मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संगीत

'सह-गान' (विदुषी वसुंधरा कोमकली- कलापिनी कोमकली)

चैतन्य दीक्षित ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
.... 'चैत्या, अरे तुम्ही चेन्नईत असून किती रे भाग्यवान?' अशा वाक्याने बंगलोरमधली एक मैत्रीण मला पुढे एकही अक्षर उच्चारू न देता फोनवर सुरू झाली ! मागच्याच आठवड्यात शुभा मुद्गलांचं गाणं ऐकायला गेल्याचं मी तिला सांगितलं होतं. आणि तिने मला या आठवड्यात चेन्नईत होणार्या श्रीमती वसुंधरा कोमकली आणि कलापिनी कोमकली यांच्या 'सह-गान' बद्दल सांगायला फोन केला होता. माझ्या पत्रिकेत त्या दोन आठवड्यात 'संगीत-घबाड' योग असणार खास ! आधीच्या आठवड्यातली शुभा मुद्गलांची चांगली अडीच तास रंगलेली मैफल अजून कानात घुमत होती.

गाओ गाओ मेरे साधो सभी भुलाऑ गम........

जयंत कुलकर्णी ·
लेखनप्रकार
सध्या विडंबनाचे पेव फुटले आहे ते बघून मला एक अत्यंत जूने विडंबन आठवले. १९३२ सालचे एक भजन पूरणभगत नावाच्या सिनेमातले... गायक अत्यंत तोलामोलाचा....के सी डे... आपल्या मन्ना डेचे बहुतेक ते काका होते आणि एस डी बर्मन यांचे गुरू. त्यांचे हे गाणे ऐका... हे गाणे त्या काळात खूप म्हणजे खूपच गाजले होते. बरोबर चार वर्षाने या गाण्याचे विडंबन करण्यात आले मिस. फ्रॉन्टियर मेल मधे. त्याकाळातील बोल्ड नटी फिअरलेस नादीया हिचा हा सिनेमा. त्याचा संगित दिग्दर्शक होता मुहम्मद का कोणीतरी.

देवगंधर्व पं. भास्करबुवा बखले - एक कृतज्ञता

gaikiakash ·
लेखनविषय:
नमस्कार मंडळी- १४२ वर्षापूर्वी संगीताताल चमत्कार गायनाचार्य भास्करबुवा बखले ह्यांचा जन्म झाला. त्यानिमित्ताने त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक लेख लॉस एन्जेलिस येथील साहित्यिक श्री. शशिकांत पानट ह्यांनी लिहिला तो आपल्याला वाचायला आवडेल असे वाटले म्हणून पाठवित आहे. त्यांची पूर्व-परवानगी घेउन हा लेख "मिसळपाव" वर प्रकाशित करीत आहे.

एका द्वयर्थी गीताचे रसग्रहण

चेतन सुभाष गुगळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
जेव्हा एखाद्या वाक्यरचनेतून एकाहून अधिक अर्थ ध्वनित होतात तेव्हा श्लेष अलंकार साधला जातो. या गाण्यातही अशाच प्रकारे वाक्यरचनेतून दोन अर्थ आपण काढू शकतो.

'नीम का पेड' आणि त्याचं शीर्षक गीत - मूँह की बात सुने हर कोई

प्रास ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
९०च्या दशकाच्या मध्यात, बहुतेक ९४-९५ च्या सुमारास दूरदर्शनवर रात्री ९ वाजता एक सुंदर मालिका लागायची. तिचं नाव होतं 'नीम का पेड'. तेव्हाही ती मालिका बघत असताना सारखं वाटायचं की आपण काही क्लासिकल किंवा अभिजात बघतोय. कथा एका बुधाई राम नावाच्या गरीब माणसाची होती. हा बुधाई राम खरं तर एक हरकाम्या असतो, गावच्या मुसलमान जमीनदाराकडे. जमीनदाराचं काहीही काम असलं की त्याला याचीच आठवण होत असे.