Skip to main content

संस्कृती

गॅलरीतला [ चौथा ] पालापाचोळा

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 27/12/2015 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
मनाला गॅलरी आपली आपली गॅलरीतले आपण, आपले आपले. गुलाब काढा, मोगरा लावा मोगरा काढा, मरवा लावा, मरवा काढा, सुगंध ठेवा मनाला गॅलरी आपली आपली गॅलरीतला सुगंध आपला आपला. खुर्ची काढा, झोपाळा लावा, झोपाळा काढा, चटई टाका, चटई काढा, मोकळीच ठेवा मनाला गॅलरी आपली आपली गॅलरीतली स्पेस आपली आपली. काचा काढा, गज लावा गज काढा, पडदे लावा, पडदे काढा, उघडीच ठेवा मनाला गॅलरी आपली आपली गॅलरीतला प्रकाश आपला आपला. असणे नको, नसणे नको, आता कुठला ध्यास नको, कुठे फुलला, कुठे अडकला, असला मिळमिळ श्वास नको, मनाला गॅलरी आपली आपली गॅलरीतला श्वास आपला आपला.

मस्तानी-बाजीरावांचे वंशज

लेखक माहितगार यांनी रविवार, 27/12/2015 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
मस्तानी-बाजीरावांचे वंशज अजून आहेत याची गेल्या काही क्षणांपर्यत कल्पनाच नव्हती. फार-फार तर मस्तानी-बाजीरावांचा मुलगा शमशेर बहादूर-१ (कृष्णराव) पानिपतच्या तिसर्‍या युद्धात कामी आला एवढेच सर्वसाधारणपणे माहित असते.

सांताक्लाॅज ही अंधश्रद्धा आहे?????

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शनिवार, 26/12/2015 00:12 या दिवशी प्रकाशित केले.
सांताक्लाॅज ही अंधश्रद्धा आहे????? ............................................... यावर खूप पुर्वी सिनेमा पाहिला ..त्याचे कथानक साधारण असे....सिनेमाचे नाव आठवत नाही सिनेमा नायक वकील असतो.. त्याचा वकील मित्र त्याच्या घरी नाताळच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेला असतो.. हीरो वकिलाचा मुलगा बाबाच्या मित्रांना संटा नी दिलेली खेळणी दाखवत असतो.. मित्र गमतीत मुलाला म्हणतो."संटा असे काही नसते बाबाच खेळणी आणुन ठेवतात व मुलांना देतात" यावर तो लहान मुलगा गडबडतो..व बाबांना विचारतो..यावर हीरो बाबा म्हणतात.."संटा असतो व तोच खेळणी खाऊ मुलांना देत असतो" यावर दोनही वकिलांची जुंपते... आपल्या मुलाचे निरागस भावविश्व जपण

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १

लेखक DEADPOOL यांनी मंगळवार, 22/12/2015 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
आर.एम.च्या बंगल्यात सगळे घोस्टहंटर जमले होते. "वेलकम मंडळी! आर.एम. म्हणाले." सगळी मंडळी जेवणाच्या टेबलावर बसली. "आपण सर्व येथे ग्रेगच्या परत येण्यानिमित्त जमलो आहोत." ग्रेगने आपला ग्लास उंचावला! "ग्रेग तू अत्यंत शूरवीर आहेस. ज्या अँद्रिआला १८व्या शतकापासून कोणी मारू शकलं नाही तिचा तू अंत केलास!" ग्रेगने मनिषकडे बघितले! मनिष मस्तपैकी खुर्चीत रेलून बसला. "तर या अत्यंत खास प्रसंगी एक खास पेय!" आर.एम.

घोस्टहंटर-४

लेखक DEADPOOL यांनी शनिवार, 19/12/2015 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
रस्त्याच्या कडेला एक जुनाट हॉटेल होती.बघणारा तिथे कधी गेलाच नसता. एक माणूस शांतपणे सिगार पीत होता! बाहेर कार येऊन थांबली. कारमधून उतरणारा सरळ हॉटेल मध्ये आला! "मनिष तुला हजारदा सांगितलंय की इथे येण्यासाठी कार वापरायची नाही!" "सॉरी ग्रेग." "तू मी दिलेले कागद वाचलेस?" "हो आणि ग्रेग ही खूपच विचित्र केस आहे." "म्हणून मी तुला इथे यायला लावलं." मनिषने कॉफीची ऑर्डर दिली आणि तो शांतपणे बोलू लागला. "पण मला याचा मार्ग सापडला आहे!" ग्रेग उडालाच! "मी जोक ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीये मनिष!" "मी जोक करत नाहीये.तुला ती अन्ड्रिआ कुठे भेटेल हे बघायच होतं ना!" "हो आणि?" "ती तुला भेटेल, मात्र एकच ठिकाणी!" कुठे?

घोस्टहंटर-३

लेखक DEADPOOL यांनी शुक्रवार, 18/12/2015 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
१६६५! इंग्रज सैन्य स्पेनवर चालून गेले! काउंट ब्रॅक्स्टन या लढ्याचे नेत्रुत्व करत होता! ब्रॅक्स्टन हा अत्यंत ताकदीने लढणारा योद्धा म्हणून प्रसिद्ध होता. आजपर्यंत म्हणून तो एकाही लढ्यात हरला नव्हता! मात्र आज त्याची लढाई एका सैतानाबरोबर होती! आंद्रे!!!!! "ब्रॅक्स्टन!" "कोण?" "मी लाओ!" लाओ हा ब्रॅक्स्टनचा उजवा हात. हा अत्यंत चाणाक्ष हेर म्हणून प्रसिद्ध होता. "बोल लाओ." "ईशान्येला सैन्य हलवा!" ब्रॅक्स्टन ला कळायला वेळ लागला नाही! ईशान्येकडील दरवाजा तुटला. कीम्बहुना रखवालदार फितूर झाल्यामुळे तोडला गेला! आणि लाओने पहिला जीव घेतला.

घोस्टहंटर-२

लेखक DEADPOOL यांनी शुक्रवार, 18/12/2015 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
बावीस दिवसांपूर्वी! एक तरुण रस्त्याने जात होता. त्याच्या शरीरावर अत्यंत उंची वस्त्रे होती.त्याने रस्त्यावरील एका टॅक्सीला हात दिला. "मेरीओ हॉटेल!" भरधाव वेगाने टॅक्सी निघाली. मेरीओ हॉटेल ही लंडनमधील अत्यंत उंची हॉटेल म्हणून गणली जात असे. अनेक अभिनेते,उद्योजक,नेते,या हॉटेलमध्ये विचारविनिमय करत असत.जगातल्या सर्व सुखसोयी या हॉटेलमध्ये होत्या. "हॅलो मि. ग्रेग!" तो तरुण म्हणाला. ग्रेगने मान हलविली! "मी काउंट मॉर्सेलिस. माफ करा मला थोडा उशीर झाला." "इट्स ओके!" ग्रेग हसत म्हणाला. कॉफी विदाऊट शुगर! मॉर्सेलिसने ऑर्डर दिली! "तर मी आता मुद्यावर येतो. सर्वप्रथम मला आपली ओळख करून द्यायला हवी.

घोस्टहंटर-१

लेखक DEADPOOL यांनी बुधवार, 16/12/2015 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
"व्हू आर यू?" "युवर डेथ!" तो खाली कोसळला! "मनिष उठ!" एलिझाबेथ मनिषला उठवत होती. गेले काही दिवस मनिषचे झोपेचे प्रमाण वाढले होते. एलिझाबेथ याच काळजीत होती. शिवाय आताची केस तिच्या काळजीत भर घालत होती. ग्रेग मॉरिसन मर्डर केस! सर्व घोस्टहंटर यामुळे हादरले होते, कारण ग्रेग मॉरिसन हा घोस्टहंटर लोकांचा मुकुटमणी होता. जगात जिवंत लोक जेवढे भूतांना घाबरत नसतील तेवढी भुते ग्रेग मॉरिसनला घाबरत असत. "झोपू दे मला!" "अरे मूर्ख उठ!" "मी केस सॉल्व करतोय." एलिझाबेथ आता पूर्णपणे कंटाळली होती. कारण ग्रेगच्या अँत्यविधिला सर्व घोस्टहंटर हजर राहणार होते.

संवादात्मक कार्यशाळा (फक्त पुणे)

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 15/12/2015 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
खास नवीन आणि उदयोन्मुख लेखकांसाठी , नुक्कड सादर करीत आहे 'संवादात्मक कार्यशाळा !' मराठी साहित्य परिषद , पुणे , यांच्या संयुक्त विद्यमानाने , आपल्यातल्या लेखकासाठी! नाव नोंदणी - http://goo.gl/forms/sKCHbNZchh दिनांक - १९ डिसेंबर २०१५, वेळ सायं ६.३० ते ८ महाराष्ट्र साहित्य परिषद हॉल , टिळक रोड , पुणे (टीप : नाव नोंदणी आवश्यक आहे , हा उपक्रम केवळ पुण्यातील होतकरू लेखकांसाठी मर्यादित आहे. तुमच्या शहरात लवकरच येत आहोत!) कोणाला काही अधिक माहिती हवी असल्यास - संपर्क करा :- श्री. अक्षय वाटवे ९४२०२६०८०८

कडेमनी कंपाऊंड

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 11/12/2015 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
जी ए कुलकर्णींच्या स्मृतीस..... कडेमनी कंपाऊंडमध्ये बसून एक माणूस लिहायचा. अंगावर कातडी नसलेल्या माणसांच्या कथा त्याने इतक्या सोलीवपणे लिहिल्या, कि अंगभर कातडी असूनही आम्हाला पुन्हा नव्याने आरशात पहावे लागले. पुस्तके मनाचा आरसा असतात, कि फुटलेल्या काचेतून आरपार जाणारे माणसाचे अंतर्मन असते! पुस्तकांच्या नावापासूनच मनाचा कुठला तरी कोपरा धरधरीत अंधारात गळपटायचा. ‘रमलखुणा’ म्हटलं कि, आजही वाळूवर कुणीतरी काही गूढ लिहून गेलंय, त्याचा अर्थ लावता लावता माणसं परागंदा होतात, असं वाटतं. ‘काजळमाया’ आणि ‘पिंगळावेळ’ आयुष्याच्या मध्यरात्रीही दचकून जागे करतात.