Skip to main content

संस्कृती

मी अश्व!!

लेखक चांदणे संदीप यांनी गुरुवार, 21/04/2016 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
'शक्तिमान'ला ही माझी काव्यांजली समर्पित! वेग अफाट शक्ती अचाट अंगी डौल मोल अमोल निष्ठा घोर इतिहास थोर करारी बाणा सखा महाराणा बनता दळ सैन्या बळ आजीचे कथन पऱ्यांचे वाहन नीज गहाण वया परिमाण लौकिकी मती प्राणी जगती अडीच पावली चौसष्ठ आलयी पौरुष नामांकन दिव्य आभूषण मिळता सात तिमिरा मात ऋणी विश्व मी अश्व!! - संदीप चांदणे

..आणि 'ती'ला चर्चच्या गाभार्‍यात प्रवेश हवा आहे !

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 19/04/2016 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
'मिनु इत्त्यीप्पे' नावाच्या स्त्रीचा स्क्रोल.इन नावाच्या संस्थळावर लेख आला आहे. 'मिनु इत्त्यीप्पे' तिच्या लेखाच्या शीर्षकापासूनच "Why only temples? Even some churches don't allow women into the inner sanctum; Religions continue to discriminate against women in the name of tradition." चर्चमधील स्त्रीयांशी केल्या जाणार्‍या भेदभावा बद्दल तक्रार करते. लेखात तीने दिलेल्या माहितीनुसार ती 'मलंकारा मरथोमा सिरीयन' नावाच्या चर्चशी संलग्न आहे.

कोहीनूर हिरा, .. आणि इतिहासाच्या मागील पानावरुन पुढे जाताना .. ..

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 19/04/2016 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
सोने असो वा जड जवाहीर यांच्यावर निव्वळ अय्याशीखातर आयातीसाठी परकीय चलन वाया घालवावे एवढे नक्कीच महत्वाचे नाहीत. पण काही गोष्टींना सांस्कृतीक वारशाचे महत्व असते, अशा वारशा सोबत अस्मिता जोडल्या गेल्या असतात. एखादी गोष्ट तुम्ही बाजारात सहज विकायला ऑक्शनमध्ये ठेवता आणि कुणि विकत घेऊन जाते तर तुमचा अभिमान आणि तुमचे मन दुखावले जात नाही. पण कुणि तुमच्या पराभवाचा लाभ घेऊन वस्तु आणि तेही अस्मिता जोडलेली सांस्कृतीक वारसा असलेली असेल तर समाजमनाचा हळवा कोपरा दुखावला जातोच. अस्मिता हिरावलं जाण्याचं हे खुपणं वस्तु हिरावून घेऊन जाणार्‍यांना लक्षात येतच असं नाही.

देव गाभाऱ्याबाहेर निघाला!

लेखक DEADPOOL यांनी मंगळवार, 19/04/2016 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
शून्य मनाने बसलो होतो गाभाऱ्यात आली ती पलीकडुन! सांगितले कानात येताहेत भेटायला तुला! किती आनंदलो मी! बहुता दिसा भेट होणार का जन्मासी आलो मी! जगण्याला अर्थ येणार आली ती देवळात निघाली माझ्याकडे येण्यासाठी! आता रिते झाले मन नवे वर्म भरून घेण्यासाठी! थांब कुलटा घणाघात झाला! परंपरा तोडशिल? मुलाला भेटायला! परंपरा आड आली भरल्या डोळ्याने परत निघाली! मुलाला भेटावयाची इच्छा इच्छा अधुरीच राहिली! माता गेली माघारी मुलाचा कोप झाला! आणि परंपरा तोडून देव गाभाऱ्याबाहेर निघाला!

मैथिली

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 19/04/2016 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
हत्ती कळपात घुसला अन अस्ताव्यस्त हत्तीणीची झोप चाळवली. उठून बसत तिनं " आवं, आज रिकामंच आलाव?" म्हणत हत्तीकडं पाहिलं. हत्तीनं बसकन मारुन आधी बादलीभर पाणी घटाघटा पिऊन टाकलं. मग " आरारा, काय हे उन " म्हणत राहिलेलं पाणी सोंडेनं अंगावर फवारलं. " हा, घ्या कापायला कलिंगड " शेवटचा फवारा कुल्यावर मारत हत्ती बायकोला म्हणाला. तशी हत्तीण पेटलीच. "कसलं कलिंगड, तुमी तर रिकामंच आलाव की " मग जरा हत्तीनं डोकं खाजवलं. विचार केला. सालं आता भांडण पेटणार की काय? तेवढ्यात झुडपात झोपलेली रानडुक्करीण जागी झाली.

मातृभूमीला 'माँ' म्हणण्याची गरज का?

