द लेडी ऑफ शालॉट : (भाग १) चित्र, कविता आणि 'आई'चा मराठी तर्जुमा.

. चित्रकारः John William Waterhouse. (1888) Oil on canvas (72 in × 91 in) Location: Tate Britain, London गेल्या महिन्यात लंडनमधे दहा दिवस राहून तिथली कलासंग्रहालये बघितली. लहानपणापासून पुस्तकांमधे बघितलेली अनेक उत्तमोत्तम चित्रे प्रत्यक्ष बघण्यातली मजा भरपूर अनुभवता आली.

माझी नर्मदा परिक्रमा

लेखनप्रकार
नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . . श्री नर्मदा परिक्रमा !

सोम्या बाबा.

लेखनविषय:
लेखनप्रकार
संज्याची आई आली तेव्हा मी खाटेवर लोळत पडलो होतो. खरतर पोटात कावळे ओरडत होते. कुणीतरी जबरदस्ती करून जेव म्हणून सांगावं म्हणून मी कितीतरी वेळ वाट पाहत होतो. पण आई सुद्धा लक्ष देत नव्हती. "हे महाराज लोळत का पडलेत? आज खेळायला गेले नाय?" संज्याच्या आईनं माझ्या आईला विचारलं. "रुसलाय," आई म्हणाली. "कशाला?" संज्याच्या आईनं प्रतिप्रश्न केला. "त्याला गाय हवेय," आई म्हणाली. "काय बाई आक्रितच?" "गप शाळेत जाऊन अभ्यास करायचा सोडून गुरं सांभाळायची आहेत," संज्याची आई माझ्याजवळ येत म्हणाली. मी तोंड दुसऱ्या दिशेला फिरवून तसाच झोपून राहिलो. "जेवलाय पण नाय," आई म्हणाली. "काय? ये चल उठ, असं जेवणावर रुसतात व्हय?

क्रॉसओव्हर आणि परत माघारी-३ शेवट.

लेखनविषय:
“त्याचे काय?” चिंटूच्या डोक्यात अजूनही प्रकाश पडत नव्हता. त्याने आपल्या कोटाच्या खिशातून पिस्तुल काढून टेबलावर ठेवले. चिंटू मनातून चरकला. हा रुणझुणरुणझुणवाला दिसतो तितका साधा नाही. “आता मी जे काही बोलणार आहे ते ह्या चार भिंतींच्या पलीकडे जाणार नाही अशी मला आशा आहे. माझ्या म्हणण्याचा मतितार्थ असा की मी जे काही बोलणार आहे ते ह्या चार भिंतींच्या पलीकडे जायला नाही पाहिजे.” हार्डी बॉइजच्या कथा वाचून चिंटूला एक गोष्ट चांगली माहीत होती की ज्याच्याकडे पिस्तुल असते त्याच्याशी कधी आर्ग्युमेंट करायचे नसते.

पॅरिसमधील शिवचरित्र

लेखनप्रकार
गेले काही महिने इंग्लंडमधील तथाकथित वाघनखे चर्चेत आहेत. ती खरी की खोटी हा मुद्दा सोडला, तरी महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित अनेक अज्ञात वस्तू, हस्तलिखिते परदेशात आहेत, ही गोष्ट मात्र १००% सत्य आहे. अश्याच एका हस्तलिखिताचा हा शोध-वृत्तांत पुढे देतो आहे. या शोधाची सुरुवात झाली ती पुण्यात. दोन वर्षांपूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा २९ जुलै २०२१ रोजी १०० वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्त बाबासाहेबांच्या घरी राज ठाकरे इत्यादी अनेक मान्यवर येऊन गेले. शिवचरित्रकार श्री. गजानन भास्कर मेहेंदळे आणि भारत संशोधक मंडळाच्या कार्यकारिणीचे सभासद बाबासाहेबांना भेटले.

