Skip to main content

'सर्व'-समावेशक सण आणि उत्सवांचे महत्व

माहितगार यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
धागा शीर्षकातील 'सर्व'-समावेशक हा शब्द सर्व बॅकग्राऊंडचे -कोणत्याही जाती-धर्म-वंशाचे- लोक एकत्र सहभागी होऊ शकतील या अर्थाने वापरला आहे, (सेक्युलर हा शब्द फारच बदनाम झाल्यामुळे तो शब्द टाळला). जसे की वाढदिवस आहे वाढदिवसास निमंत्रितांवर जाती धर्माची पुटे राहत नाहीत. (पंतप्रधान मोदीतर आंतरराष्ट्रीय डिप्लोमसीसाठी वाढदिवसाची वेळ वाअरून घेतात) नवीन वर्षाची सुरवात साजरे करणे (जगातल्या कोणत्याही कॅलेंडर नुसार) वस्तुतः निधर्मी असावे. २६ जानेवारी, १५ ऑगस्ट हे सण सुद्धा निधर्मी असतात. फ्रेंडशीप डे सारखी कल्पना सुद्धा एक चांगली कल्पना आहे. जात अथवा धर्मवार नसलेली साहित्यसंमेलने सुद्धा सर्वसमावेशकतेच्या उत्सवाचे उदाहरण होऊ शकते किंवा अगदी एखादा मिपा कट्टासुद्धा. भारतातील राजकीय नेतृत्व जनतेला जात आणि धर्मांपलिकडे पाहण्यास केव्हा शिकवेल माहित नाही, पण 'सर्व'-समावेशक सण आणि लोक उत्सव सामाजिक अभिसरणाचा आधार बनू शकतील किंवा कसे ? संस्कृती आणि धर्म याबद्दल कमीत कमी गल्लत झाली तर सामाजिक अभिसरणास अधिक हातभार लागू शकेल का ?