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 13/04/2016 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् वर्ष तत् भारतं नाम भारती यत्र संततिः समुद्राच्या उत्तरेला आणि हिमाद्रीच्या दक्षिणेतल्या भू भागाला भारत असे म्हणतात. या भारतभूमीची संतति इथे निवास करते. अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. हे लक्ष्मणा, सुवर्ण लंकेचा राजा बनण्यापेक्षा अयोध्येत भरताच्या अधीन सेवक राहणे अधिक रास्त कारण माता आणि मातृभूमी स्वर्गापेक्षा हि महान आहे. पुरातन काळापासूनच आपण आपल्या भरत भूमीला आई म्हणतो. युरोपियन लोक हि देशाला पितृभूमी म्हणतात.

शब्दांच्या, रानातल्या गप्पा!

लेखक चांदणे संदीप यांनी बुधवार, 13/04/2016 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
"दादा, तुमची ही कविता जरा समजून सांगाल का. म्हणजे, हे निसर्गचित्रण आहे का यात काही रूपकात्मक शृंगार दडला आहे जो मला नेमका दिसत नाहीये." आणि मग त्यांनी पुढे जे काही त्या कवितेतल्या चित्रणाबद्दल सांगीतले ते ऐकून/समजून माझ्या लक्षात आले की, आपण अजून कविता बुद्रूकलाही जाऊन पोचलो नाहिये, कविता खुर्द हे गाव तर लांबच! कविता होती, "जाळीवरती वाळत लुगडे, उभा हसे जरतारी काठ...." आणि कवि अर्थातच, महाराष्ट्राचे 'शेतकवी', कवि ना. धो. महानोर! रविवार दि. १०/४/२०१६ रोजी त्यांच्या राहत्या घरी म्हणजे अजिंठ्याच्या जवळ पळसखेड्याला त्यांना भेटायचा सुवर्णयोग आला होता. भेटतील का नाही? भेटतील तर कुठे? कसे?

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४

लेखक DEADPOOL यांनी शनिवार, 09/04/2016 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी! १. तर मंडळी रोला अजूनही समजत नव्हते की पायरेटचा अंत कसा करावा, कारण पायरेट कोणत्याही शस्त्र अथवा अस्त्र याने घायाळ होत नव्हता. शैतानाच्या दूताकडून त्याला ही जहाज मिळाली होती.त्या जहाजाच्या प्रत्येक भागावर त्याची हुकुमत चालू होती. जहाजाची प्रत्येक दोरी म्हणजे एक साप होतात. असे अनेक प्रकारचे साप तिथे होते. रो कंटाळून त्याच्या ऑफीसमध्ये बसला होता.

महाराष्ट्र दिन २०१६ लेखमाला

लेखक साहित्य संपादक यांनी शुक्रवार, 08/04/2016 02:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, समस्त मिपाकरांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा!! तर या नवीन वर्षात नवीन उपक्रम घेऊन येत आहोत १ मे या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने. बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा। अशा आपल्या महाराष्ट्र देशाच्या काल आज आणि उद्याचा आढावा, महाराष्ट्राचे देशाला योगदान हे या निमित्ताने मिपावर यावे या हेतूने साहित्य संपादक मंडळ घोषित करत आहे महाराष्ट्र दिन २०१६ लेखमाला. या उपक्रमात खालील विषयावर लेख लिहून मिपाकर भाग घेऊ शकतात. १. महाराष्ट्र काल, आज आणि उद्या (उदा.

ताल

लेखक अभ्या.. यांनी रविवार, 03/04/2016 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
ठाक ठण्ण ठाक आवाजाने विजू उठला, भीमसू बारक्या पितळी हातोडीनं संबळ ठोकत होता. बापाला कितींदा सांगितलं अंधाराचं दिवाबत्ती तर कर म्हणून. आयकायचं रक्तातच नाही. गार पाणी डोक्यावर ओतून विजूने कापडं हुडकायला सुरुवात केली. शाळेचा गणवेशाच्या चड्डीवरच मंडळाने दिलेला शर्ट घालूस्तवर भीमश्या कवड्यानी सजलेली अन कुंकवानं माखलेली पडशी घेऊन बाहेर झाला. पहाटेच्या अंधारातच बापलेकानी देवळाच्या बाहेरुन हात जोडले. देवडीचा चिंचोळा जिना चढून बसताच गाभारा उजळलेला दिसला. हरीभटजी काकड्याला सुरुवात करायला अन चौघडा वाजायला गेली ५० वर्शं तरी खंड पडलेला नव्हता. .. आभाळ गुलाबी व्हायला लागलं तसं भीमश्याचं हात भरु भरु आलं.