शुक्राची चांदणी

लेखनविषय:
लेखनप्रकार
लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी बाहेर शेतात झोपणं म्हणजे एक पर्वणीचं असायची. उत्तर-दक्षिण उभी पसरलेली शेतं आणि दक्षिण टोकाला, उत्तरेकडे तोंड करून असलेली घरांची वस्ती, घरांसमोर, वस्तीतील वापराचा पुर्व-पश्चिम जाणारा कच्चा माती-फुफाट्याचा रस्ता व रस्त्याच्या पलीकडे ज्याच्या त्याच्या वाटणीची शेतं. या शेतांच्या कडेने सोडलेल्या व साफ केलेल्या जागेत एखाद्या जुनाट पटकुरानं झाकलेली अंथरूण-पांघरुणे दिवसभर उन्हात धूळ खात पडून असत.

हे वाचा: बगळा

Bagla कटाक्ष- लेखक: प्रसाद कुमठेकर प्रकाशन: पार पब्लिकेशन्स पहिली आवृत्ती: २०१६ पृष्ठे: १५८ किंमत: ₹३०० ओळख- चिंतामणप्रसाद पुरुषोत्तम सरदेशमुख, पाचवी 'क'.

"ती धावत आली आणि गच्च मिठी मारून मुका घेतला" - मराठीच्या एका भावी प्रोफेसरची कहाणी.

"ती धावत आली आणि गच्च मिठी मारून मुका घेतला" -- यावरून मला "कदम चूम लूं या, ये आंखे बिछा दूं" या ओळी, आणि लागलीच "आंखों से जो उतरी है दिल मे तस्वीर है इक अनजाने की" " ही गाणी आठवली, मग त्यावरून "तस्वीर तेरी दिल मे जिस दिन से उतारी है" आठवलं आणि त्यावरून मग "दिल विल प्यार व्यार मै क्या जानू रे" हे आठवलं आणि मग त्यावरून आणखी काहीच आठवलं नाही पण तेवढ्यात शेजारच्या गण्याच्या घरात रेडियोवर "पल भर के लिये कोई हमे प्यार करले" हे वाजू लागलं आणि मग "गाता रहे मेरा दिल" वाजत होतं तेवढ्यात गण्या धावत आला आणि म्हणाला "फिरायला चल बे लौकर, बेबी आणि सुम्मी फिरायला निघाल्यात चल पटकन" -- पण मी

वार्तालाप: दुराशेच्या धार्मिक पोथी

लेखनप्रकार
श्रवणी लोभ उपजेल तेथे विवेक केंचा असेल तेथे. बैसली दुराशेची भुते तया अधोगती. समर्थ म्हणतात जो व्यक्ती सांसारिक उद्देश्यांच्या पूर्तीसाठी उदाहरण धन-संपत्ती, सुख- समाधान, सत्ता, ऐश्वर्य इत्यादी प्राप्तिसाठी पोथ्या वाचतो, कथा श्रवण करतो, कथेतील देवतेला प्रसन्न करण्यासाठी अन्न जल ग्रहण न करता पोथीत दिलेल्या विधिनुसार उपवास इत्यादी करतो, त्याच्या नशिबात फक्त दुराशा येणार. कधी कधी जे आहे ते ही हातातून जाते. उदा. हजार मोदकांची आहुती दिली तर इच्छित फलप्राप्ती होईल. तो आहुती देतो, पण फळ मिळत नाही. कारण, उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः.

सध्या काय वाचताय?

लेखनविषय:
लेखनप्रकार
बऱ्याच वर्षानी एक कादंबरी एकाच बैठकीत वाचून संपवली- हाकामारी -हृषीकेश गुप्ते. ही तशी जेमतेम १०० पानांची लघुकादंबरी, हल्ली इंटरनेट, व्हाट्सप, टीव्ही मुळे माझे वाचन प्रचंड मंदावले आहे, अगदी मध्यंतरी घेतलेले लॉर्ड्स ऑफ द डेक्कन हे पुस्तक आवडीचे असूनही निवांतपणेच वाचन सुरू होते, ते आज संपवले, आणि परवाच विकत घेतलेले 'हाकामारी' वाचण्यासाठी बाहेर काढून ठेवले, संध्याकाळी खरे तर बाहेर भटकायला जायचे होते पण कंटाळा केला आणि पुस्तक वाचायला घेतले आणि सुरुवातीपासूनच झपाटून गेलो, गुप्ते यांची दंशकाल ही कादंबरी, तसेच गानू आजीची गोष्ट वाचली होती.
Subscribe to वाङ्मय