक्कर आणि डुकरीण
त्यांची सदतीस पिल्ले खेळती धूळवडधूळवड

(केश्यांतिका... अर्थात् केश्याची शोकांतिका...(एक नवविडंबन))

लेखक ब्रिटिश टिंग्या यांनी शुक्रवार, 25/04/2008 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा आमचे गुरुवर्य केशवसुमार यांचे एक नवविडंबन केश्यांतिका... अर्थात् केश्याची शोकांतिका... आंतरजालावर कधीतरी टिंग्याने एक वात्रट प्रतिसाद दिला...... नंतर दुसरा....नंतर तिसरा.... असे करत करत सर्व प्रतिसाद देउन संपले....एकही लेख प्रतिसादाला शिल्लक ठेवला नाही..... मग त्याने विचार केला की स्वत:च्याच प्रतिसादांना परत प्रतिसाद देउयात. तेवढ्यात त्याला आंतरजालावर 'ठेवणीतल्या आयडी'वाल्याने शिवी दिली, '***** ***' म्हणुन तो सुट्टा शिलगावत 'पक्षीनिरीक्षण' करायला निघुन गेला.
- (वात्रट) टिंग्या ;)

केश्यांतिका... अर्थात् केश्याची शोकांतिका...(एक नवविडंबन)

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 24/04/2008 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा चैत्रेचैत यांची एक नवीकविता सिंहशोकांतिका... अर्थात् सिंहाची शोकांतिका... केश्यांतिका... अर्थात् केश्याची शोकांतिका... विश्वजालावर कधीतरी केश्याने एक विडंबन पाडले... नंतर दुसरे, नंतर तिसरे... असे करत करत सर्व कविता फाडून संपल्या. एकही कविता फाडायला शिल्लक राहिली नाही... मग त्याने विचार केला की ह्या पाडलेल्या विडंबनांचे परत विडंबन करूयात. तेवढ्यात त्याला दुसरी 'ढ' च्या वर्गातल्या फळ्यावर लिहिलेले वाक्य आठवले, 'बबन नमन कर' म्हणून तो जांभई देत ऑफिसचे काम करायला निघून गेला...

(गजल)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 22/04/2008 02:14 या दिवशी प्रकाशित केले.
डबल बॅरल बिरुटे सायबांची सुरेख 'गजल' मि.पा.वर आली आणि आमच्या ओठांना पुन्हा स्फुरण चढले! तेव्हा मुकेच होतो अजुनी मुकेच आहे हल्लीच चुंबनांचा झाला सराव आहे प्रेमात चुंबनांच्या तव चिंब चिंब झालो त्यांच्या धगीत अमुचे उद्ध्वस्त नाव आहे बोलणेच नसते अमुच्या व्यथा कुणाला जिंकून सर्व देणे अमुचा स्वभाव आहे आम्ही इथे विकलही तेही तिथे उदास प्रत्येक प्रेमिकाला आमुचाच ठाव आहे हरलोच बाजि आम्ही प्रेमातली पुन्हाही दुसरेच नाव घेणे ऐसा ठराव आहे हरुनी मिटू अखेर प्रेमात त्या तशाही फिरुनि आम्हावरीही तिचेच नाव आहे चतुरंग
Taxonomy upgrade extras

(भूक ही खरी किती)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 21/04/2008 07:37 या दिवशी प्रकाशित केले.
केसुंनी त्यांचे विडंबन टाकताच आमच्याच्याने राहवलेच नाही! त्यांचे (वाटले बरे किती) आणि चित्तची मूळ गजल दोन्हीही आमचे प्रेरणास्थान. (गजलेत अत्यंत योग्य दुरुस्त्या सुचविल्याबद्दल केसुंचे आभार.
Taxonomy upgrade extras

(समजून)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 16/04/2008 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
विक्षिप्त यांची सुंदर गज़ल'समजूत' ही आमची प्रेरणा -------------------------------- कुठल्या दिशेस दडले समजून ओतणारे? ग्लासात पेय 'तसले', समजून ओतणारे 'सोडा'च द्या बरोबर, त्यांना किती विनवले नाही मुळीच बधले समजून ओतणारे रिचवून पेग बसलो ओठात कोरडा मी आणी तहानलेले समजून ओतणारे सर्वांसमक्ष देऊ धूम्रास ओठ कैसे? गेले धुरात गेले समजून ओतणारे येताच चिकन पुढती मजला कसे कळेना झडपून संपविती समजून ओतणारे? पेल्यास टेकवूनी, पेले पिती किती ते शिवराळ भांडतीका समजून ओतणारे जेव्हा मला म्हणाले 'घेऊ' नको आता तू पुढच्याच पेगि रमले समजून ओतणारे 'रंग्या'स हसत
Taxonomy upgrade extras