Skip to main content

संस्कृती

ऐतिहासिक किल्ले, मंदिरे यांची नवी ओळख ...

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 20/01/2016 12:28 या दिवशी प्रकाशित केले.

ऐतिहासिक गड किल्ले यांचे संवर्धन

मित्रांनो, गेला काही काळ आपल्याला आपल्या सांस्कृतिक वारसा असलेल्या वास्तूंचे रक्षण व संवर्धन कसे करता येईल यावर काही व्यक्तींशी भेट व चर्चा केली. त्यानंतर सोबतचे PPT पाहून मला अपेक्षित संकल्पना काय व कशी अमलात आणता येईल यावर आपले मत, सुचना व सहकार्य मागायला व आपल्याशी संवाद निर्माण करण्यासाठी हा धागा सादर. सैनिकी पर्यटन (मिलिटरी टुरिझम) संकल्पना ही त्याचा एक भाग आहे.

कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 15/01/2016 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत.

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.....

लेखक रॉबिन्सन कृसो यांनी शुक्रवार, 15/01/2016 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो आणि मिपाकरणींनो, संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज मला माझा मिपा आय.डी. मिळाला. एका दर्जेदार संकेतस्थळावर, आमच्याकडून तरी वेडेवाकडे लिहिले जाणार नाही, ह्याची मी काळजी घेईनच पण काही चुकले-माकले तर, (हम आदमी है|भगवान नहीं|), कान उघाडणी जरूर करा. आपलाच, रॉ.कृ.

देह देवाचे मंदिर

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 14/01/2016 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे देव कुठून येतात? देव कसे तयार होतात? देव हे आधी माणूस म्हणून जन्माला येतात का? चारचौघांसारखी जन्माला आलेली माणसं, देव होऊन असे कसे अजरामर होऊन जातात? देव ही प्रतिभावान माणसाची निर्मिती आहे का? देवाच्या नावाने प्रश्नच प्रश्न. पण हे प्रश्न प्रत्येकाला सतावत नाहीत, हाच खरा मोठा प्रश्न आहे. हा लेख लिहीत असताना एक गोष्ट माझ्या प्रकर्षाने लक्षात आली. प्रथितयश देवांनी कधीही जनसमुदायासमोर मोठमोठी प्रवचने दिली नाहीत. भाषणे केली नाहीत. खूप मोठे उपदेश कोणाला केले नाहीत. त्यांच्या घरात वा चौकात आठवडी वा मासिक सत्संगाचे कार्यक्रम आयोजित केल्याची कुठे नोंद नाही.

कुठं कुठं जाऊ मी सांगायला?

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 04/01/2016 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : "कुठ कुठ जायाच हनिमूनला" ही प्रसिद्ध ठसकेबाज लावणी! कुठं कुठं जाऊ मी सांगायला? अहो भरल्या जवानीत 'सर' तुम्ही मला हेरलं हेरलं ते हेरलं अन् जॉबच् माझ्या ठरलं ख्रिसमस झाला, "न्यू" इयर झालं आता फक्त ऑफिस की हो उरलं! मार्केटींग, मॅनेजमेंट, निवांत एच.आर. कोण नाही पर्वा करायला कुठं कुठं जाऊ मी सांगायला? थोडं तरी इन्क्रिमेण्ट करायला! रात्रभर एकटा बसू कसा? क्लायंटला अडचण सांगू कसा? बाकीचे सारे, प्रोफेशनल खरे जातात टायमात ते घरला! कुठं कुठं जाऊ मी सांगायला? जमेल तेवढं खेचून मी काम नाही केला आजिबात आराम सकाळ

घोस्टहंटर- पायरेट ऑफ़ अरेबिया ३

लेखक DEADPOOL यांनी शनिवार, 02/01/2016 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
क्रेकन द मॉन्स्तर! क्रेकनने त्याला गिळले. आणि तो एका अंधार पोकळीत घुसला! अंधार आणि फक्त अंधार! डोळ्यात बोट घातले तरी कळणार नाही. "आलास तू?" त्या पोकळीतून धीरगंभीर आवाज आला. "हो" अरब म्हणाला. "शैतानाची कलमे लक्षात आहेत?" "हो" "वागशील त्यानुसार?" "हो" "चांगलं की वाईट?" "वाईट" "नाग की गरुड़?" "नाग" "बकरा की गाय?" "बकरा" "स्वर्ग की नरक?" "नरक" "प्रेम की द्वेष?" "द्वेष" तो हसला! "शेवटचा प्रश्न जमीन की समुद्र?" "जमीन!" "नाग आणि बकरे तुला मदत करतील." तो अंधार पोकळीतून बाहेर आला. समोर पूर्ण वाळवंट! वाळवंटात एक जहाज बाहेर येत होती. त्याच्या कानात आवाज घुमला 'तू जमीन निवडलीस' पायरेट ऑफ़ डेज़र्ट! पायरेट

सफलतेचा मंत्र - विकल्परहित संकल्प आणि अखंड पुरुषार्थ

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 02/01/2016 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
काल नवीन वर्षाचा पहिला दिवस होता, घरी आल्यावर सहज आस्था चेनल लावले. महर्षी रामदेव यांचे प्रवचन सुरु होते. जीवनात उद्दिष्ट लक्ष्य गाठण्या साठी दोन सूत्र सांगितले -पहिला विकल्परहित संकल्प आणिक दुसरा अखंड पुरुषार्थ. त्याचेच विश्लेषण आपल्या अल्प बुद्धीने करण्याचा प्रयत्न केला आहे. विकल्परहित संकल्प अर्थात आपल्याला जीवनात काय बनायचे आहे किंवा काय लक्ष्य गाठायचे आहे. हे आपल्याला माहित पाहिजे. जर आपल्यालाच लक्ष्य माहित नसेलतर आपण कुठेच पोहचू शकत नाही. डॉक्टर, इंजिनीअर किंवा अकाऊंटेंट- काहीही बनायचे असेल तर अभ्यास हि वेगळा करावा लागतो.

कार्यक्रमाचे आयोजन आणि काडीची कसर…!

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 31/12/2015 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन हीही एक कलाच आहे. मोठ्या प्रयत्नाने ती अवगत करावी लागते. कांही मंडळी अनुभवाने यात चांगलीच तरबेज झालेली असतात. कार्यक्रम उठावदार आणि यशस्वी कसा करावा , त्यासाठी लागणाऱ्या वस्तू, माणसे, कुठे काय मिळते त्यांना बरोबर माहीत असते आणि ते कमी वेळात छान आयोजन करून दाखवतात. मोठं कौतुक वाटतं अशा लोकांचं . एकदा आमच्या कंपनीतल्या ट्रेनिंगमध्ये बाहेरून आलेल्या प्रशिक्षकाने नियोजन कसे असावे हे समजावताना पेशवाईतली एक गोष्ट उदाहरण म्हणून सांगितली. कुणाला ही बिरबलाची म्हणूनही माहीत असेल . त्यामुळे मूळ मुद्द्याला फरक पडत नाही.

समता

लेखक अविनाश लोंढे. यांनी मंगळवार, 29/12/2015 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रियेसी बरोबर गेलो मी तिच्या घरी , पोहोचण्या आधीच होती जातीची दरी 'जात काय ह्याची' - त्यांनी तिला विचारल दलित , सवर्ण - समतेच ज्ञान मी पाझरल [ ते ] अद्भुत तेवर विश्वास आहे आमचा , पण चमत्कार फक्त विसरायचा 'जात' नाही ती 'जात'असते पोरा 'वैरी ' नाही करायचा समाज सारा 'फळा'पुसला कि समानतेलाही इथं पुसतो , 'आंतरजातीय विवाह' सगळ्यांनाच इथं सलतो पण ,जे झालं ते आता 'चार भिंतीत' इथं विसरायचं , अन , आपण 'सगळे समान' असच बाहेर बोलायचं [मी ] ह्या 'सैतानाचा' आता कंटाळा आलाय , ह्या 'ठासण्याचा' आता कंटाळा आलाय ह्या 'व्यापाराचा' आता कंटाळा आलाय फक्त 'फायदाच 'काय त

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया २

लेखक DEADPOOL यांनी रविवार, 27/12/2015 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
घोस्टहंटर-१ www.misalpav.com/node/34123 घोस्टहंटर-२ www.misalpav.com/node/34140 घोस्टहंटर-३ www.misalpav.com/node/34145 घोस्टहंटर-४ www.misalpav.com/node/34161 घोस्टहंटर-५ www.misalpav.com/node/34185 घोस्टहंटरच्या निमित्ताने! www.misalpav.com/node/34200 घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १